Tarun Bharat

रामलिंग खिंड गल्लीत घराची भिंत कोसळली

जाणूनबुजून घराच्या पायाला धक्का पोहोचविल्याचा आरोप

प्रतिनिधी /बेळगाव

पाया खणताना कंत्राटदार व जागामालकाच्या दुर्लक्षपणामुळे शेजारच्या घराची भिंत कोसळल्याची घटना शनिवारी रामलिंग खिंड गल्ली परिसरातील घडली. केवळ सुदैवाने आई व दोन मुली बचावल्या आहेत. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

रामलिंग खिंड गल्ली येथील मीना निंगोजी तारिहाळकर यांच्या घराची भिंती कोसळल्या आहेत. ही घटना घडली त्यावेळी मीना, त्यांच्या मुली दीपा व उषा घरातच होत्या. आणखी एक मुलगी रुपा ही मंदिराला गेली होती. पोलीस व स्थानिक नागरिकांनी या मायलेकींना घरातून सुखरूप बाहेर काढले.

मीना यांच्या घराशेजारी बांधकामासाठी पाया खणण्याचे काम सुरू आहे. पाया खणताना मीना यांच्या भिंतीच्या पायाचे दगडही काढण्यात आले आहेत. त्यामुळे पाया खचून भिंत कोसळली आहे. मीना यांनी जागामालक व कंत्राटदार यांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पाया खणण्यापूर्वी शेजाऱयांनी त्यांना ‘तुमची मालमत्ता आम्हाला विकणार का?’ अशी विचारणा केली होती. मालमत्ता विकण्यास मीना यांनी नकार दिला होता. त्यामुळे जाणूनबुजून भिंतीचे दगड काढण्याचा प्रकार घडला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वेळीच मीना व त्यांच्या दोन मुलींना बाहेर काढले नसते तर जीवितहानीचा प्रकार घडला असता. खडेबाजार पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. जाणूनबुजून भिंतीच्या पायाचे दगड काढल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप मीना तारिहाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Related Stories

‘कोविड-19’ एका वेगळय़ा विश्वाचे भान

Patil_p

बसचे वेळापत्रक विस्कळीत

Patil_p

कंग्राळी खुर्द येथे गांजा विकणाऱया युवकाला अटक

Patil_p

शनिवार खूट येथे पाणी गळती

Amit Kulkarni

हलत्या देखाव्यांमधून साकारली पराक्रमाची गाथा

Amit Kulkarni

केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेजची ‘आयडिया लॅब’ निर्मितीसाठी निवड

Amit Kulkarni