Tarun Bharat

राशिभविष्य

रविवार दि.18 ते  शनिवार दि.24 एप्रिल 2021

मेष

या सप्ताहात सूर्य, बुध युती, शुक्र, हर्षल युती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. फायदा वाढेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नोकरीत बढती होईल. नोकरी नसलेल्या व्यक्तीला काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची इतरांना मदत होईल. मान-सन्मानात वाढ होईल. शेतकरी वर्गाला चांगला मार्ग मिळेल. जनहित साधता येईल. स्पर्धेत अव्वल रहाल. शिक्षण होईल.

वृषभ

या सप्ताहात चंद्र, शनि प्रतियुती, चंद्र, हर्षल केंद्रयोग होत आहे. धंद्यात खर्च वाढेल. यांत्रिक बिघाड झाल्याने समस्या येईल. रागावर ताबा ठेवा. कायदा मोडू नका. नोकरीत गैरसमज होऊ शकतो. मैत्रीत तणाव होईल. संसारात नाराजी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. विरोधक मैत्री करण्यास येतील. सावध रहा. स्पर्धा कठीण आहे. हुशार रहा.

मिथुन

या सप्ताहात सूर्य, बुध युती, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात सुधारणा करा. वेळ फुकट घालवू नका. फायदा करून घ्या. मेहनत घ्या. नोकरीत वरि÷ांची मर्जी राहील. नोकर माणसे मिळतील. संसारातील कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. कठीण कामे करून घ्या. मोठय़ा लोकांची मदत घेता येईल. कला, क्रीडा,साहित्यात प्रगती होईल.

कर्क

या सप्ताहात शुक्र, हर्षल युती, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. पोटाची काळजी घ्या. रागावर ताबा ठेवा. नोकरीत तुमचे कौतुक होईल. संसारात मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. वाटाघाटीत फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. योग्य व्यक्तीचे ऐका. मारामारी सारखे प्रसंग टाळा.

सिंह

या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र-गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. नवीन ओळखीचा उपयोग करून घ्या. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्यातील किचकट प्रश्न रेंगाळत ठेवू नका. कोर्टकचेरी संबंधी प्रश्न सोडवा. संसारातील तणाव कमी होईल. स्पर्धेत पुढे जाल. शिक्षणात प्रगती होईल. घरासंबंधी कामे करून घ्या.

कन्या

 या सप्ताहात चंद्र, मंगळ लाभयोग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात जास्त मोह ठेवू नका. नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवहारात, प्रवासात, सावध रहा. व्यसनाने नुकसान होईल. प्रकृतीची काळजी घ्या. संसारात तणाव होईल. धरसोड वृत्तीने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कडून वाटेल त्या कामाची अपेक्षा केली जाईल. स्पर्धा कठीण आहे. कष्ट घ्या.

तुळ

या सप्ताहात सूर्य, बुध युती, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. कठीण कामे करून घ्या. धंद्यात मेहनत घ्या. फायदा वाढेल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. वसूली करून घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. संसारात सुखद समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व द्या. लोकसंग्रह वाढवा. स्पर्धेत अव्वल रहाल. केस संबंधी काम करा.

वृश्चिक

या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र हर्षल युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. परंतु व्यवहारात सावध रहा. प्रवासात धोका पत्करू नका. समोरासमोर वैर होऊ शकते. राजकीय, सामाजिक कार्यात समस्या येईल. विरोध वाढेल. जीवनाची काळजी घ्या. जवळचे लोक मनातून जळफळतील. खाण्याचे तंत्र सांभाळा. मैत्रीत गैरसमज होईल. घरातील क्यक्तींना दुखवू नका.

धनु

या सप्ताहात सूर्य, बुध युती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात रेंगाळलेली कामे पूर्ण करा. मोठे कंत्राट मिळवा. वसुली करा. नोकरीत प्रगती होईल. तुमच्या विरोधकांना योग्य धडा मिळेल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जनहिताचे काम हाती घ्या. संसारातील  समस्या सोडवा. स्पर्धेत प्रगती कराल.

मकर

या सप्ताहात शुक्र, हर्षल युती, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात गोड बोला. कठोर शब्दाने नुकसान होईल. नोकरीत कामाचा दबाव राहील. घरात मानसिक दडपण येईल. अनाठायी खर्च होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. अरेरावीने प्रति÷sवर टीका होईल. क्षुल्लक वाद वाढवू नका. ध्येयावर लक्ष ठेवा. नवीन ओळख फसवी ठरू शकते.

कुंभ

या सप्ताहात सूर्य, बुध युती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवा. करारात फायदा होईल. गैरसमज दूर करता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. चूक सुधारून पुढे जाता येईल. संसारात शुभ घटना घडेल. कोणताही कठीण प्रश्न मागे ठेवू नका.

मीन

या सप्ताहात सूर्य, बुध युती, शुक्र,हर्षल युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. रागावर ताबा ठेवा. भलत्या व्यक्तीच्या नादी लागू नका. नोकरीत कौतुकास्पद काम कराल. संसारात मौल्यवान खरेदी कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. अनुभवी व्यक्तीस कमी लेखू नका. स्पर्धा जिंका.

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 6 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 26 जून 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 नोव्हेंबर 2020

Patil_p

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.26 ऑगस्ट 2021

Patil_p