Tarun Bharat

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार?

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत-फ्रान्समधील राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची एक धक्कादायक बाब एका फ्रेंच वेबसाईटने समोर आणली आहे. 

फ्रेंच मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राफेल बनवणाऱ्या दसाँ एव्हिएशनने भारतातील एका मध्यस्थाला भेट म्हणून 1 दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार 8 कोटी 62 लाख रुपये दिले आहेत. या अहवालानंतर राफेलच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

दरम्यान, ऑक्टोबर 2018 मध्ये फ्रान्सची सरकारी वकील संस्था पीएनएफला राफेल करारातील घोटाळ्याप्रकरणी अलर्ट मिळाला होता. त्यावेळी कंपनीच्या 2017 च्या खात्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान ‘ग्राहकाला भेटवस्तू’ या नावावर 5,08925 यूरोच्या खर्चाची माहिती मिळाली. हा खुलासा झाल्यानंतर या पैशांचा वापर राफेल विमानांचे 50 मोठे मॉडेल तयार करण्यासाठी झाला होता, असे दसाँ एव्हिएशनने स्पष्टीकरण दिले. मात्र, अशी कोणतीही मॉडेल तयार करण्यात आली नसल्याने समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी हा शस्त्रास्त्रांचा दलाल असून, सध्या तो आणखी एका शस्त्रास्त्र व्यवहारातील घोटाळ्याचा आरोपी असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

सर्वांना कोरोना लस मोफत

Patil_p

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या : मुख्यमंत्री

prashant_c

जी -7 परिषदेत वाढले भारताचे महत्त्व

Patil_p

”शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली”

Archana Banage

इफ्फी : आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडिया का वापरत नाही?

Archana Banage

चांदणी चौकातील वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता

datta jadhav
error: Content is protected !!