●धोम धरणावर सुरक्षा ऐसीतैशी
●हुल्लडबाजी करणाऱ्यांची होतेय गर्दी
विशाल कदम/सातारा
जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 ला स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर ठिकाण. या रायरेश्वर मंदिराला मोठे महत्व आहे. हे ठिकाण सातारा आणि पुण्याच्या सीमेवर आहे. दक्षिण बाजूला सातारा जिल्ह्यातील जांभळी खोरे तर पलीकडे पुणे जिल्ह्यातील भोर खोरे.पठारावर विविध रंगांची फुले फुलल्याने हा रायरेश्वराचा पठार वेगळाच स्वर्ग वाटू लागला आहे. येथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉक डाऊनच्या काळात मंदिर बंद असले तरी पठारावर मज्जा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. प्रशासनाचे या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वाई पोलिसांची अलीकडच्या भागात वास्तविक गस्त होणे अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केल्या.तर रायरेश्वर येथे भोर पोलिसांकडून कडक गस्त राबविण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
रायरेश्वर हे ठिकाण पुणे जिल्ह्यात येत असले तरी पायथ्यापासून सातारा जिल्ह्याची हद्द आहे. रायरेश्वर खिंडीतून रायरेश्वरला जाता येते. रायरेश्वरचे मंदिर असल्याने श्रावणात येथे गर्दी होत असते. तशी येथे नेहमीच गर्दी होत असते. रायरेश्वरच्या पठारावर सध्या विविध रंगी फुले फुलली आहेत. त्यांचा नजरा पाहून मन हरवून जाते. या पठारावर धानदरा, गायदरा, गणेशदरा, सांबरदरा, लोहदरा, वाघदरा, खाळप्याचा दरा, कुडकीचा दरा, नाकिंदा दरा(अस्वल खिंड), सोंड दरा, निशाणी दरा, वीर दरा, खाकरा दरा असे पॉईंट आहेत.
पठारावर एक तळे पावसाने भरले आहे तर रानटी फुलांच्या अफलातून नजारा दृष्टीस पडतो.पेव्हर वन विभागाने तेथे गस्ती चौकी सूरु केली आहे.मात्र, ही चौकी बंद असते.लॉक डाऊनच्या काळात येथे वनविभागाने आणि पोलिसांनी गस्त वाढवून गर्दीने येणाऱ्यांना मनाई केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.दरम्यान, रायरेश्वरला रस्ता करावा अशी मागणी गोपाळ जंगम यांनी केली आहे.

