Tarun Bharat

राशिभविष्य

देवधर्मकेलातरीहीनचुकेकर्मगती…

पहिला भाग

बुध. दि. 24 ते 30 जून 2020

मी इतकी पूजा करतो, रोज इतका जप करतो, देवांना अभिषेक घालतो, गुरुचरित्र वाचतो, कुंकुमार्चन करतो, गुरुद्वारात जातो, चर्चेमध्ये प्रार्थना करतो, नमाज पढतो, तरीही आमच्या मागे संकटांचा ससेमिरा का? आमची कामे का होत नाहीत? नुकसान का होते? हातातोंडाशी आलेल्या नोकऱया का जातात,  जुळत असलेले लग्न अचानक का मोडते, खर्च भयानक वाढतात, मोठमोठे अपघात होतात, हॉस्पिटलला कितीही पैसा ओतला तरी रोग बरे होत नाहीत, घरी अन्नधान्य पुरत नाही, घरात सतत लाल मुंग्या तसेच नको ते किटक वारंवार येतात, यासह अनेक तक्रारी लोकांना सतत भेडसावत असतात. ‘जसे कर्म तसे फळ’ या न्यायाने या जन्मात अथवा पूर्वजन्मात आपल्या हातून कळत नकळत ज्या चुका होतात, त्याचाच हा परिणाम असतो. एकवेळ देव माफ करील पण कर्मगती माफ करीत नाही. प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला, सीतेला अग्निदिव्यातून जावे लागले, पितामह भिष्माना शरपंजरी पडावे लागले, कायम तपश्चर्येत मग्न असणाऱया रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला तर स्वामी विवेकानंदाना मधुमेहाने ग्रासले, मुक्तेश्वर मुके होते, वऱहाडचे महान सतत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले, सुरदासही अंध होते. कुर्मदास पांगळे होते. चोखोबा रायांचा मृत्यू भिंत अंगावर पडून झाला. संत तुकारामांच्या संसाराची धूळदाण उडाली. ज्ञानेश्वरांच्या माता-पित्यांना देहांत प्रायश्चित घ्यावे लागले. कृष्णभक्त संत मीराला खूप छळ झाल्याने अखेर विष घ्यावे लागले. दौपदीला वस्त्रहरणाला सामोरे जावे लागले. प्रतीसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेल्या व साक्षात रामाचे गुरु असलेल्या विश्वामित्रांचा तपोभंग झाला. साक्षात परमेश्वराचा अवतार असूनही कृष्णाला बंदिवासात जन्म घ्यावा लागला. तसेच मोठेपणी स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. साक्षात विष्णूला भृगु, ऋषींची लाथ बसली. धर्मासाठी लढणाऱया संभाजी राजाना हालहाल करून मारण्यात आले. देवाचा अवतार असलेल्या येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले. काय कमी होते या सर्वांना.? पैशाची टाकसाळ घरात असताना या महान पुण्यवान जिवांना दु:ख दारिद्रय़ भोगावे लागले, इतकी कर्माची गती महान असते. मग आपल्या टीचभर पुण्याचा इतका डांगोरा पिटण्यात काय अर्थ आहे? परमेश्वराच्या अचूक न्यायदानावर विश्वास ठेवा. तो कुणावर कधीही अन्याय करीत नाही, पण जसे कर्म त्यानुसार तो फळ नक्कीच देणार, हे लक्षात ठेवावे. भारद्वाज पक्षी, गाय, मुंगुस, मांजरे यांना पवित्र मानतात. त्यांच्या हत्या केल्यास अथवा त्यांचे हालहाल केल्यास फार वाईट शाप लागतो, असे म्हणतात. तर याच्या उलट गणेशाचे वाहन असूही उंदराला विष घालून मारतात. कुत्री व डुकरासारख्या प्राण्यांचे जीवन पहा, म्हणजे कर्मगतीचे परिणाम कसे असतात ते लक्षात येईल. यासाठीच माणसाने सतत सर्वांविषयी कृतज्ञ रहावयास हवे. मनुष्यप्राण्यांचे बऱया-वाईट कृत्याचे रेकॉर्डींग परमेश्वराच्या दरबारात होत असते हे लक्षात ठेवावे. त्याचा सर्व्हर कधीही डाऊन नसतो. आपल्या बऱया-वाईट कर्माने पुण्याचा साठा भराभर संपत असतो, त्यात भर घातली नाही तर वेळ फिरताच सर्व काही उलट सुलट होऊ लागते, हा संदेश देणारी तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा, तिलाच व्यास पौर्णिमा असे म्हणतात. येत्या पाच जुलैला ही व्यास पौर्णिमा आहे. (पूर्वार्ध)

मेष

भाग्यात आलेला वक्री गुरु. अपार धनसंपत्ती मिळण्याचे योग. तीर्थयात्रा होतील. राजकीय क्षेत्रात असाल, तर मोठे पद मिळेल. सर्व तऱहेच्या व्यसनापासून दूर रहा. अन्यथा गुरुची चांगली फळे मिळणार नाहीत. धर्मबाहय़ वर्तन करण्याचा मोह आवरा अन्यथा नको त्या प्रकरणात अडकाल.

