Tarun Bharat

राशिभविष्य

Advertisements

मेष

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. समस्या सोडवता येईल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. महत्त्वाचे काम करून दाखवाल. संसारात सुखद समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. डावपेच यशस्वी होईल. प्रतिष्ठा  वाढेल. आर्थिक सहाय्य होईल. कला क्षेत्रात  नाविन्य निर्माण कराल.

वृषभ

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात नियम मोडू नका. फायदा वाढेल. नोकरीत सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण काम करावे लागेल. वाद वाढवू नका. घरातील लोकांच्या मदतीने कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्याबद्दल प्रतिष्ठा गैरसमज दूर करता येईल. जनहिताचे कार्य करता येईल.

मिथुन

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करा. धंद्यात समस्या येईल. कायदा मोडू नका. मनस्ताप होईल. खर्च वाढेल. नोकरीत काम लक्षपूर्वक करा. अरेरावी करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्याचे तंत्र सांभाळा. वस्तू नीट ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात सभ्यता ठेवा.

कर्क

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात  काम मिळेल. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. सर्वच ठिकाणी रागावर ताबा ठेवा. अरेरावी करू नका. राजकीय, सामाजिक  कार्यात प्रतिष्ठा टिकेल. तुमचा मुद्दा सत्य असला तरी त्यावर उपाय होण्यास विलंब होऊ शकतो. कठोर वागू नका. कायद्याचे योग्य पालन करा. प्रेमाने प्रश्न सोडवा.

सिंह

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद, बुध त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तणावग्रस्त घटना घडेल. धंद्यात नियमांचे पालन करा. फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मतानुसार वागा. वाहनाचा वेग कमी ठेवा. क्षुल्लक वाद राजकीय, सामाजिक कार्याला होईल. स्वत:ची कुणाकडून दिशाभूल होऊ देऊ नका. कलाक्षेत्रात मन रमेल.

कन्या

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु त्रिकोणयोग होत आहे. शारीरिक, मानसिक तणाव कमी होईल. धंद्यात नम्रता ठेवा. फायदा होईल. नवे तंत्र  अमलात आणता येईल. गुप्त कारवाया होतील. नोकरीत वरिष्ठाच्या आशेचे पालन केल्याने कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता, प्रति÷ा मिळेल. आर्थिक सहाय्य इतरांना कराल.

तुळ

या सप्ताहात वृषभेत रविप्रवेश, चंद, मंगळ लाभयोग होत आहे. स्वत:ची कुठेही फसगत  करून घेऊ नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. प्रत्येक ठिकाणचे नियम पाळा.अरेरावी नको. धंद्यात येणाऱया अडचणी टाळता येतील. जिद्द ठेवा. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. संसारात  नाराजी होऊ शकते.

वृश्चिक

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदा होईल. समस्या सोडवता येईल. राग कमी करा. संसारात सुखद संवाद साधा. आवडते काम मन लावून करता येईल. नोकरीत प्रभाव पडेल. तत्परता, हुशारीचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात कठोर शब्द वापरू नका. प्रवासात घाई नको. प्रति÷ा, लोकप्रियता मिळेल.

धनु

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. परंतु कायदा पाळा. कठीण प्रसंगावर मात करता येईल. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात क्षुल्लक समस्या येईल. वाद वाढवू नका. नोकरीत इतरांचे काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात टीका होईल. तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न विरोधक मुद्दामहून करतील. नम्र रहा.

मकर

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. मुलांच्या प्रगतीने खूष व्हाल. धंद्यात फायदा होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला किरकोळ समस्या येईल. कायदा मोडू नका. नम्रपणे वागा, बोला, नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवे आश्वासन मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता, प्रति÷ा मिळेल. जोमाने जनहितासाठी काम करा. हीच ईश्वर सेवा ठरेल. कला क्षेत्रात विशेष कलाकृती  बनवाल.

कुंभ

 या सप्ताहात वृषभेत सूर्य प्रवेश, सूर्य, नेपच्यून लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. कोणतेही काम करतांना सावध रहा. रागावर ताबा ठेवा. कायदा पाळा. धंद्यात  नम्रता ठेवा. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रसंगानुरुप ठेवा. वाद केव्हाही वाढेल. प्रवासात घाई नको. दुखापत टाळा. मनावर दडपण येईल.

मीन

या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद, गुरु युती होत आहे. धंद्यात जम बसेल. रागाच्या भरात अपशब्द वापरू नका. तंटा वाढवू नका. नोकरीत वरिष्ठा तुमचे कौतुक करतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावता येईल. इतरांचे मत ऐकून घ्या. तुमचे मत संयमाने व्यक्त करा. प्रश्न सोडवता येईल. प्रति÷ा, मैत्री वाढेल.

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 4 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जून 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 21 जानेवारी 2021

Patil_p
error: Content is protected !!