Tarun Bharat

राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात येत्या 27 जुलैला चार ते सहा राफेल फायटर विमानांची पहिली तुकडी दाखल होणार आहे. फ्रान्समधील भारतीय पायलट दक्षिण फ्रान्सच्या इस्ट्रेस बेसवरुन हरियाणाच्या अंबाला बेसवर राफेल विमाने आणतील.

राफेल हे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारतीय पायलटांना या विमानांचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विमानात 150 किमी पर्यंत रेंज असणारे एक परिपक्व क्षेपणास्त्र असेल. चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कोणतेही फायटर विमान नाही. त्यामुळे समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला भारत योग्य उत्तर देईल. 

राफेल विमान भारतात आणताना एका ठिकाणी काही वेळ स्टॉप घेण्यात येणार आहे. फ्रान्सहून उड्डाण केल्यानंतर राफेल विमान संयुक्त अरब अमिरातीतील अल-दफ्रा एअरबेसवर उतरेल. इंधनाच्या सर्व तांत्रिक तपासणीनंतर राफेल विमान थेट भारतात अंबाला एअरबेसवर येतील.

Related Stories

मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा; शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत

Abhijeet Shinde

मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी बिरेन सिंग निश्चित

Omkar B

सांगली : शहरात घरफोडीचे सत्र सुरू; बंद बंगला, फ्लॅट फोडला

Sumit Tambekar

भारतीय वंशाचा डॉक्टर न्यूयॉर्कचा आरोग्य आयुक्त

Patil_p

तामिळनाडूत आणखी एका विद्यार्थिनीचा मृत्यू

Patil_p

सिद्धूंनंतर आता केजरीवालांचे ‘पंजाब मॉडेल’

Patil_p
error: Content is protected !!