वृषभ

अष्टमात आलेल्या वक्री गुरुमुळे हाती पैसा नसेल, पण सर्व सुखे तुमच्या समोर उभी राहतील. मोठे खर्च वाचतील. घराण्यातील आतापर्यंत माहीत नसलेल्या काही लाभदायक गुप्त गोष्टी बाहेर पडतील. त्यामुळे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. संततीशी तीव्र मतभेद. सर्व तऱहेच्या दुर्घटनेपासून दूर रहा.

मिथुन

सप्तमात वक्री गुरुमुळे विवाह झाल्यास सर्व तऱहेने जीवन उजळेल. स्वत:च्या कर्तृत्वाने उद्योगपती होण्याचे योग. आरोग्य उत्तम राहील. परदेशी अथवा अती दूरवर जाण्याचे योग. या गुरुच्या कालखंडात घरात शंख, घंटी व घडय़ाळ शक्मयतो खरेदी करू नका. अन्यथा अडचणी वाढतील.

कर्क

शष्ठात आलेला वक्री गुरु. सोने, चांदी, दागदागिने खरेदी करू शकाल. जे शत्रू निर्माण होतील, ते सर्व आपोआप थंड पडतील. मामा व काका यांच्या भाग्योदयास कारणीभूत ठराल. पण वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत अडथळे येतील. आर्थिक बाबतीत हा गुरु शुभ फलदायक ठरेल.

सिंह

त्रिकोणात आलेला गुरु अतिशय शुभ असून तो तुम्हाला सर्व तऱहेचे सुखसमाधान देईल, पण व्यसन व इतर अनिष्ट बाबतीत अडकला असाल तर गुरुचे कोणतेही शुभ परिणाम दिसणार नाहीत. शेअर बाजार व तत्सम मार्गाने मौठय़ा प्रमाणात धनलाभ. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ अनुभव.

कन्या

चतुर्थात आलेल्या वक्री गुरुमुळे, मातेच्या पायगुणाने भाग्य उजळेल. मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी व नावलौकिक प्राप्त कराल. अनेकांना जीवदान मिळेल. एखाद्या निपुत्रिकाची इस्टेट अथवा गुप्त मार्गाने धनलाभ होण्याचे योग. स्वत:चे घर व वास्तू, जागा, प्लॉट वगैरेच्या बाबतीत अनुकूल काळ.

तुळ

तृतीयस्थानात वक्री अवस्थेत आलेल्या गुरुमुळे पत्रव्यवहार, लिखाण, कला, साहित्य व शिक्षणात चांगले यश मिळेल. पैसा बऱयापैकी मिळेल. पण वाढत्या खर्चामुळे आर्थिक बाबतीत जमा खर्चाचा मेळ बसणे कठीण होईल. त्यामुळे स्वभावात तापटपणा येण्याची शक्मयता आहे.

वृश्चिक

धनस्थानी वक्री गुरु येणे म्हणजे सतत धनलाभ व अडकलेले पैसे येणे असा अर्थ आहे. त्यामुळे गुरुच्या या कालखंडात सर्व मोठी आर्थिक कामे करून घ्या. यश मिळेल. गोड बोलून अनेक कामे होतील. जर थोरामोठय़ांचा व गुरुजनांचा मान ठेवलात तर या गुरुची अत्यंत शुभ फळे मिळतील.

धनु

वक्री गुरुचे आगमन तुमच्या राशीत झालेले आहे. हा गजकेसरी म्हणजे राजयोग  आहे. भाग्योदय, भरभराट, मानसन्मान व नावलौकिक होईल. सरकारी मानसन्मान मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला असाल तर निश्चित यश मिळेल. विवाह, परदेशगमन, रोग निवारण, नोकरीत प्रमोशन या बाबतीत अनुकूल काळ.

मकर

गुरु वक्री अवस्थेत बाराव्या स्थानी आलेला आहे. आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर उत्तम यश, प्रति÷ा व धनलाभ होईल. शत्रुच्या कारवाया वाढतील. पण त्यांच्याकडून धनलाभही होतील. धार्मिक कार्यात चांगले यश मिळेल. काही जणांचे जीवन तुमच्यामुळे उजळेल. दैवी साक्षात्कार घडतील.

कुंभ

लाभात आलेला वक्री गुरु अत्यंत भाग्यशाली आहे. गुरुचे  हे भ्रमण सतत काही ना काही लाभ घडवीत राहील. घरदार, जागा, जमीन, वाहन यासह कोणत्याही महत्त्वाकांक्षा या काळात पूर्ण होतील. पण प्रामाणिक प्रयत्न व अविरत कष्टाची जोडही हवीच. जिवावरची संकटे टळतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल.

मीन

दशमात आलेला वक्री गुरु. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केलेला असाल तर चांगले यश. माता-पित्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला सोनेरी वळण लावील. लोखंडी वस्तुपासून इजा. काहीवेळा चुकीचे निर्णय घ्याल. त्यामुळे नुकसान होईल.  नोकरीत जर अन्याय झालेला असेल तर त्याचे निवारण होईल.

Related Stories

आजचे भविष्य 10-09-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 9 एप्रिल 2022

Patil_p

आजचे भविष्य 07-05-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 9 जानेवारी 2020

Patil_p

भविष्य

Patil_p