Tarun Bharat

राशिभविष्य

Advertisements

27.02.2022 ते  5.3.2022

मेष

कुणा दुसऱयाच्या मतापेक्षा स्वतःमधील गुण ओळखून आपल्या अंतर्मनाचा संदेश ऐका असे टॅरोचे म्हणणे आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच धावपळ करावी लागणार आहे. कामे पूर्ण करण्यात दमछाक होईल. नको असताना नवीन जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. परिवारातील सदस्यांचे मन सांभाळावे लागेल. लवमेट्सनी प्रायॉरिटीज लक्षात घ्याव्या. भीमसेनी कापूर जवळ ठेवावा.

वृषभ

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींबद्दल विचार करत होता त्या प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन ओळखी, नातेसंबंध निर्माण होतील. याचा पुरेपूर लाभ घ्या. मित्राच्या मदतीमुळे एखादे काम पूर्ण होईल. घरातील वातावरण हसरे ठेवण्याचा प्रयत्न कराल. पैशांची आवक चांगली असेल. लवमेट्सनी नाते दृढ करावे. जमिनीवर न पडलेले अशोकाचे पान जवळ ठेवा.

मिथुन

हा आठवडा अत्यंत सकारात्मक आहे. स्वतःच्या हिमतीवर कठोर परिश्रमाने  परिस्थितीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक मदतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. खोटय़ा आश्वासनांच्या भरोशावर राहू नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी फक्त आपण बरे आणि आपले काम बरे ही वृत्ती ठेवा. हिरवी काचेची गोटी जवळ ठेवा.

कर्क

तब्येतीला सांभाळण्याबरोबरच नातेसंबंधांनासुद्धा सांभाळण्याची गरज आहे, असा टॅरोचा संदेश आहे. तुमच्या वागण्याचा घरातील लोकांवर काय परिणाम होतो याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संबंध बनवताना जुन्या मैत्रीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात वादावाद होईल. बांधकाम मजुरांना पांढरी मिठाई भेट द्या.

टॅरो उपाय- प्रसिद्धी, लोकप्रियतेसाठी, कलाकार, राजकारणातल्या लोकांना विशेष उपयुक्त. चांदीच्या पेल्यात स्फटिकाचे 33 दाणे घालून रात्रभर ठेवून सकाळी ते पाणी प्यावे.

सिंह

उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती अनुभवाला येऊ शकते. आर्थिक गणित कुठेतरी चुकत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. अशा परिस्थितीत डोके शांत ठेवून उपाय शोधण्याची गरज आहे. नातेसंबंधांमध्येही वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तोंडून चुकीचा शब्द येणार नाही याची काळजी घ्या. सरकारी आवारातील झाडाला पाणी घाला.

कन्या

जबरदस्त आत्मविश्वासाच्या बळावर आणि आतल्या आवाजाच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुम्हाला वाटेल की तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज नाही, हे जरी खरे असले तरी अहंपणा येणार नाही याची काळजी घ्या. परिवारातील लोकांच्या व्यस्ततेमुळे थोडे एकाकी वाटू शकते. वैवाहिक जीवनात रोमांच आणण्याची गरज आहे. आंघोळीच्या पाण्यात  1 थेंब गोमूत्र घाला.

तुळ

इतरांना दिलेला शब्द पाळणे आणि नातेसंबंध दृढ करणे गरजेचे आहे असा टॅरोचा संदेश आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या किंवा इतर क्षेत्रातील ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. पारंपरिक विचारांच्या चौकटीतून बाहेर पडून नवीन दृष्टीने कामे कराल. घरातील वातावरण सकारात्मक राहील याचा प्रयत्न करा. आपली इच्छा लिहून तो कागद धार्मिक पुस्तकात ठेवावा.

वृश्चिक

आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रति÷sत वाढ होईल, असा टॅरोचा संदेश आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येईल जी आर्थिक मदत तर करेलच पण त्याचबरोबर अमूल्य सल्लादेखील देईल. पारिवारिक सुखाच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. लवमेट्सनी संयम बाळगावा. उधारी घेऊ किंवा देऊ नये. वाहत्या पाण्यात 5 मुठी गहू सोडावा.

धनु

हा आठवडा विश्वास आणि आशा यांची वाढ होणार असे दाखवतो. पण कोणत्याही गोष्टीवर किंवा व्यक्तीवर अंधविश्वास असू नये. फसगत होण्याची शक्मयता असते. आयुष्यात एखादी चांगली घटना घडावी, असे वाटत असेल तर तसे धाडसी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. पैशांची आवक ठीक राहील. वैवाहिक जोडीदाराला अत्तर भेट द्या.

मकर

गुंतागुंतीच्या कामांमुळे मानसिक ताण आला असे तुम्हाला वाटत आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडा वेळ एकटे राहण्याची, विश्रांती घेण्याची गरज आहे, असे वाटत आहे. मन थोडे आध्यात्मिकतेकडे झुकेल. पैशांची आवक ठीक असली तरी तुम्हाला समाधानकारक वाटणार नाही. वैवाहिक आयुष्यात समाधान असेल. कवडी उदाचा धूर घरात पसरवावा.

कुंभ

 या आठवडय़ात तुमच्याकडे संधी चालून येतील. लोकांना हाताळण्याच्या तुमच्या पद्धतीमुळे नेतेपद, प्रमुखपद मिळू शकते. मेहनतीने कामे पूर्ण कराल. पारिवारिक जबाबदाऱयांमध्ये वाढ होईल. याच बरोबर एखाद्याला कठोर शब्दात समज द्याल. लवमेट्सना आनंदाचे दिवस येत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट द्या.

मीन

कामामध्ये प्रगती होईल. हा काळ थोडे थांबून वाट बघण्याचा आहे. भविष्यात तुम्हाला अनेक संधी किंवा पर्याय मिळतील. पण त्यासाठी सध्या संयम बाळगून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदाराच्या सल्ल्याचा फायदा हाईल. लवमेट्सनी एकमेकाला समजून घ्यावे. आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ घालून आंघोळ करा.

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2020

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 21-01-2022

Amit Kulkarni
error: Content is protected !!