Tarun Bharat

रामनगर ग्रा. पं. अध्यक्षपदी रोहिणी भोसले

Advertisements

उपाध्यक्षपदी निकिता जगोडकर यांची निवड

वार्ताहर / रामनगर

रामनगर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक बुधवारी दुपारी 3 वाजता ग्रामपंचायतीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदी भाजपच्या रोहिणी भोसले तर उपाध्यक्षपदी निकिता जगोडकर यांची निवड करण्यात आली. त्यामुळे रामनगर ग्रां. पं. वर भाजपचा झेंडा फडकला आहे.

अध्यक्षपदासाठी रोहिणी भोसले व शोभा देसाई या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यामुळे 21 पैकी 11 मते रोहिणी भोसले यांना मिळाली तर उपाध्यक्षपदासाठी निकिता जगोडकर व त्यांच्या विरोधात किशोरी परवार यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये निकिता जगोडकर यांना 11 मते मिळाल्याने त्यांना उपाध्यक्षा घोषित केले.

यावेळी निवडणूक अधिकारी अनंत पाटील तसेच सहकारी शर्शल मोदी व रामनगर ग्रा. पं. अभिवृद्धी अधिकारी राजू तलवार यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी भाजपच्या सदस्यांची निवड होताच कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना भाजप तालुका अध्यक्ष संतोष रेडकर म्हणाले, रामनगर जि. पं. क्षेत्रात सातपैकी पाचमध्ये आम्ही बहुमत मिळविले आहे. रामनगरमध्ये शिवाजी गोसावी यांच्या नेतृत्त्वाखाली 8 तर संभाजी गवाळकर यांच्या नेतृत्वाखाली 3 असे एकूण 11 सदस्य भाजपचे असल्याने भाजपला बहुमत मिळाले आहे.

Related Stories

लोकसंख्या नियंत्रणाबाबत जागृती उपक्रमास प्रारंभ

Patil_p

सामाजिक कार्यकर्त्यांकडून विक्रेत्या महिलांना न्याय

Amit Kulkarni

प्रेंड्स सर्कलतर्फे सुनीता देशपांडे-बुद्धय़ाळकर यांना श्रद्धांजली

Patil_p

आज घरोघरी होणार तुळशी विवाह

Omkar B

रांगोळी रेखाटून थोरपुरुषांना अभिवादन

Patil_p

विविध बँकांकडून आयसोलेशन सेंटरला मदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!