Tarun Bharat

राम नवमी निमित्त शहरात उद्या शोभा यात्रेचे आयोजन

रामभक्तांना सहभागी होण्याचे हिंदुत्ववादी संघटनाचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी

रामनवमी दिनी रविवारी हिंदुत्ववादी संघटना आणि रामभक्तांच्या वतीने शहरात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत शहरासह जिल्हय़ातील सर्व रामभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे, हिंदू एकताचे संजय साडविलकर, ज्येष्ठ शिवसैनक उदय भोसले, प्रकाश सरनाईक, पतित पावनचे महेश उरसाल, सुनील पाटील यांनी केले आहे.

हिंदूत्वादी संघटनांचे पदाधिकारी आणि रामभक्तांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत शोभा यात्रेच्या आयोजनाची माहिती दिली. बंडा साळुंखे यांनी सांगितले की, अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळाली. त्यानंतर रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट आले. त्यामुळं रामनवमी उत्सव साजरा करता आला नव्हता. पण कोरोनाच्या संकटकाळात हिंदूत्वादी संघटना, कार्यकर्त्यांनी गोरगरीबांना अन्नदान, धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्य पुरविले. रूग्णांच्या नातेवाईकांना भोजन दिले. गायीसह मुक्या जनावरांनाही चारा दिला. यंदा कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर रामनवमी उत्सवाचे नियोजन केले आहे. रविवारी 10 एपिल रोजी रामनवमीच्या दिवशी शहरात भव्य शोभा यात्रा आयोजित केली आहे. शहरासह जिल्हय़ातील रामभक्तांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे. रविवारी दुपारी तीन वाजता शहरातील मुख्य मार्गावरून शोभा यात्रेचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी आणि परत छत्रपती शिवाजी महाराज चौक असा शोभा यात्रेचा मार्ग आहे. पत्रकार परिषदेला सनी पेडणेकर, सिद्धार्थ कटकधोंड, अनिल चोरगे, हिंदूराव शेळके, विलास मोहिते, गजानन तोडकर, सुरेश काकडे, राजेंद्र सूर्यवंशी, अवधूत भाटय़े आदी हिंदूत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

गळीत हंगाम सुरु करण्यास कारखान्यासमोर पावसाची अडचण

Archana Banage

कोल्हापूर : टाकळीवाडीनजीक कर्नाटक बनावटीच्या दारु जप्त

Archana Banage

लॉकडाऊनमुळे दिल्लीसह 90 शहरांमधील प्रदूषण घटले

prashant_c

कोल्हापूर : सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रसाद उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांचे दुःखद निधन

Archana Banage

हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 1083 वर

Tousif Mujawar

सदावर्ते यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Archana Banage