Tarun Bharat

राशिभविष्य

Advertisements

15 ते 21 मार्च 2020

मेष

चंद्र- बुध लाभयोग, मंगळ-गुरु युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. मित्रांची मदत मिळेल. कोणतेही काम करतांना रागावर ताबा ठेवा. विचारपूर्वक बोला, चर्चा करा. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. तुमचा मुद्दा सर्वांना पटणे कठीण आहे. अरेरावी नको. अपमान करून घेऊ नका. नोकरीत काम वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात ओळखी वाढतील. घरातील कामे करता येतील.


वृषभ

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळेल. कोणतेही काम पैसे देऊन होईल, असे समजू नका. व्यवहारात फसगत होईल. घरात क्षुल्लक कारणावरून तणाव होईल. वाद वाढवू नका. वाहन जपून चालवा. नोकरीत वरिष्ठांना खूष करता येईल. मित्रांमध्ये गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत प्रगती होईल.


मिथुन

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. धंद्यात आत्मविश्वासाने प्रगती करता येईल. ओळखीतून काम मिळवाल. मागील येणे वसूल करा. वाहन जपून चालवा. बोलण्यात कडवटपणा  दिसून येईल. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नवीन ओळखी होतील.   घर, जमीन इ. खरेदी करता येईल. स्पर्धा जिंकाल.


कर्क

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवा. काम मिळवा. छोटे काम नाकारू नका. कामगारांना टिकवून ठेवा. नोकरीतील समस्या कमी होईल. तुमच्यावर मोठय़ा कामाची जबाबदारी दिली जाईल. राजकीय, सामाजिक कार्यातील गैरसमज दूर करता येईल. प्रतिष्ठा वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात नवी संधी मिळेल. ओळखी होतील.


सिंह

चंद्र-शुक्र त्रिकोण योग, मंगळ-गुरु युती होत आहे. तुमच्या सरळ, शांत स्वभावाचा कुणीतरी फायदा घेईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव राहील. कामाचा ताण वाढेल. गुप्त कारवाया होतील. युक्तीने वागा. धंद्यात काम मिळेल. थकबाकी मिळवा. नोकरीत न पटणारे काम करावे लागेल. अचानक बदली संभवते. घरातील कामे होतील. कला, क्रीडा, साहित्यात स्पर्धा वाढेल. ओळखी होतील.


कन्या

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-शनि युती होत आहे. संसारात क्षुल्लक वाद होईल. खाण्याची काळजी घ्या. व्यसनाने फसगत होईल. पैसा खर्च होईल. धंद्यात गोड बोलून काम करा. गिऱहाईकांच्याबरोबर संयमाने वागा, बोला. नोकरीतील तणाव कमी करता येईल. तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे विचार प्रभावशाली ठरतील. प्रगतीची संधी मिळेल. मित्र स्पर्धा करतील. कला, क्रीडा, साहित्यात नावलौकिक मिळेल.


तुळ

चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. वसुली करता येईल. नोकरीत कुणीतरी तुमच्या कामातील क्षुल्लक चूक मोठी करून दाखवेल. रागावर ताबा ठेवा. जवळचे स्नेही मदत करतील. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त कारवाया नकोशा होतील. सावधपणे निर्णय घ्या. तटस्थ रहा. मनोबल टिकून राहील.


वृश्चिक

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. धंद्यात नवा विचार करण्याचे ठरवाल. मोठे काम मिळण्याचे आश्वासन मिळेल. धंद्यात खर्च वाढेल. दूरदृष्टीतून एखादा प्रश्न सोडवावा लागेल. नोकरीत वर्चस्व सिद्ध कराल. मैत्रीत गैरसमज होईल. संसारात मुले, जीवनसाथी यांच्याशी तणाव वाढू देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. जवळचे लोक कारस्थाने करतील. स्पर्धा जिंकाल.


धनु

चंद्र-शुक्र त्रिकोण योग, मंगळ-गुरु युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. रविवारी प्रवासात घाई करू नका. वाद वाढवू नका. धंद्यात जम बसेल. वसुली करता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबरीने काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्यामध्ये मिसळून समस्या समजून घ्या. कार्य करा. प्रतिष्ठा मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. घरातील समस्या सोडवाल.


मकर

सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. धंद्यातील समस्या आठवडय़ाच्या सुरुवातीला वाढू शकते. चर्चा करतांना संयम ठेवा. रागात बोलल्यास गैरसमज होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. प्रवासघाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. लोकांच्या समस्येवर उपाय शोधा. तळागाळात काम करा. प्रभाव वाढवा. स्पर्धा जिंकाल.


कुंभ

सूर्य-चंद्र लाभयोग, मंगळ-गुरु युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. वसुली करून घ्या. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कंपनीद्वारा परदेशात जाल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकाराचा वापर जनहितासाठी करा. लोकांच्या मनात स्थान निर्माण करा. कठीण काळात व्यायाम उपयोग होईल. स्पर्धा जिंकाल.


मीन

चंद्र-शुक्र त्रिकोण योग, सूर्य-शनि लाभयोग होत आहे. धंद्यात वाद न वाढवता बोला. नवे काम मिळवा. नोकरीत तुमचे काम कौतुकास्पद ठरेल. बढती होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. घर, वाहन इ. खरेदीचा विचार कराल. राजकीय, सामाजिक कार्यात रेंगाळलेली कामे करून घ्या. गैरसमज, वाद मिटवा. प्रतिष्ठा मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. नवीन ओळखीमुळे तुमचा उत्साह वाढेल.

Related Stories

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

आजचे भविष्य 24-07-2021

Amit Kulkarni

जाणून घेऊया राहू आणि केतूबद्दल

Patil_p

आजचे भविष्य 18-03-2022

Amit Kulkarni

राशिभविष्य

tarunbharat

राशी भविष्य

Patil_p
error: Content is protected !!