Tarun Bharat

राशिभविष्य

बुध. दि. 3 ते मंगळ.दि.9 नोव्हेंबर 2021

वार पाळणे हे फक्त धार्मिक कार्यापुरते मर्यादित ठेवावे

देशातील अनेक भागात बऱयाच ठिकाणी देवदेवतांच्या नावाने 3,5,7 असे वार पाळले जातात. त्याची कारणे मात्र कुणालाच माहीत नसतात. त्यामुळे श्रद्धा व  अंधश्रद्धा यांची गफलत होऊन काही ठिकाणी अतिरेक झालेला दिसून येतो. वार पाळण्याचा हा प्रघात फक्त धार्मिक बाबीशी संबंधित असणे आवश्यक आहे. पण हल्ली त्याचा संबंध व्यावहारिक बाबीशीही लावला जात आहे. वार पाळणे या प्रकारात गावातील कुणीही बाहेर जायचे नाही अथवा बाहेरचे कोणीही गावात यायचे नाही असे काहीसे विचित्र नियम तेथील लोक लावत असतात. या नियमांचा कोणी भंग केल्यास तो अपघाताने अथवा दुर्घटनेत मरेल अशी भीतीही घातली जाते. पण जर एखाद्याला नोकरीची ऑफर आली अथवा तातडीच्या कामासाठी बाहेर जाणे किंवा येणे आवश्यकच असेल, घरात जर कोणी गंभीर आजारी असेल व त्याला हॉस्पिटलात न्यायचे असेल तर अशा लोकांनी काय करायचे? चांगल्या नोकरीसाठी एखादी व्यक्ती मुलाखतीसाठी जाणार असते त्याच वेळी वार पाळणे प्रघात सुरू असल्यामुळे त्याला गावाबाहेर जाऊ देत नाहीत. अशामुळे त्याची चांगली नोकरी जाते अथवा गंभीर रुग्णाला उपचारासाठी बाहेरगावी जाऊ देण्यास मज्जाव केल्यामुळे त्याचे प्राण जाऊ शकतात याची जबाबदारी कोण घेणार आहेत का? वार पाळण्याच्या काळात काम धंदे करायचे नाहीत या गैरसमजुतीमुळे काही लोकांच्या घरी गरिबीमुळे चूलही पेटत नाही. काही जण उपाशी असतात पण त्यांना चार घास कुणीही देत नाहीत. गावात देव-देवतांच्या जत्रा यात्रा असल्याने  वर्षभर लग्न व इतर मंगलकार्य करता येत नाहीत अशीही समजूत आहे. पण देव-देवतांच्या नावाने देण्यात येणारे मुक्या प्राण्यांचे बळी थांबवा, जत्रा यात्रा बंद करा, व्यसनाधीन होऊ नका, कर्ज काढून सण साजरे करू नका, असे कुणीच सांगत नाही. जत्रा यात्रा यांच्या मागे लागल्याने प्रचंड कर्जबाजारी झालेले अनेक जण शेवटी आत्महत्याही करतात. हल्लीच्या या बदलत्या काळात अनावश्यक अशा या सर्व प्रथा बंद करण्याची गरज आहे. कोरोनाच्या या दोन वर्षाच्या काळात जत्रा यात्रा, वार पाळणे, जेवणावळी, लग्न, मुंज व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम बंद होते पण कुणाचे काहीही अडले नाही. अथवा कोणत्याही देवाचा कोप झालेला नाही. कुणाचे अंत्यविधीही धार्मिक पद्धतीने झालेले नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल. वार पाळण्याच्या काळात गावाच्या बाहेर पाच फुटावर एखादी नोट पडली असेल तर ती तुम्ही वार प्रघात आहे म्हणून सोडणार आहात का?

मेष

दीपावली अमावास्या सप्तम स्थानात होत आहे. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण करील. काही वैचारिक मतभेद असतील तर ते दूर होतील. काही बाबतीत अत्यंत व्यवहारी वृत्तीने वागावे लागेल. घर, जागा, वाहन, फ्लॅट वगैरे घेण्यास अनुकूल काळ आहे. पण कर्ज काढून सण साजरे करू नका, आतिषबाजीवर खर्च करण्यापेक्षा महत्त्वाचा किमती वस्तू घेण्यासाठी ते पैसे वापरा. शिक्षणासाठी उत्तम योग. रुसवे-फुगवे कमी होऊन रखडलेला विवाह होईल. स्थलांतर अथवा बदलीची अपेक्षा असणाऱयांना चांगले वृत्त समजेल, काहीजणांना शुभ कार्यासाठी तीर्थक्षेत्री प्रवास योग.

