Tarun Bharat

राशिभविष्य

20.02.ते 26.2.2022 पर्यंत

मेष

गर्दीत राहूनही एकटेपणा अनुभवास येईल. परिवारातील सदस्यांचे, मित्रांचे आपल्याला पूर्ण सहकार्य लाभत नाही असे जाणवेल. या आठवडय़ात संयम बाळगा. नात्यांना स्पेस द्या. पैशांच्या दृष्टीने जरी हा आठवडा सर्वसामान्य असला तरी कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. लवमेट्सनी धीटाईने वागायला हवे. वैवाहिक जीवन समाधानी असेल. मुंग्यांना साखर घालावी.

वृषभ

या आठवडय़ात प्रलोभनांच्या जाळय़ात अडकू नका. कामाच्या ठिकाणी शॉर्टकट मारावासा वाटेल. पण यातून चुका संभवतात. एखादी व्यक्ती चुकीचा सल्ला देऊ शकते. सावध राहण्याची गरज आहे. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. एखादा निर्णय घेण्यापूर्वी परिवारातल्या सदस्यांचे मत विचारात घ्याल. लवमेट्सनी वाद टाळावा. काळी मिरीचे सात दाणे जवळ ठेवावेत.

मिथुन

या आठवडय़ात परिस्थितीचे पूर्ण अवलोकन करा. मनात ताण तणाव असतील तर ते दूर करा. आत्मविश्वास कसा वाढेल याकडे लक्ष द्या. महत्त्वाची कामे पूर्ण करून घेण्याकरता दुसऱयाची मदत लागली तर जरुर घ्यावी. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. सिंगल लोकांना या आठवडय़ात प्रेमात यश मिळेल. कष्टकरी लोकांना दूध वाटा.

कर्क

कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण विचार करूनच करावे हा टॅरोचा संदेश आहे. तब्येतीला सांभाळण्याबरोबरच परिवारातील सदस्यांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. पैशांच्या व्यवहारात सावध राहून कोणालाही उसने पैसे देऊ नका. अडकण्याची शक्मयता जास्त आहे. लवमेट्सनी अहंपणा टाळावा. पिंपळाच्या पानावर अष्टगंधाने ॐ लिहून जवळ ठेवा.

सिंह

वादापासून मग तो घरातील असो वा बाहेरचा, दूर राहण्यातच  शहाणपण आहे. रागावर नियंत्रण ठेवणे या आठवडय़ात गरजेचे आहे. काही मनाविरुद्ध प्रसंग घडतील. पण त्याचा ताण घेतल्यास तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कष्ट वाढणार आहेत. लवमेट्सनी विश्वास ठेवावा. वैवाहिक जीवनात सहकार्याने कामे करा. पक्ष्यांना बाजरी घाला.

कन्या

या आठवडय़ात काही विशि÷ बदलांना सामोरे जावे लागेल. सध्याची जी नीरस, गती नसलेली परिस्थिती आहे, ती बदलणार आहे. कष्टाची तयारी ठेवावी लागेल. परिवारातील छोटे छोटे वाद उग्र रूप धारण करणार नाहीत याची काळजी घ्या. तब्येतीच्या छोटय़ा मोठय़ा तक्रारी येऊ शकतात. पैशांची आवक समाधानकारक असेल. गाईला चारा घालावा.

तुळ

यश प्राप्तीकरता थोडी वाट पहावी लागेल. पण यश नक्की मिळणार याची खात्री बाळगा. या आठवडय़ात शुभ सूचना, दैवी संकेत मिळू शकतात. उपासनेचे फळ मिळेल. तब्येतीच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. पैशांची आवक वाढेल. वचनपूर्तीचे समाधान असेल. लवमेट्सनी एकमेकाला भेटवस्तू द्यावी. जोडीदाराला लाल फुले भेट द्या.

वृश्चिक

या आठवडय़ात गुप्त शत्रू तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतील. कट कारस्थान, गटबाजी यापासून धोका आहे. रोग बळावण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या सगळय़ा गोष्टींपासून सावध राहण्याची गरज आहे. पैशांच्या अतिलोभापासून दूर रहा. जुनी येणी वसूल करण्याकडे जोर द्या. वैवाहिक जीवनात समाधान असेल. कुत्र्यांना खाणे घाला.

धनु

आठवडय़ाच्या सुरुवातीलाच अडचणी येतील, पण तुम्ही सगळय़ा अडचणींवर मात कराल. टॅरोचा संदेश आहे की विजय तुमचाच असणार आहे. या आठवडय़ात परिवारासोबत एखादी सहल काढावीशी वाटेल. पाण्याच्या ठिकाणी (जलाशय, धबधबा, समुद्र) भेट द्यावी असे वाटेल. वैवाहिक जोडीदाराशी वाद टाळा. उजव्या मनगटात लाल दोरा बांधावा.

मकर

कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. काम आणि कौटुंबिक जीवन यात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. टॅरोचा असाही संदेश आहे की कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे चूक होऊ शकते आणि त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तब्येत ठीक  राहील. पैशाची आवक थोडी मंदावेल. 7 कवडय़ा हळद लावून जवळ ठेवाव्यात.

कुंभ

दिलेला शब्द पाळणे किती महत्त्वाचे आहे हे या आठवडय़ात तुम्हाला लक्षात येईल. याचबरोबर नातेसंबंधांना जपणे, दृढ करणे गरजेचे आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवेल. अधीरतेमुळे एखादी संधी हातून जाऊ शकते. पैशांच्याबाबतीत हा आठवडा सर्वसामान्य आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. घरात अनावश्यक सामान ठेवू नका.

मीन

पुढे काय होईल याची चिंता तुम्हाला सतावत असल्यास व्यर्थ काळजी करणे सोडा. आता जरी कामाच्या क्यापात गुरफटले गेले असलात तरी पुढे मार्ग नक्की मिळणार. अडचणी जरी असल्या तरी एक एक अडचण सोडवा. पैशांच्या बाबतीत परिस्थिती लवकरच सुधारेल. वैवाहिक जीवनात थोडा ताण असेल. तळलेल्या वस्तू दान करा.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 9 जुलै 2022

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 डिसेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य 30-04-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 जानेवारी 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 5 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.13 मे 2021

Patil_p