Tarun Bharat

रामनगर-धारवाड मार्गावर कारची झाडाला धडक : दोघेजण जखमी

Advertisements

रामनगर : रामनगर-धारवाड मार्गावर झाडाला धडकून वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी रामनगर येथून गदग येथे जाणारी कार कोडगई क्रॉसनजीक रस्त्याच्या शेजारील झाडाला धडकल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे दाखल करण्यात आले.

  सदर मार्ग अरुंद असून मोठय़ा प्रमाणात येथे वळणे आहेत. या मार्गावर शेकडो वाहने झाडाला धडकून अनेकांनी प्राणही गमावले आहेत. तर धोकादायक वळणावर अनेक अपघात होऊन देखिल या वळणावर साधे सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत असून बऱयाच ठिकाणी डांबरी रस्त्याशेजारील कडाही भरण्यात आल्या नाहीत. परंतु जीव्हीआर नामक कंपनीकडून या मार्गावर दोन ठिकाणी टोल वसूल केला जातो. अळणावरनजीक टोल नाक्यावर रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत सदर रुग्णवाहिका अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना घेण्यासाठी एकदाही गेली नाही. त्यामुळे अपघात झाल्यावर 108 रुग्णवाहिका अन्य ठिकाणी गेल्यास खासगी वाहनातून अथवा सदर मार्गावरून ये-जा करणाऱया वाहनातून जखमींना दवाखान्यात नेण्यात येते. त्यामुळे यापुढे तरी टोलशेजारी शोभेची वस्तूप्रमाणे ठेवण्यात आलेली रुग्णवाहिका अपघात ठिकाणी पाठविण्याची मागणी या भागातील टोल भरणाऱया वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. 

Related Stories

ऑटोरिक्षात गांजा विकणाऱया जोडगोळीला अटक

Patil_p

ओव्हर ब्रिजवरील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

स्कायटच आनंद अकादमी,सिग्नेचर विजयी

Amit Kulkarni

हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Patil_p

वृद्धाला दिला आसरा, संजय पाटील यांच्या माणुसकीचे कौतुक

Patil_p

ग्राहकांना बसला वीज बिलाचा शॉक

Patil_p
error: Content is protected !!