Tarun Bharat

राफेल विमान खरेदी प्रकरण पुन्हा चर्चेत

  • काँगेसकडून भ्रष्टाचाराचा आरोप, भाजपचा प्रतिवार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताने फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून खरेदी केलेल्या अत्याधुनिक युद्धविमान खरेदीत दलाली दिली गेल्याचा कथित आरोप फ्रान्समधील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँगेसने नव्याने केला. या प्रकरणाची चौकशी केल्यास सर्व पितळ उघडे पडेल असे काँगेसने म्हटले आहे. मात्र भाजपने हे आरोप निराधार असल्याचे  प्रतिपादन करत, विरोधक शिळय़ा कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रत्यारोप केला आहे. पुन्हा हे प्रकरण तापणार अशी चिन्हे आहेत.

फ्रान्समधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालात या खरेदीत 1.1 दशलक्ष युरो (साधारणतः 7 कोटी रुपये) दलाली मध्यस्थांना दिली गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मध्यस्थाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तसेच दलाली रोख रकमेत नव्हे, तर भेटवतूंच्या माध्यमातून देण्यात आल्याचे म्हटले आहे. फ्रान्स सरकारने अद्याप या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हा अहवाल फ्रान्सच्या गुप्तचर विभागाच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तरी, त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

भारताकडून आरोपांचा समाचार

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. फ्रान्समधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. या प्रकरणावर भारतातील सर्वोच्च न्यायालयात सविस्तर चर्चा झाली आहे. न्यायालयाने चौकशी करण्याची आवश्यकता नाही असा निर्वाळा दिला आहे. इतकेच नव्हे, तर 36 पैकी 21 विमाने भारताला मिळालेलीही आहेत. तसेच फ्रान्स सरकारनेही यात कोणताही गैरप्रकार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रातील अहवाल खोटा असून फ्रान्समधील विविध शस्त्रनिर्मिती कंपन्यांमधील अंतर्गत स्पर्धेपोटी तो प्रसिद्ध केला गेला असावा. प्रसिद्ध झालेला अहवाल दिशाहीन असून केवळ डेसॉल्ट कंपनीच्या द्वेषापोटी तो तयार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन प्रसाद यांनी केले.

Related Stories

PM मोदी घेणार ओमिक्रॉनचा आढावा

datta jadhav

सलग चौथ्या दिवशी वाढल्या पेट्रोल – डिझेलच्या किंमती

Tousif Mujawar

तेलंगणात भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

युरो चलन वापरणाऱ्या देशांमध्ये महागाई 9.1% वर

Abhijeet Khandekar

अंत्यसंस्काराला नकार, श्राद्धाकरता 150 जण पोहोचले

Patil_p

सरसेनापती नियुक्त करणारा भारत 5 वा देश

Patil_p