Tarun Bharat

राशिभविष्य

Advertisements

रवि. दि. 21 ते 27 जून 2020

मेष

चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात तुम्हाला यश मिळेल. सुधारणा करता येईल. नोकरीत वरि÷ांच्या मर्जीनुसार कामे कराल. तुम्हाला बढतीची दिशा मिळेल. घरातील तणाव कमी होईल. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकाना नमवाल. तुमचे ध्येय साध्य करता येईल. कला, साहित्यात उत्तम प्रतीचे कार्य करून दाखवाल.

वृषभ

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यातील कोणतीही अडचण सोडवता येईल. आळस न करता कठीण कामे पूर्ण करा. ओळखीचा उपयोग होईल. नोकरीत तुमचे काम कौतुकास्पद ठरेल. घरातील क्यक्तींना खूष कराल. सुखद समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व द्या. लोकांच्या सेवेचे व्रत चालू ठेवा. तुम्हाला त्याचाच उपयोग होईल. कला क्षेत्रात प्रगती कराल.

मिथुन

चंद्र, बुध युती, चंद्र, मंगळ  त्रिकोण योग होत आहे. नोकरीतील अधुरे स्वप्न पूर्ण होईल. बढतीचे काम होऊ शकेल. धंद्यात कायदा पाळा. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप दूर करून योग्य काम करता येईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. मोहाला बळी पडू नका. घरातील व्यक्तीचे व स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनाने मनस्ताप होईल.

कर्क

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव, वाद होईल. सर्व ठिकाणी सावध रहा. कायदा मोडू नका. नोकरीत कामाचे बाबतीत चूक होऊ शकते. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक  कार्यात तुमचा अहंकार तुम्हाला अधिक संकटात टाकेल. नम्र रहा. जनहिताचे कार्य करा. प्रति÷sचा विचार न करता, धंद्यात गोड बोला.  वसुलीचा प्रयत्न करा.

सिंह

चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. नोकर मिळतील. रागाचा पारा वाढू शकतो. दुखापत टाळा. नोकरीत तुमचे महत्त्व टिकवता येईल. चर्चा सफल होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रश्न सोडवण्याची पद्धत संयमाची व धाडसाची ठरेल. मदत केलेल्या माणसाला विसरू नका. प्रकृतीची काळजी घ्या. संसारातील समस्या कमी होईल.

कन्या

चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. फायदा वाढेल. शेअर्समध्ये थोडी गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा. नोकरीत प्रभाव राहील. कायद्याचे सर्वत्र पालन करा. राजकीय, सामाजिक कार्यात बुद्धिचातुर्याने समस्या सोडवा. स्वत:च्या प्रगतीच्या  दृष्टीने कामे करा. घरात क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रवासात घाई करू नका.

तुळ

चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. रेंगाळलेली कामे करून घ्या. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. कायद्याचे पालन करण्यास विसरू नका. नोकरी टिकवता येईल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात सुधारणा होईल. तुमच्याबद्दलचा गैरसमज कमी होईल. जास्त भरवसा कुणावरही ठेवू नका.

वृश्चिक

चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळवतांना गोड बोला. अहंकाराने नुकसान होईल. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीस कामाचा व्याप वाढेल. कमीपणा घ्यावा लागेल. राजकीय-सामाजिक कार्यास विरोधक तुमच्या  चुका दाखवतील. कायदा पाळा. वृद्धाची चिंता वाटेल. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्या. मित्राला मदत करताना कायदा मोडू नका.

धनु

चंद्र, गुरु प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात तडजोड करावी लागेल. चर्चा सफल होईल. नोकरीत  तुमचे महत्त्व वाढेल. बुद्धीचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नव्याने स्थान निर्माण करता येईल. वरि÷ तुमच्याकडे जबाबदारी देतील. जवळचे लोक अडकाठी आणण्याचा प्रयत्न करतील. राग वाढू शकतो.

मकर

सूर्य, शनि षडाष्टक योग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात समोरची व्यक्ती शब्द  फिरवण्याची शक्मयता आहे. चर्चा करताना तारतम्य राखा. गोड बोलून कामे करून घ्या. नोकरीतसुद्धा वरि÷ांचा रोष होऊ शकतो. कायद्याचे पालन  करून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला मदत करणारी व्यक्ती दुरावण्याची शक्मयता आहे. संसारात एकजूट राहील.

कुंभ

चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात खर्च वाढेल. चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.  नोकरी टिकवता येईल. नवीन ओळखीवर जास्त अवलंबून राहू नका. घरातील तणाव कमी होईल. खाण्या पिण्याची  काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. दुसऱयांना मदत कराल. साहित्य तयार होईल.

मीन

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. चर्चा संयमाने करा. प्रवासात घाई करू नका. दुखापत टाळा. नोकरीत दुसऱयाचे मत ऐकून घ्या. नम्र रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीची संधी मिळेल. लोकांच्या समस्या सोडवण्याचा उपाय शोधा. मदतकार्याला हातभार लावता येईल. कला, लेखन यात प्रगती कराल.

Related Stories

आजचे भविष्य 26-06-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि.11 नोव्हेंबर 2021

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य 23-04-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.23 डिसेंबर 2021

Patil_p
error: Content is protected !!