Tarun Bharat

रामनगर येथील शुभलक्ष्मी पेट्रोलियम येथे फिनो पेमेंट बँकेचे उद्घाटन

रामनगर :

रामनगर-दांडेली राज्य मार्गावरील शुभलक्ष्मी पेट्रोलियम येथे फिनो पेमेंट बँकेचे उद्घाटन नुकतेच भारत पेट्रोलियम मेंगलोरचे टेरीटोरी को-ऑर्डिनेटर गोरक्षनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर फिनो पेमेंट बँकेमार्फत ग्राहकांना बचत खाते, चालु खाते, कॅश डिपॉझिट, लोन पेमेंट, एटीएम, इन्स्टंट मनी ट्रान्स्फर, व्हेईकल इन्शुरन्स, ईएमआय पेमेंट, फास्ट ट्रक, इलेक्ट्रिकल बिल भरणा, इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.

सदर कार्यक्रमप्रसंगी फ्लिट कार्डाचे वितरण बीपीसीएल मेंगलोरचे फ्लिट सेल मॅनेजर गिरीशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बीपीसीएलचे सेल्स मॅनेजर उडपीचे श्राव्या मॅडम, सिनी. मॅनेजर सोमलता मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमास रामनगर परिसरातून क्रशर मालक, वाहतूकदार, क्वॉरी मालक, त्यांचे मॅनेजर व स्टाफ मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमानंतर सुधा प्रभाकर दळवी यांचे स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व कोविड चेकअप रामनगरच्या शासकीय मेडिकल ऑफिसर डॉ. सुजाता उकळी व राजू कटकोळ यांनी 87 जणांची आरोग्य तपासणी पूर्ण केली.

याप्रसंगी शुभलक्ष्मी पेट्रोलियमचे जगदीश हरळीकर, अशोक यार्दी, अक्षय यार्दी, अजिंक्य हरळीकर, सुप्रिया यार्दी व इतर उपस्थित होते. दोन्ही स्तुत्य उपक्रमाबद्दल शुभलक्ष्मी पेट्रोलियम व्यवस्थापनाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Stories

पाण्याचा पत्ता नाही; मात्र पाणीपट्टी हवी अॅडव्हान्स!

Amit Kulkarni

कामतगा येथे जलजीवन योजनेमुळे रस्त्याची वाताहत

Amit Kulkarni

भारतीय संस्कृती, सामाजिक, धार्मिक चिंतनासाठी कल्याण मंडप उपयोगी

Omkar B

शिवराय खरे लोकशाहीवादी राजे

Omkar B

घरकुल प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करा

Omkar B

आरक्षणासाठी 11 डिसेंबरला बेंगळूरला आंदोलन

Amit Kulkarni