Tarun Bharat

राममंदिराची बांधणी ‘नागर’ शैलीत होणार

प्रमुख वास्तूरचनाकारांचे प्रतिपादन,  भव्यतेसमवेतच आकर्षकता हे वैशिष्टय़

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी होणारे भव्य राममंदीर भारतभर लोकप्रिय असलेल्या ‘नागर’ शैलीत निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख वास्तूरचानाकार अशिश सांमपुरा यांनी केले आहे. या मंदिराची उंची 161 फूट असेल. त्यात 360 स्तंभ असून ते तीनमजली असेल असे सांगण्यात आले. विस्तृत पायावर पुढे निमुळती होत जाणारी रचना हे नागर शैलीचे वैशिष्टय़ आहे. मंदिरनिर्मिती वास्तूशास्त्राच्या तत्वानुसार केली जाणार आहे.

मंदीर अधिक भव्य करण्यासाठी त्याच्या मूळ आरेखनात अल्प परिवर्तन करण्यात आले आहे. मूळच्या आरेखनानुसार त्याला दोन मजले, तीन मंडप आणि एक शिखर असणार होते. मात्र नव्या आरेखनानुसार त्याला पाच मंडप आणि एक शिखर असेल. तसेच त्याचे गर्भगृहसुद्धा हिंदूंच्या पद्धतीनुसार अष्टकोनी आकाराचे केले जाणार आहे.

स्तभसंख्येतही वाढ

मंदिराच्या मूळ आरेखनात 212 स्तंभ होते. मात्र नव्या आरेखनानुसार स्तभांची संख्या 360 असेल. मंदिराची उंची वाढविण्यात आल्याने त्याचा विस्तारही वाढविण्यात आल्याचे सोमपुरा यांनी स्पष्ट केले. मुख्य मंदिराचे क्षेत्रफळ 10 एकर असून ऊर्वरित 57 एकर भूमीत मंदिरांचे संकुल उभारण्यात येणार आहे. जुन्या काळात मंदिरांमध्ये नृत्य आणि नाटय़ यासाठी मंडप असत. तथापि, विद्यमान परिस्थितीत हे मंडप प्रभू रामचंद्रांचे तीन बाजूंनी दर्शन घेण्यासाठी उपयोगी असतील.

Related Stories

दक्षिण भारतात सलग 26 दिवस मुसळधार, Red Alert जारी

Archana Banage

आता आधारप्रमाणेच मिळणार युनिक हेल्थ कार्ड

datta jadhav

उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना अटक

Patil_p

तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन हंड्रेड डेज्’

Patil_p

संसदेतील गोंधळ सुरूच

Patil_p

कॅबिनेट सचिव गौबांचा कार्यकाळ वाढला

Patil_p
error: Content is protected !!