Tarun Bharat

राम शिंदेसोबत अजित पवारांचे गुफ्तगू

अहमदनगर /प्रतिनिधी

आमदार रोहित पवार यांचे राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गोपनीय बैठक झाली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान रोहित पवारांनी राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मतदार संघातून पराभव केला होता.

दरम्यान, विद्यमान आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी आमदार राम शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. दरम्यान अंबालिका कारखाना हा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येतो. अजित पवार नेहमी या कारखान्यावर येत असतात. येथील त्यांचा दौराही गोपनीय असतो. याच मतदारसंघातून रोहित पवार हे राम शिंदे यांना पराभूत करून आमदार झाले आहेत. शनिवारी सकाळी पवार या कारखान्यावर असताना शिंदे तेथे आले. दोघांची गोपनीय बैठक झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी या भेटीस दुजोरा दिला. शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात, असे असताना त्यांनी पवार यांची भेट का घेतली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

राज्यात जिल्हानिहाय मेडिकल कॉलेज उभारणार

datta jadhav

काळमवाडी येथे विहिरीत पडून बिबट्याच्या पिलाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

जीएसटी परिषदेच्या शिफारशी केंद्र-राज्यांवर बंधनकारक नाहीत- सर्वोच्च न्यायालय

Archana Banage

मुंबै बॅंकप्रकरणी दरेकरांची चौकशी

Archana Banage

”व्वा! मोदीजी व्वा ! खासदार पण महागाईमुळे चूल वापरायला लागले”

Archana Banage

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीला मनाई

Archana Banage