Tarun Bharat

रायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू , ४० जण बेपत्ता

Advertisements

रायगड/प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या तळई गावात दरड कोसळून ३६ जण ठार झाले आहेत. तसेच दरडीच्या ढिगाऱ्याखाली अजून ८० ते ९० जण दबले आहेत. घटनास्थळी स्थानिक, अग्नीशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफ मदतकार्य सुरु आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तळई येथे ३२ जणांचा तर साखर सुतार येथे चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.

घटनास्थळाचा ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले भेट दिली आहे. यावेळी त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर घटनास्थळी

Related Stories

गणेशोत्सवात चार नियमित गाडय़ा दीड वर्षानंतर रूळावर!

Patil_p

जिल्हय़ात आता ग्रामस्तरावरही सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन

Patil_p

आशिये येथील लक्ष्मी खानोलकर यांचे निधन

NIKHIL_N

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रातील बाधितांनी ओलांडला 21 लाखांचा टप्पा!

Tousif Mujawar

रत्नागिरी : टेम्पो कठड्यावर आदळून चालक ठार

Archana Banage

पंढरपूरहून तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानकाकडे विशेष रेल्वे रवाना

Archana Banage
error: Content is protected !!