Tarun Bharat

रामकृष्ण सेवा मंडळ साताराच्यावतीने मदत

प्रतिनिधी/ सातारा

रामकृष्ण सेवा मंडळ साताराच्यावतीने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यात आली. मंडळाच्यावतीने 50 बेडशीट तसेच लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या 100 कुटुंबाना जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. 

 सध्या देशासमोर कोरोनाचे भीषण संकट असून लॉकडाऊनमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. प्रशासन सज्ज असून त्यांना विविध सामाजिक संस्थांचा हातभार लागत आहे. साताऱयातील रामकृष्ण सेवा मंडळ हे नेहमीच अशा आपत्तीच्या काळात प्रशासनाला आणि संकटामुळे प्रभावित झालेल्यांना विविध प्रकारे मदत करत असते. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन विलगीकरण तसेच विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनाला मदत म्हणून रामकृष्ण सेवा मंडळाच्यावतीने प्रशासनाला 50 बेडशीट देण्यात आल्या. त्या तहसीलदार आशा होळकर, नायब तहसीलदार कोळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी नंदकुमार सावंत, डॉ. शैला कापरे, संजय माने, नरेश जाधव उपस्थित होते.

 देशभर असलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन प्रभावित झाले असून त्याचा सर्वात जास्त फटका हातावरचे पोट असणारे आणि कामगारांना बसत आहे. त्यासाठी मंडळाच्यावतीने कोडोली, एम.आय.डी.सी. परिसरातील समर्थनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱया 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट देण्यात आले. त्यात गहू, तांदूळ, चहा, साखर, तूरडाळ, मूगडाळ, तेल, तिखट, मीठ इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. यासाठी तहसीलदार आशा होळकर, गौड, सेवामंडळाचे राजेंद्र जाधव, नरेश जाधव, गिरीश ठेंबरे यांनी सहकार्य केले.

Related Stories

पालघरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण, आईची चाचणी मात्र निगेटिव्ह

Tousif Mujawar

रुपाली चाकणकर पक्ष सोडून जाणार होत्या मी त्यांना थांबवल- चित्रा वाघ

Archana Banage

सोनगाव कचरा डेपोला आग

Patil_p

सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे भ्रष्टाचारी माणूस’; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Abhijeet Khandekar

कोल्हापूरकर संतापले; पालकमंत्री दीपक केसरकरांना अंबाबाई मंदिरात अडवलं

Archana Banage

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त!

Tousif Mujawar