Tarun Bharat

राशिभविष्य

Advertisements

जरा हट के जरा बच के ये है ‘ज्योतिष’ मेरी जान!

पराशक्तीला आणि गुरुजनांना वंदन करून लेखमालेला सुरुवात करतो आहे. दिवाळी झाली. व्यापाऱयांनी लक्ष्मीपूजनाच्या वेळी नवीन वही पूजली असेल. त्यात मागच्या वहीमधून येणी आणि देणी यांचा हिशोब मांडला असेल, असा Carried forward हिशोब म्हणजे तुमची कुंडली. कुंडलीतला प्रत्येक ग्रह तुम्ही केलेल्या कर्मांची फळे आणि त्याचे संभाव्य परिणाम दाखवत असतो. म्हणजेच पूर्णपणे दोषमुक्त अशी एकही कुंडली नाही.

या लेखमालेच्या माध्यमातून माझा सगळा प्रयत्न हाच असेल की वेगवेगळय़ा दोषांच्या नावाखाली (जसा नाग दोष, मंगळ दोष, पितृ दोष, कालसर्प दोष इ.) सामान्य माणसाला घाबरवून त्याला लुटण्याचा जो प्रकार होत आहे त्याला थांबवणे आणि पंचभूतात्मक परमेश्वरी शक्तीशी आपल्या अंतरमनाला जोडून अत्यंत व्यावहारिक, सोप्या उपायांनी कार्यसिद्धी कशी होई&ल हे सांगणे.

ज्योतिष हे दैवी शास्त्र असले तरी त्याला मर्यादा आहेत आणि ही गोष्ट ज्योतिषांनी आणि ज्योतिष विचारणाऱयांनी अशा दोघांनीही लक्षात ठेवली पाहिजे. हे स्टॅटिस्टिकल सायन्स आहे. एखादा Pattern matching Algorithm जसा काम करतो त्याप्रमाणे ज्योतिषाचे डोके काम करत असते. एकही भाकित चुकले नाही असा ज्योतिषी जन्माला यायचा आहे.

ज्योतिषशास्त्राच्या अक्षरशः शेकडो पद्धती आहेत. आपल्या पारंपरिक ज्योतिषामध्येच पराशरी, जैमिनी, अष्टकवर्ग इ. अनेक मार्ग आहेत. रमल ज्योतिष हा काहीसा दुर्लक्षित पण भन्नाट प्रकार आहे. टॅरो हा बहुचर्चित आणि मानसिक स्थितीवर भाष्य करणारा प्रकार आहे. ज्याप्रमाणे भारतात पारंपरिक ज्योतिष शास्त्रात संशोधनात्मक काम करून नवे सिद्धांत शोधले गेले यामध्ये कै. कृष्णमूर्ती आणि कै. बी. व्ही. रामण (सर सी. व्ही. रामण यांचे थोरले बंधू) यांचे योगदान अतुलनीय आहे. त्याप्रमाणे पाश्चात्य ज्योतिषामध्येही झाले. फेड्रीक सीग्रन आणि अल्फ्ररेड विट्टे यांचे Uranian Astrology हे याचे उत्तम उदाहरण आहे. या सगळय़ाचा वापर आणि त्याबद्दल चर्चा प्रसंगानुरुप या लेखमालेत केली जाईल.

आता जाता जाता, या लेखाच्या मथळय़ाबद्दल! ‘जरा हटके जरा बचके!!’ माणूस समस्या असताना ज्योतिषाकडे जातो. कुणाचे लग्न जमत नसते, कुणाला मूल होत नसते. कुणाचा धंदा चालत नाही. कुणाला नोकरीत त्रास असतो. कुणाची मुले  अभ्यास करत नाहीत. तर कुणाला वाटते आपल्यावर करणी झाली आहे. याचाच फायदा काही संधीसाधू लोक घेतात. समस्येने गांजलेला माणूस त्याच्या जाहिरातीच्या जाळय़ात सापडतो आणि मग त्याचे अनेक प्रकारे शोषण होते. या सगळय़ा गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचे आहे, वाचायचे आहे.

