Tarun Bharat

रायबंदर येथील आरोग्य केंद्रासाठी सरकारकडे घालणार साकडे

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

रायबंदर येथे पूर्णक्षमतेचे आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी घेऊन नगरसेवक रूपेश हळर्णकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने महापौर उदय मडकईकर व मनपा आयुक्त संजीत रॉड्रीग्स यांची भेट घेतली. परंतु सदर मागणीला मान्यता मिळण्यापेक्षा सदर भेटीत दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि पूर्णक्षमतेच्या आरोग्य केंद्रासाठी सरकारकडे सदर शिष्टमंडळाने साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे.

  मागील कितीतरी वर्षे रायबंदर येथील आरोग्य केंद्र बंद आहे. सदर केंद्राचे नूतनीकरण करून उत्तम सुविधांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्प स्मार्टसिटी पणजीअंतर्गत केले जाणार आहे. त्यातील हा प्रकल्प सर्वात महत्त्वाचा आहे. सुमारे 217 चौ.मी जागेत नवीन आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली असून आयरिश रॉड्रीग्स व इतर आक्षेप घेत आहेत.  काम सुरू होण्यापूर्वी यांनी का आक्षेप घेतला नाही. जर प्रकल्प नको होता तर त्याचवेळी त्यांनी आक्षेप घेणे आवश्यक होते असे महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी सांगितले.

रायबंदर येथे 24 तास कार्यरत असणारे आरोग्य केंद्र स्थापित करून त्यात 10 खाटांची क्षमता, एक्स रे, सोनोग्राफी, सीटी-स्कॅन, एमआरआय व अन्य वैद्यकीय सुविधा असण्याची गरज आहे. सदर आरोग्य केंद्र झाले तर याचा फायदा रायबंदर, चोडण, दिवाडी, मेरशी, चिंबल व आसपासच्या गावांना होणार. त्यामुळे या भागात पूर्णक्षमतेचे आरोग्य केंद्रासाठी बांधण्यासाठी सरकारकडे चर्चा करणार असून लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिवांना भेटणार आहोत अशी माहिती ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी दिली. सदर जागा सरकारची असल्याने सरकारने लोकांसाठी ही जागा वापरावी असेही रॉड्रीगीस यांनी पुढे सांगितले.

Related Stories

विमानतळ केवळ विमानांसाठी नव्हे, संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी!

Patil_p

संचारबंदीचा आदेश सत्तरी तालुक्मयात फक्त कागदपत्री

Amit Kulkarni

मास्क न वापरणाऱया मुख्यमंत्र्यांनाही अटक करावी

Omkar B

डिचोली तालुक्यात 75 टक्के मतदान.

Patil_p

कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न सोडवा

Amit Kulkarni

जत्रोत्सवांवर कोरोनाचे नियंत्रण

Patil_p
error: Content is protected !!