Tarun Bharat

राशिभविष्य

रविवार दि. 25 ते शनिवार दि. 31 ऑक्टोबर 2020

मेष

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. दसरा सण अविस्मरणीय ठरेल. उत्साह वाढेल. धंद्यात गोड बोलून रहा. हिशोब नीट करा. भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर वाद, गैरसमज होईल. प्रवासात घाई करू नका. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीसमवेत कोणताही व्यवहार करू नका. खर्च वाढेल. खाण्याचे तंत्र सांभाळा.

वृषभ

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, मंगळ युती होत आहे. विजयादशमीच्या दिवशी तुम्ही सामाजिक कार्यात सावध रहा. कायदा मोडू नका. वाद वाढवू नका. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात बोलू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तारतम्य ठेवा. आरोप दुसऱयावर करतांना तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता. घरातील वडिलधाऱयांची चिंता वाटेल.

मिथुन

सूर्य, बुध युती, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. दसऱयाच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. कायदा मोडू नका. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळवा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्याला गती देता येईल. महत्त्वाची कामे करून घ्या. लोकप्रियता मिळेल. रेंगाळलेली कामे करा. घरात आनंदी रहाल. कला, साहित्यात यश मिळेल.

कर्क

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. दसरा सण नेहमीपेक्षा थोडा वेगळा वाटेल. कुणाचीतरी कमी अनुभवाल. धंद्यात वाढ होईल. ओळखीतून काम मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या सांगण्यानुसार काम करावे लागेल. तणाव वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात क्षुल्लक अडचणी येतील. तुम्ही जिद्दीने यश मिळवाल. संसारात मुलांच्या संबंधी प्रश्नावर चर्चा कराल. परीक्षा टाळू नका. कलेत प्रगती होईल.

सिंह

सूर्य, बुध युती, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम लवकर मिळवा. दसऱयाच्या दिवशी मनावर दडपण राहील. नोकरीत महत्त्वाचे काम केल्याने वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तणाव असला तरी तुमची प्रति÷ा वाढेल. कठीण निर्णय घ्याल. लोकांच्या भेटी घेता येतील. प्रवासात सावध रहा. कला, शिक्षण, साहित्यात प्रगती करता येईल.

कन्या

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात काम मिळेल. रागावर सर्व ठिकाणी ताबा ठेवा. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. नोकरीत काम वाढेल. इतरांना मदत करावी लागेल. वाहन हळू चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात योजना पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवा. प्रति÷sवर टिकात्मक चर्चा होईल. घरातील समस्या कमी करता येईल. कला, साहित्यात नवे लिखाण होईल. परिचयात वाढ होईल.

तुळ

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात गिऱहाईकाच्या बरोबर वाद वाढवू नका. हिशोबात चूक होईल. वस्तू नीट सांभाळा. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत काम वाढले तरी प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. जवळचे लोक मदत करण्यास कुचराई करतील. संयम ठेवा. कायदा मोडू नका. दादागिरी नको. शिक्षणात आळस नको. संसारात नाराजी होईल.

वृश्चिक

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. दसरा उत्साहात साजरा कराल. नव्या विषयात रस निर्माण होईल. धंद्यात काम मिळेल. अरेरावीचा सूर कुठेही काढू नका. नोकरीत काम वाढेल. वरि÷ांना दुरुत्तर करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात समतोल राखावा लागेल. विरोधकांना उत्तरे द्यावी लागतील. संसारात चांगली बातमी मिळेल. वृद्धांची काळजी घ्या.

धनु

सूर्य, बुध युती, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या धंद्यात चांगली सुधारणा करता येईल. वसूली करा. नवे काम मिळवा. नोकरीत वर्चस्व वाढेल.दसरा सण विशेष ठरेल. संसारातील समस्या कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्वाची कामे करता येतील. योग्य निर्णय घेता येईल. कला, शिक्षण, साहित्यात प्रगती होईल. ओळखी होतील.

मकर

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. दसरा सणाला नव्या कार्याचा आरंभ करता येईल. धंद्यातील समस्या कमी होईल. जुने येणे वसूल करा. नवीन ओळखीतून काम मिळवता येईल. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. कठीण काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. लोकप्रियता मिळेल. कामाची चांगली मांडणी करा. कला, शिक्षण, साहित्यात मेहनत घ्या. यश मिळेल.

कुंभ

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात क्षुल्लक तणाव होईल. खर्च वाढेल. संसारात कष्ट पडतील. आपसात गैरसमज होईल. नोकरीत तुमचा प्रभाव वरि÷ांना आकर्षित करेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. कठीण कामे मार्गे लावा. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. कला क्षेत्रात तडजोड करावी लागेल.

मीन

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वादाचा प्रसंग निर्माण होईल. संयम ठेवा. वाहन जपून चालवा. धंद्यात काम मिळवता येईल. नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवा. कठोर शब्द वापरू नका. राजकीय, सामाजिक कार्यात टीका करताना विचार करा. तुमचीच चूक दाखवली जाऊ शकते. शिक्षणात मागे राहू नका. दादागिरीची भाषा वापरू नका.

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर 2020

Patil_p

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 सप्टेंबर 2020

Patil_p

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 19-10-2022

Amit Kulkarni