Tarun Bharat

रान डुक्करांकडून बार्सेत भातशेतीची नासधूस

गरीब शेतकरी संकटात

Advertisements

ब्रिजेश देयकर

प्रतिनिधि


मडगाव
: भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामूळे देशातील प्रत्येक शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारचे प्रयत्न असले पाहिजे. पण, शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृषीमंत्री असलेले चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या मतदारसंघातील वेळीपवाडा-बार्से येथील शेतकर्‍यांची भात शेतीची रानडुक्करांनी नासधूस करुन टाकलेली आहे. या रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यात वन खात्याला तसेच कृषी खात्याला देखील अपयश आले आहे.गेल्या वर्षी सुद्धा रानडुक्करांनी भात शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. त्यामुळे येथील शेतकर्‍यांनी गेल्या वर्षी सरकारने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी केपे येथील कृषी कार्यालयात अर्ज दाखल केले होते. पण, त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहि. त्यामूळे यंदा तरी सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील वेळीपवाडा-बार्से येथील शेतकर्‍याचा मुलगा या नात्याने आदर्श वेळीप यांनी केली.
रानटी डुक्कर रात्रीच्यावेळी शेतात येत असल्याने यावर उपाय म्हणून शेतात एक ‘माळा’ घालण्यात आला व तिथे रात्री जागवून रान डुक्करांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काहिच फायदा झालेला नाहि. रानडुक्करापासून आपल्या शेतीची नासधूस करण्यापासून ते रोखू शकले नाहि. आदीवासी समाजातर्फे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने ‘भोवंडी’चे आयोजन केले जाते. भोवंडीचा मुख्य उद्देश म्हणजे रानटी जनावरांना गावात व शेतात येण्यापासून रोखणे. ऐवढाच उद्देश असून दरवर्षी आदीवासी समाजातर्फे याचे आयोजन केले जाते. या भोवंडीत गावातील संपूर्ण लोकांचा समावेश असतो. यंदा कोरोना महामारीमुळे या पारंपारिक भोवंडीचे आयोजन करण्यात आले नाहि, त्याचा पाfरणामहि शेतकर्‍यांना भोगावा लागला असल्याचे श्री. वेळीप म्हणाले.
बार्सेतील शेतकर्‍यांना गेल्या वर्षाची नुकसान भरपाई मिळालेली नाहि. सरकार जर शेतकर्‍यांसाठी योजना राबवत असेल तर त्यांना त्या योजनांचा फायदा मिळाला पाहिजे. शेतकरी हा देशाच्या हितासाठी काम करत असून, शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यास सरकारने प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. कृषी अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात वेळीपवाडा-बार्से येथील शेतकर्‍यांच्या भात शेतीची पाहणी करावी. नंतरच शेतकर्‍यांचे दुःख सरकारला समजेल असे वेळीप म्हणाले. रानडुक्कर व किटकांनी केली नासाडी,यंदा रानडुक्कर व किटकांनी भातशेती संपूर्णपणे नष्ट करुन टाकलेली असून यंदा आपण कसे जगावे हाच प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. शेती करणे म्हणजे काहि सोपं काम नसते, त्याला खुपच मेहनत घ्यावी लागते. सरकारच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठी आपण शेती करत नाहि. जर आम्ही शेती केली नाहि तर जगू शकणार नाहि. आम्हाला आता सरकारने आधार द्यावा असे श्रीमती चंद्रावती वेळीप म्हणाल्या. कृषी अधिकार्‍यांनी पहाणी करावीकृषी अधिकार्‍यांनी आमच्या भातशेतीची पाहणी करण्यासाठी यावे. तसेच आम्हाला नुकसान भारपाई देण्याचाहि प्रयत्न करावा. शेतकर्‍यासाठी सरकारने राबविण्यात आलेल्या योजनेचा फायदा घेण्याकाfरता कृषीकार्ड बनविले असून त्यामूळे सरकारने आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करावा. असे पार्वती वेळीप म्हणाल्या

Related Stories

आधी केले, मगची सांगितले…!

Amit Kulkarni

बोरी येथे 11 रोजी ‘सिद्धनाथ स्त्री स्पंदन’

Patil_p

केजरीवाल, फडणवीस सोमवारी गोव्यात

Amit Kulkarni

अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारताच्या दौऱयावर

Patil_p

अमेरिकेत कोरोनाने घेतले 90 हजार बळी

datta jadhav

पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोमरपंत व उपनिरीक्षक सुभाष नाईक आज सेवानिवृत्त

Omkar B
error: Content is protected !!