Tarun Bharat

राशिभविष्य

मेष

कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. शेतकरी वर्गाला प्रेरणा देणारी घटना घडेल. मागील येणे वसूल करा. नोकरी मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल. बुधवार, गुरुवार वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे फारच प्रभावी ठरतील. संसारात शुभ घटना घडेल. कला, क्रीडा स्पर्धा जिंकाल. कोर्टकेस यशस्वी कराल.


वृषभ

कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील तणाव कमी करता येईल. शेतकरी वर्गाने सावधपणे व्यवहार करावा. नम्र रहावे, नोकरीत इतरांचे काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधाला सामोरे जाऊन कार्य करावे लागेल. कोर्टाच्या कामात मदत मिळू शकेल. कला, क्रीडा स्पर्धेत पुढे जाल. दुखापत टाळा.


मिथुन

कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र, नेपच्यून युती होत आहे. धंद्यात अडचणी येतील. नोकरांना दुखवू नका.  नोकरीत वरि÷ांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात गरज नसेल तर मत मांडू नका. कमी बोला. कला, क्रीडा स्पर्धेत जास्त मेहनत घ्या. नाराज होऊ नका. कोर्टाच्या कामात संयमाने बोला.


कर्क

कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढेल. क्यवहारात फसगत होईल. सावध रहा. संसारात नाराजी, तणाव होऊ शकतो. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात संयमाने प्रश्न सोडवा. गुप्त कारवायांना कमी न समजता चूक सुधारा. कला, क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. कोर्टाचे काम करता येईल.


सिंह

कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र नेपच्यून युती होत आहे. धंद्यात चर्चा करतांना अरेरावी करू नका. संधीची वाट पहा. मागील येणे वसूल करा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीकडे  दुर्लक्ष करू नका. प्रवासात घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात अनेकांचे मत ऐकून घ्यावे लागेल. आरोप येतील. कला, क्रीडा स्पर्धेत कौतुक होईल. कोर्टाच्या कामात मुद्याचे बोला.


कन्या

कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र, मंगळ केंद्रयोग होत आहे. धंद्यात भागिदारी असेल तर वाद होऊ शकतो. विचारपूर्वक वागा, बोला. संसारात खर्च वाढेल. जवळच्या माणसांना समजून घ्यावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. नोकरी टिकवून ठेवा. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. स्वत:च्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कोर्टाच्या कामात प्रयत्नाने यश मिळवा.


तुला

कुंभ राशीत बुध प्रवेश, शुक्र, नेपच्यून युती होत आहे. धंद्यात प्रयत्न करा. वेळेला महत्त्व द्या. वसूली करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी करता येईल. घरातील कामे होतील. नातलग भेटतील. घर, वाहन, जमीन खरेदी करण्याचा विचार करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. ओळखी होतील. कोर्टाच्या कामात सावध रहा. केस संपवा.


वृश्चिक

कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. महत्त्वाची धंद्यातील कामे करून घ्या. माल-खरेदी विक्री करून घ्या. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. घरातील समस्या सोडवा. मौल्यवान खरेदी संभवते. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढवणारी घटना घडेल. लोकांची मने सांभाळावी लागतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. कोर्टकेस यशस्वी होईल. तुमच्या प्रेमात उच्चपद मिळेल.


धनु

कुंभ राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुम्ही प्रयत्न करा. ग्रह तुम्हाला मदत करतील. प्रगतीची संधी मिळेल. धंद्यात वाढ करा. मागील येणे वसूल करा. नोकरीत फायदा होईल. कंपनीद्वारा परदेशात जाण्याचा योग येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता दाखवा. तुमचे स्थान मजबूत करा. लोकप्रियता मिळवा. मागील चूक, गैरसमज दूर करा. कला, क्रीडा, कोर्टकेस यात यश मिळेल.


मकर

कुंभ राशीत बुध प्रवेश, चंद्र,शुक्र युती होत आहे. साडेसाती तुम्हाला सुरू आहे. धंद्यात  टिकून रहा. मागील येणे  वसूल करा. नवे काम मिळवा. नोकरीत कठीण काम करून दाखवाल. कायद्याचे भान नेहमी ठेवा. घरातील कामे होतील. तणाव कमी करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. लोकांच्यासाठी काम करा. संधी मिळेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. स्पर्धेत पुढे जाल.


कुंभ

तुमच्याच राशीत बुध प्रवेश, शुक्र,नेपच्यून युती होत आहे. साडेसाती आताच सुरू झाली आहे. धंद्यात घाईत कोणताही व्यवहार करू नका. नोकर माणसांना सांभाळून घ्या. सप्ताहाच्या शेवटी काम मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तारतम्याने बोला. म्हणजे चांगल्या कामावर पाणी पडणार नाही. रविवारी वाद करू नका. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. कोर्टाच्या कामात सावधपणे मत मांडा.


मीन

कुंभ राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. व्यवहारात फसगत टाळता येईल. मोहाच्या जाळय़ात अडकू नका. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. नोकरीत अधिक चांगला बदल करता येईल. जीवनसाथी, मुले यांचा विचार समजून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकाराचा वापर योग्य कामासाठी करा. तुमचा मान वाढेल. कला, क्रीडा स्पर्धेत चमकाल. शिक्षणात पुढे जाल. केस जिंकाल.

 

Related Stories

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.1 जुलै 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.7 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 27 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य 18-08-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य गुरुवार दि. 25 ऑगस्ट 2022

Patil_p