वृषभ

मंगळाचे ष÷स्थानातील आगमन यामुळे अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतील. उत्साह व शक्ती वाढेल. नोकरीमध्ये भरभराट होईल. एखाद्याची सत्ता अथवा पद तुम्हाला मिळण्याची दाट शक्मयता. नोकरी-व्यवसाय अथवा इतर बाबतीत जर कोणी प्रतिस्पर्धी असतील तर ते सहजपणे थंड पडतील. नोकर चाकर अथवा कर्मचारी वर्गाकडून त्रास होण्याची शक्मयता दिसते. त्यांच्या चुकांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. स्वतःचा उद्योग-व्यवसाय असेल तर स्वकर्तृत्वाने त्यात मोठी उंची गाठू शकाल.

मिथुन

पंचमात आलेल्या मंगळामुळे मुलाबाळांच्या बरोबर संघर्ष होईल. सट्टा, लॉटरी, जुगार, शेअर बाजार यांच्या मागे लागल्याने आर्थिक फटका बसेल. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खेळाची आवड असेल तर त्यात उत्तम प्राविण्य मिळवू शकाल. जर मुलीच्या विवाहासाठी चांगले स्थळ आल्यास ते नाकारू नका. नको ते धाडस करण्याकडे वृत्ती वळवणे हे या मंगळाचे गुण असतात पण ते काही वेळा जीवावर बेतू शकते. त्यासाठी दऱया खोऱया वगैरे ठिकाणी काळजी घ्यावी.

कर्क

चतुर्थात रवि, मंगळ, बुध असे तीन ग्रह एकत्र आल्याने कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्मयता आहे, पण त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल. व्यवहारी कसे राहावे याचा अंदाज येईल. घर दुरुस्ती, रंगकाम अथवा तत्सम कामे करणार असाल तर दोन-तीन ठिकाणी खर्चाचा अंदाज तपासून मगच निर्णय घ्या. अग्नी, वीज व तत्सम उपकरणे जपून हाताळा. फटाक्मयांची आतषबाजी टाळण्याचा प्रयत्न करा, तसेच डोळय़ांची काळजी घ्यावी लागेल.

सिंह

तृतीयात मंगळ रवि-बुध म्हणजे तुमच्यातील कलागुण, धाडस, उत्साह, कार्यक्षमता यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे लक्षण आहे. एखादी गोष्ट मनावर घेतल्यास ती काहीही करून पूर्ण करणारच हा तुमच्या राशीचा गुण आहे. त्यामुळे या आठवडय़ात ग्रहमान तुम्हाला सर्व दृष्टीने अनुकूल राहणार आहे. फक्त त्याचा वापर कसा करायचा हे मात्र तुम्हाला ठरवावे लागेल. अतिव्यवहारी व चिकित्सक अशा व्यक्ती या आठवडय़ात भेटतील.

कन्या

 धनस्थानी मंगळ, बुध, रवी हा योग कोणत्याही व्यवहारातून धनलाभ घडवून देईल, पण नको तेथे खर्च करण्याची वृत्ती मात्र बदलावी लागेल. चतुर्थातील शुक्राचे भ्रमण कौटुंबिक वातावरण आनंदी व समाधानी ठेवेल, वाहन घेण्याच्या विचारात असाल तर अनुकूल काळ आहे. हर्षल मंगळाचा प्रतियोग स्फोटक पदार्थापासून धोका दर्शवितो. त्यासाठी फटाक्यांच्या आतिषबाजीपासून दूर राहा. ध्यानी मनी नसता दूरचे प्रवास योग.