सत्य ज्योतिष हे गणिती सिद्धांत आणि परमेश्वरी कृपेची जोड आहे. याच्या माध्यमातून होऊ घातलेल्या घटनांचा अंदाज घेऊन, आपल्या अंतर्मनाला साद घालून, सकारात्मक मानसिकतेच्या सहाय्याने आपल्याला जे हवे ते आपण मिळवायचे आहे. पटतंय ना? आज इथेच थांबतो.

कृष्णार्पणमस्तू! इदं न मम!

प्रा. पं. तेजराज किंकर

मेष

तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात वाद संभवतो. पराक्रम वाढेल. वाहन, घर आणि  संततीकडून सुख, जोडीदाराच्या कुटुंबीयांकडून मनःस्ताप, भाग्यापेक्षा कर्माला
प्राधान्य द्या. मोठय़ा लाभाची संधी सध्या नाही.

उपाय/उपासनाः बुधवारी श्रीविष्णूला लाल फूल चढवा.

सावध रहा- गुरुवार, मंगळवार

शुभ दिन- बुधवार, शुक्रवार, शनिवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः पांढरा

   वृषभ

कौटुंबिक सुख उत्तम. फोनवर विवाद टाळा, प्रॉपर्टीचे उत्तम योग. प्रेमप्रसंगात मनःस्ताप. रोग, शत्रू बळावणार. जोडीदाराला हिरवी वस्तू भेट द्या. कामात चुकारपणाचा फटका बसेल.

उपाय/उपासनाः शंकराच्या पिंडीवर दूध आणि पाण्याने अभिषेक करा.

सावध रहाः बुधवार, शुक्रवार

शुभ दिनः रविवार, मंगळवार, सोमवार

शुभ अंकः 8, शुभ रंगः राखाडी.

मिथुन

प्रकृती उत्तम राहील. पण अतिरेक नको. कुटुंबासोबत वेळ घालवाल. लहान भाऊ किंवा बहीण यांच्यामुळे फायदा. आईसोबत वाद टाळा. मनोरंजनाकरता खर्च कराल. जुने शत्रू त्रास देतील. सध्या भागीदारी नको. गुंतवणूक करण्याकरता योग्य वेळ नाही.

उपाय/उपासनाः शनिवारी काळभैरवाला पिवळय़ा मिठाईचा भोग द्या.

सावध रहाः मंगळवार, गुरुवार, शुक्रवार

शुभ दिनः बुधवार, शनिवार, मंगळवार

शुभ अंकः 1, शुभ रंगः काळा

कर्क

प्रकृती सुधारण्याकडे लक्ष द्याल. मनपसंत खाणे पिणे होईल. प्रवास टाळा. नवीन गाडी घेण्याचा योग. खेळाडूंसाठी आठवडा उत्तम. पैशाची आवक कमी राहील. मध्यस्थ होणे टाळा. होणारे काम आळसामुळे फसेल.

उपाय/उपासनाः शुक्रवारी देवीची ओटी भरा,

सावध रहाः गुरुवार, शुक्रवार

शुभ अंकः 3, शुभ रंग- पिवळा.

सिंह

रुबाबदारपणाला तब्येतीची साथ राहील. बोलण्यामुळे आपले लोक दुखावले जातील. व्यवसायाकरता जाहिरात यशस्वी होईल. मोठय़ा व्यक्तीमुळे जागेचे व्यवहार होतील. शेअर्समध्ये पैसे गुंतवू नका. भाग्याची साथ नाही. सध्याचे तुमचे प्रयत्न पुढे जाऊन उत्तम फळ देतील. नुकसान टळून फायदा होईल. यात्रा योग आहे.

उपाय/उपासनाः बुधवारी गुरुंच्या मंदिरात पिवळे फूल समर्पित करून प्रदिक्षिणा घाला.

सावध रहाः गुरुवार, सोमवार

शुभ अंकः 1, शुभ रंगः सोनेरी/ पिवळा

कन्या

चुकीच्या सवयीमुळे तब्येत बिघडेल. धनप्राप्ती उत्तम. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. जवळचे प्रवास होतील. आईची तब्येत सांभाळा. संततीमुळे मनःस्ताप, जोडीदाराशी वाद, नशिबाची उत्तम साथ. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. मानसन्मानाचे योग. विदेश यात्रेसाठी उत्तम काळ.

