Tarun Bharat

रामतीर्थनगरमधील अतिक्रमण हटवून जागेचा ताबा

तब्बल 22 वर्षांनंतर बुडाची कारवाई : ताबा देण्यास जमीनमालकाचा विरोध : 16 गुंठे जागा अल्पसंख्याक खात्याला सुपूर्द

प्रतिनिधी /बेळगाव

रामतीर्थनगर योजनेसाठी 1995 मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. यापैकी 20 गुंठे जागा नागरी सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र सदर जागेचा ताबा बुडाने तब्बल 22 वर्षांनंतर शुक्रवारी घेण्याचा प्रयत्न केला. सदर जागेची नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा दावा करून ताबा देण्यास जमीन मालकांनी आक्षेप घेतला. पण भूसंपादन प्रक्रियेची कागदपत्रे दाखवून जागेचा ताबा घेऊन अल्पसंख्याक खात्याकडे सुपूर्द करण्यात आला.

बुडाने रामतीर्थनगर योजना राबविण्यासाठी 1995 मध्ये कणबर्गी परिसरातील शेतकऱयांची पिकाऊ शेतजमीन संपादित केली होती. तसेच परशराम कोलकार यांची 20 गुंठे शेतजमीन संपादित केली होती. मात्र ही जागा नागरी सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण जागेची नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा दावा करून ताबा देण्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे सदर जागेचा ताबा जागा मालकांकडेच होता. तसेच सातबारा उताऱयावर जागामालकाचे नाव होते. मात्र तब्बल 22 वर्षांनंतर जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न बुडा प्रशासनाने शुक्रवारी केला. 20 गुंठे जागा नागरी सुविधांसाठी राखीव असल्याचे सांगत सदर जागेपैकी 16 गुंठे जागेचा ताबा अल्पसंख्याक खात्याकडे देण्याचा प्रयत्न झाला. पण जागेचा ताबा घेण्यास जागामालक अक्षय परशराम कोलकार यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी केईबी स्टेशन तयार करण्यासाठी 20 गुंठे जागा संपादीत करण्यात आली आहे. आता पुन्हा ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वच जागा संपादित केल्यास उदरनिर्वाह कसा करायचा, असा मुद्दा उपस्थित केला. दलित समाजातील कुटुंबांसाठी शासनाकडून जागा दिली जाते. पण या ठिकाणी उलट घडत आहे. दलित समाजाच्या जागा बळकावण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप अक्षय कोलकार यांनी केला. तसेच जागेचा ताबा देण्यास विरोध केला.

आक्षेप असल्यास न्यायालयात दाद मागा…

मात्र भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, 1 लाख 30 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे सांगत जागेचा कब्जा घेतला. तसेच जागा देण्यास आक्षेप असल्यास न्यायालयात दाद मागा, असे सांगून बुडाच्या अधिकाऱयांनी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या ठिकाणी लावण्यात आलेले फलक हटवून जागेचे मोजमाप करून 20 गुंठय़ापैकी 16 गुंठे जागा अल्पसंख्याक खात्याला सुपूर्द केली.

Related Stories

मण्णूर येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Patil_p

बेंगळूर: महापालिका आयुक्तांची सण साजरे करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जरी

Archana Banage

स्मार्टसिटीची कामे तातडीने पूर्ण करा

Patil_p

बसथांबा प्रवाशांसाठी की पार्किंगसाठी?

Amit Kulkarni

रामदुर्ग येथे 9 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

Amit Kulkarni

चक्क गटारीमध्येच डेनेज चेंबर; अयोग्य नियोजनाचा फटका

Patil_p
error: Content is protected !!