Tarun Bharat

रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयात 9 मार्चला सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून संरक्षित करण्यासंबंधीच्या याचिकेवर  9 मार्च रोजी सुनावणी करण्याचे आश्वासन सरन्यायाधीशांनी दिले आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मागील वषी 8 मार्च रोजी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी झाली नसल्याने आता येत्या 9 मार्च रोजी सुनावणी घेण्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मान्य केले आहे.

रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. संपुआ सरकारच्या काळात सुरू झालेल्या सेतू समुद्रम प्रकल्पांतर्गत जहाजांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याकरता रामसेतू पाडण्यात येणार होता. नंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. दरम्यान, केंद्राने रामसेतूचे अस्तित्व मान्य केले आहे. 2017 मध्ये संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती, परंतु त्यानंतर काहीही झाले नाही, असे स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

मूल्यांकन परीक्षेला हिरवा कंदील

Patil_p

केरळ दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांना धमकी

Patil_p

नाम जपो… किरत करो!

Patil_p

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Archana Banage

उत्तराखंडात रविवारी 243 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!