Tarun Bharat

राशिभविष्य

16.1.2022 ते 22.1.22

मेष

सळसळत्या उत्साहाला संयमाची जोड देणे गरजेचे आहे. या आठवडय़ात प्रगतीच्या वाटा सापडतील.आत्मविश्वास वाढेल. पारिवारिक सुख समृद्धी उत्तम असेल.डोकेदुखीसारखे सामान्य आजार त्रास देऊ शकतात. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. कुणाला प्रपोज करायचे असेल तर जरुर करा. कामाच्या ठिकाणी कामे लांबतील. चंदनाच्या तेलाचा टिळा लावावा.

वृषभ

स्वास्थ्य उत्तम राहील. मित्रपरिवारासोबत एन्जॉय कराल. आळशीपणामुळे कामे रेंगाळू शकतात. पाहुणे येतील. वैवाहिक जीवन सर्वसामान्य राहील. मुलांच्या बाबतीत एखादे महत्त्वपूर्ण काम पूर्ण कराल. प्रेमसंबंधात मधुरता येईल. महत्त्वाचे पद, जबाबदारी मिळू शकते. व्यापार धंदा उत्तम चालेल. आर्थिक बाबतीत मध्यस्थ होणे टाळा. देवळातील घंटानाद ऐकावा.

मिथुन

आर्थिक बाबतीत आठवडा अनुकूल असला तरी तब्येतीला सांभाळावे लागेल. शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंधात बदल होण्याची शक्मयता आहे. वैयक्तिक मतभेदामुळे एखाद्या वेळेस ब्रेक अपसुद्धा होईल. मुलांच्या बाबतीतील समस्या महिना अखेरीस संपेल. सूर्यप्रकाशात किमान 7 मिनिटे बसावे.

कर्क

मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करा. सफल व्हाल. वैतृक  संपत्तीचा लाभ होऊ शकतो. शब्द दुधारी तलवार असतात, जपून वापरा. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नोकर वर्गाला आठवडय़ाच्या शेवटी जास्त काम लागेल. व्यापारी वर्गाने निराश होऊ नये. 7 प्रकारच्या धान्याचे दान करणे फायद्याचे ठरेल.

टॅरो उपाय-

समृद्धतेसाठी घरात क्रिस्टल बॉल सूर्यप्रकाश पडेल अशा जागी लावावा.

सिंह

कामे उत्साहात पूर्ण कराल. पण म्हणावा तसा परतावा मिळणार नाही. त्वचा विकार होण्याची शक्मयता आहे. आर्थिकदृष्टय़ा आठवडा सर्वसामान्य राहील. कौटुंबिक वातावरण थोडे तणावपूर्ण असेल. वैवाहिक जोडीदारासोबत वाद होतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तर कोणत्याही प्रकारची घाई करणे नुकसानदायक होईल. ‘औध’ अत्तर वापरावे.

कन्या

नव्या आर्थिक योजना राबवाल. मनात प्रसन्नता आणि सकारात्मकता येईल. वैचारिक दुविधा आणि मरगळ नाहीशी होईल. परिवाराची साथ मिळेल. मनात असूनही शत्रू काहीही करू शकणार नाहीत. धाडसी निर्णय घेणे टाळा. छोटी यात्रा, प्रवास लाभदायक होईल. मित्रांशी संबंध बिघडू शकतात. पिंजऱयातील पक्षाला सोडवा. प्रगतीचे मार्ग खुलतील.

तुळ

हा आठवडा शुभ आहे. शुभ कार्यासाठी उत्तम आहे. जीवनाचे नवे सूर सापडतील. ध्येय प्राप्तीकरता अधिक कष्ट करावे लागतील. भावनेच्या भरात कुठलेही काम करू नका. विवादाला तोंड द्यावे लागेल. अनोळखी व्यक्तीमुळे अडचणीत येऊ शकता. नवीन गुंतवणूक करण्याची योग्य वेळ नाही. घरातील अडगळ दूर करा आणि संपन्नतेला जागा द्या.

वृश्चिक

मित्रांच्या भेटीगाठीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाजू भक्कम असेल. नवीन दागिने किंवा कपडे खरेदी कराल. मांगलीक कार्याकरता खर्च होईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आत्मविश्वासाचे आव्हान पेलाल. अध्यात्माकडे मन झुकेल. व्यापार करणाऱयांनी तडजोड न करता कामे करावीत. दिव्यांगांचा आशीर्वाद लाभकारी सिद्ध होईल.

धनु

मंगलकार्य घडल्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. मानसन्मानाची प्राप्ती होईल. नोकरदार वर्ग कामे वेळेत पूर्ण झाल्याने आनंदी असेल. वैवाहिक जीवनात थोडा ताण येण्याची शक्मयता आहे. वाद विवाद टाळलेला बरा. लवमेट्सनी एकमेकांच्या गरजा समजून घेण्याची गरज आहे. भटक्मया जनावरांना चारा द्या, सुखसमृद्धी वाढेल.

मकर

धाडसामुळे पेचप्रसंग उभा राहू शकतो. एखाद्या खास मित्रामुळे किंवा मैत्रिणीमुळे कुटुंबात असंतोषाचे वातावरण होईल. घडून गेलेल्या एखाद्या घटनेमुळे मन उदास राहू शकते या आठवडय़ात चिडचिड जास्त होणार आहे. आर्थिकदृष्टय़ा सामान्य असेल. छुपे पेमप्रसंग उघड होऊ शकतात. नोकरवर्गाला हा आठवडा शुभ आहे. माशांना कणकेचे छोटे गोळे घाला.

कुंभ

वैवाहिक जीवनात बहार येईल. पण छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे शिका. अडलेली कामे मार्गी लागतील. वरि÷ांची मर्जी राहील. कमी प्रयत्नात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील, प्रयत्न जरुर करा. सौंदर्य प्रसाधनांचा किंवा सुखसोयीच्या वस्तूंचा व्यापार करणाऱयांना हा आठवडा फायदेशीर आहे. गरजूला खाद्यतेलाचे दान करणे इष्ट ठरेल.

मीन

उत्तम आठवडा आहे. प्रेमी युगुलांना एकमेकांच्या सहवासाने आनंद वाटेल. वैवाहिक जीवनात समरसता असेल. पाय किंवा टाचेचे दुखणे येऊ शकते. नोकरीमध्ये वरि÷ांमुळे काम होईल. जमीन, वाहन घेण्याचे स्वप्न असेल  तर योग्यवेळ आहे. या आठवडय़ात गुंतवणूक जरुर करा. फायदा होईल. गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट द्या, कामे होतील.

Related Stories

आजचे भविष्य बुधवार दि. 31 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 7 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मार्च 2023

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p