Tarun Bharat

रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम व जागता पहारा

प्रतिनिधी/ सातारा

31 डिसेंबर म्हटलं की पाटर्य़ा, नववर्षाच्या नावाखाली धांगडधिंगाना अशीच काही प्रथा रूढ होत आहे.असे असतानाच या सर्व प्रकारांना बगल देत वाई येथील शिवसह्याद्री करिअर अकॅडमी आणि भटकंती सह्याद्रीची परिवाराने महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या श्री क्षेत्र रायरेश्वर पठारावर स्वच्छता मोहीम राबवत गड परिसर चकाचक करून समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला आहे.20 पोती कचरा गोळा करण्यात आला.तर 31 डिसेंबर ला खडा पहारा ही ठेवण्यात आला होता.

अलीकडे पाश्चत संस्कृतीचे प्रत्येकजण आत्मसात करताना दिसतो आहे.कोणी काय करावं आणि कोण काय करू नये याला मनाई करता येत नाही हे जरी असले तरी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले.स्वराज्यासाठी गडकिल्ले उभे केले.त्याच गडकिल्ल्यावर जाऊन काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक चुकीचे वर्तन करतात.31 डिसेंबर ला असे कृत्य रायगड परिसरात होऊ नये या करता वाई येथील युवक गेले होते.31 डिसेंबर निमित्त रायरेश्वर येथे स्वच्छता मोहिम राबविली. तसेच जे इंग्रजी नववर्ष साजरा करण्यासाठी गडावर पाटर्य़ा करायला येतात, दारु प्यायला येतात अशा लोकांना रोखण्यासाठी शिवसह्याद्री व भटकंती सह्याद्रीच्या सदस्यांनी जागता पहारा ठेवला होता.

स्वच्छता मोहिमेत प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या प्लास्टिकच्या पिशव्या, गुटख्यांचे पॅकेट्स, दारूच्या बाटल्या गोळा करून पाचाड येथे आणले. या मोहिमेत 50 सदस्य सामील झाले होते. तसेच या स्वच्छता मोहिमेमध्ये रायरेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक जगताप हे देखील सामील झाले.

यावेळी महादेव मंदिर परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. नंतर गोमुख कुंड परिसर, मंदिरापासून ते शिडीपर्यंतच्या मार्गातील सर्व कचरा उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या मार्गामध्ये सुमारे 20 पोती कचरा गोळा केला. यानंतर स्वच्छता मोहिमेध्ये सामिल झालेल्या शाळेतील लहान मुलांना अनिल वाशिवले यांच्या तर्फे दिलेला खाऊ आणि पुस्तक वाटप करण्यात आले.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या सहकार्याने शिडीमार्गत असलेल्या चेकपोस्ट वर येणाया पर्यटकांची नाव नोंदणी व तपासून त्यांना पुढे सोडले गेले.

परिवाराच्या सदस्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत जागता पहारा दिला.या मोहिमेत शिवसह्याद्री करिअर अकॅडमीचे खरात आणि वाई वनविभागाचे वनरक्षक प्रदीप जोशी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Related Stories

‘बेटी बचाओ’चा संदेश देत चार हजार किलोमीटर प्रवास

Patil_p

सातारा : ट्रक पलटी होऊन एकजण जखमी

Archana Banage

जिल्ह्याच्या बाधित सरासरीत घट

datta jadhav

मृत झालेल्या कोरोना रूग्णावर अंत्यसंस्कारासाठी गट निहाय स्मशानभूमीची व्यवस्था करा

Archana Banage

निवृत्त जवानाच्या खात्यांवरील साडे पाच लाख लांबवले

Patil_p

आ. शिंदेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

datta jadhav