Tarun Bharat

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तोंडावर अयोध्येत कोरोनाची धडक!

  • राम मंदिरातील पुजारी; 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग 
Advertisements

ऑनलाईन टीम / अयोध्या : 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी जवळपास 200 जणं उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी सुरू असतानाच अयोध्येतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, राम जन्मभूमीच्या पुजाऱ्यांसह 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रदीप दास असे या पुजाऱ्यांचे नाव असून ते आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य आहेत. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

तसेच राम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या 16 पोलीस कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत. या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.   

Related Stories

रेल्वे हरवणार कोरोनाला

datta jadhav

प्रेस स्वातंत्र्याच्या निष्कर्षावर केंद्रसरकार सहमत नाही : माहिती आणि प्रसारण मंत्रालय

Sumit Tambekar

भारतातील लोकशाही केवळ काल्पनिक!

Omkar B

आनंद आहे! पवारांना ब्राह्मणांची आठवण आली: देवेंद्र फडणवीस

Rahul Gadkar

जनसंपर्क हेच भाजपचे बलस्थान

Patil_p

खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपकडून चिडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर – जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!