उपाय/उपासनाः सोमवारी ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’चा होईल तितका जप करा.

सावध रहाः गुरुवार, शनिवार, सोमवार

शुभ अंकः 2, शुभ रंगः लाल.

तुळ

आत्मिक समाधान मिळेल. वाणीचा प्रभाव पडेल. कागदपत्रे सांभाळा. घराची डागडुजी सध्या नको. कलाकारांवर अन्याय होईल. दीर्घकालीन आजार असलेल्यांनी चाचण्या करून घ्याव्या. मतभेदांमुळे संबंध दुरावतील. सगळय़ा प्रकारचा लाभ होईल. नोकरीत बदल करण्यासाठी उत्तम वेळ आहे.

उपाय/उपासनाः रविवारी सूर्याला अर्घ्य द्या किंवा पित्याला, पितृतुल्य व्यक्तीला तांब्याची वस्तू भेट द्या.

सावध रहाः बुधवार, गुरुवार, शुक्रवार

शुभ अंकः 5, शुभ रंगः पांढरा.

वृश्चिक

या आठवडय़ात नम्र राहण्याची गरज आहे. प्रवासात धन हानी होण्याची शक्मयता. एफ.डी किंवा दीर्घ मुदतीची ठेव सध्या ठेवू नका. प्रेमींना काळ अनुकूल नाही. संशोधकांना सुवर्णसंधी. भाग्याची उत्तम साथ राहील. सर्वार्थाने मानसन्मानाचे योग. पण संधींचा सदुपयोग करा. अध्यात्माकडे कल वाढेल.

उपाय/उपासनाः बुधवारी लहान मुलीला शालेय वापराची वस्तू भेट द्या.

सावध रहाः मंगळवार, शुक्रवार, बुधवार

शुभ अंकः 9, शुभ रंगः क्रीम

धनु

पोटाच्या समस्या जाणवतील. कौटुंबिक कलह टाळा. शेजाऱयांशी जुळवून घ्यावे लागेल. वाहन सुस्थितीत आहे याची खात्री करून घ्या. धाडशी खेळ आणि जुगारापासून दूर रहा. वैवाहिक सौख्य उत्तम. फुकटचा पैसा मिळण्याचे योग. लांबचा प्रवास होईल. कष्टाचा परतावा मिळेल.

उपाय/उपासनाः गरजू रुग्णाला मदत करा.

सावध रहाः रविवार, शुक्रवार, शनिवार

शुभ अंकः 1, शुभ रंगः आस्मानी

मकर

सध्या धीर धरण्याची गरज आहे. आळस झटकून कामाला लागा. सहकाऱयांची मदत घ्या. शब्द जपून वापरा. सोने नाणे सांभाळा. नोकरदार वर्गाने गटबाजीपासून सावध रहावे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. व्यवसायाचे गणित चुकणार नाही याची काळजी घ्या. गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे.

उपाय/उपासनाः बुधवारी लाल फूल देवीला अर्पण करा.

सावध रहाः बुधवार, रविवार, गुरुवार

शुभ अंकः 5, शुभ रंगः हिरवा.

कुंभ

संतती सुख उत्तम मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. जागेचा व्यवहार तुटणार नाही याची काळजी घ्या. डोळय़ांचे विकार संभवतात. भाऊबंदकीमुळे त्रास. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व कायम ठेवा. लाभासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील.

उपाय/उपासनाः गरजू दिव्यांग व्यक्तीला आर्थिक मदत करा.

सावध रहाः सोमवार, बुधवार, शनिवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः शेवाळी

मीन

पूर्वी केलेल्या पुण्याचे फळ मिळेल. स्त्रीपासून फायदा, धन हानीचे योग. प्रवास करताना सावध रहा. वाहन योग. कलावंतांना उत्तम संधी मिळेल. जुने आजार बळावतील. व्यावसायिक कामांकरता रविवार उत्तम. भाग्य साथ देईल. पण कामे पुढे ढकलू नका.

सावध रहा. ः शुक्रवार, रविवार, शनिवार

शुभ अंकः 1, शुभ रंगः सोनेरी

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.6 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य 16-11-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 जुलै 2020

Patil_p
error: Content is protected !!