तूळ

हर्षल, मंगळाचा प्रतियोग सुरू आहे. वैवाहिक जीवनात विचित्र घटना घडतील. प्रेमविवाह करणार असाल तर सर्व बाबतीत विचार करूनच निर्णय घ्यावेत, सध्या भागीदारी व्यवसाय करण्यास ग्रहमान अनुकूल नाही. कोर्ट प्रकरणे चालू असतील तर तुमची बाजू कितीही बरोबर असली तरी काही विचित्र घटना घडून विरुद्ध निकाल लागू शकतो किंवा प्रकरण पुढे जाऊ शकते. देण्याघेण्याचा व्यवहार असेल तर सावध राहून वाटाघाटी करा.

वृश्चिक

राशीस्वामी मंगळाचे भ्रमण अनुकूल नाही. त्यामुळे वादावादी, मतभेद यापासून दूर राहा. कुणाच्याही भांडणात मध्यस्थी करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. जर प्रेमप्रकरणात असाल तर सावध रहावे. तुमची एखादी किरकोळ चूक देखील मोठा मनस्ताप देऊ शकते. खर्च व कमाई यांचे योग्य समीकरण साधून कोणताही व्यवहार करा, म्हणजे  नुकसान  होणार नाही. कॅशियर अथवा इतरांचे आर्थिक व्यवहार हाताळत असाल तर व्यवहार पारदर्शक राहील, याची काळजी घ्या.

धनु

लाभस्थानात मंगळ, बुध सर्व मोठी कामे पूर्ण करण्यास मदत करतील. व्यावहारिक दृष्टिकोन असेल तर फार मोठे यश मिळवू शकाल. आर्थिक बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे जे काम हाती घ्याल ते निश्चित पूर्ण करू शकाल. नवीन नोकरी मिळणे अथवा प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी पडणे, ऐनवेळी नको त्या ठिकाणी जावे लागणे तसेच कुटुंबीयांपैकी कुणाची तरी धुरा सांभाळावी लागणे असे प्रकार घडतील पण कोणताही प्रसंग आला तरी न डगमगता मन शांत ठेवून योग्य तो निर्णय घ्या.

मकर

दशमस्थानात मंगळ, बुध, रवी म्हणजे नोकरी-व्यवसायात काहीतरी गडबड गोंधळ हे निश्चित समजावे. एखाद्या महत्त्वाच्या पदावर शिफारस होणे, पगार वाढ भागीदारीत यश, परदेश प्रवास, सार्वजनिक क्षेत्रात नावलौकिक होणे, अनेक कामांचे पैसे एकदम मिळणे अशा शुभ घटना घडू शकतात. पण त्याच बरोबर स्फोटक पदार्थापासून धोका. शारीरिक पीडा, शस्त्रक्रिया, धारदार वस्तूंचे आघात, दुखापत अशा घटनाही घडू शकतील.

कुंभ

 हर्षल, मंगळाचा प्रतियोग सुरू आहे हा योग चांगला नसतो. ध्यानीमनी नसताना अचानक दुर्घटना घडू शकतात. प्रवासात काळजी घ्या. वाहन पूर्ण तपासल्याशिवाय बाहेर पडू नका. आर्थिक व्यवहारात कोणाचे किती हितसंबंध गुंतले आहेत याचा अंदाज घेऊन त्यानुसार धोरण आखल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल. विवाहासाठी बोलणी करीत असाल तर मध्यस्थामार्फत स्थळाचा पूर्वेतिहास अथवा पार्श्वभूमी तपासून मगच अंतिम निर्णय घ्या.

मीन

अष्टमस्थानात मंगळ, बुध व त्याच्याशी हर्षलचा प्रतियोग. आर्थिकबाबतीत नाटय़मय घटना घडविल. एखाद्या संस्थेत विश्वासाने ठेवलेली रक्कम परत मिळण्यास विलंब होईल. लाभातील गुरुमुळे विवाह कार्यास अनुकूल काळ. जर एखादे स्थळ चालत असल्यास ते शक्मयतो नाकारू नका. स्वतंत्र भागीदारी, व्यवसाय करणार असाल तर संपूर्ण कायदेशीर आणि पारदर्शक व्यवहार ठेवा म्हणजे पुढे कोणताही धोका होणार नाही. इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य 02-12-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 18 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 22 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 19 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 24 ऑक्टोबर 2022

Patil_p