Tarun Bharat

राशिभविष्य

तेरे मेरे सपने  (स्वप्न शास्त्रः भाग 2)

 स्वप्नांबद्दल बोलत आहोत आणि दृष्टांताबद्दल बोललो नाही, असे होऊ शकत नाही. यासंबंधी एक गोष्ट सांगतो. 22 डिसेंबर 1887 रोजी  जन्मलेल्या श्रीनिवास रामानुजम यांना कोणतेही गणिताचे अधिकृत प्रगाढ शिक्षण मिळाले नाही. क्लार्क म्हणून काम करत असताना त्यांनी लंडन येथील केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या जी. एच. हार्डी यांना पत्राद्वारे संपर्क साधला. गणितामधील काही नियमांना सिद्ध करून त्यांनी ते कागद हार्डी यांना पाठवले. आतापर्यंत अशक्यप्राय समजल्या जाणाऱया गणितातील त्या उदाहरणांना रामानुजन यांनी लीलया हाताळलेले पाहून हार्डी चकित झाले. त्यांनी त्यांना लंडनला पाचारण केले. 1914 ते 1919 या दरम्यान आपल्या लंडन येथील वास्तव्यात रामानुजन यांनी गणितातील 3,900 हून अधिक अवघड प्रमेय सोडवून दाखवले. कित्येकांना हे अवघड प्रमेय सोडून दाखवणे अशक्यप्राय वाटले होते. अनेक दिग्गजांनी हे शक्य नाही, असा अभिप्राय दिला होता. आजारपणामुळे लंडन सोडण्यापूर्वी हार्डी यांच्याकडे जी वही त्यांनी सोपवली त्यात विस्तारपूर्वक गणिते सोडवली होती. तुम्हाला हे कसे जमते असे विचारल्यावर रामानुजन नम्रपणे सांगत की त्यांची देवी स्वप्नात त्यांना उत्तर देते. स्वप्नांच्या बाबतीत भारतातील सर्वश्रे÷ गणितज्ञाला हे वाटते!! असा स्वप्नांचा महिमा आहे.  ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. मनाच्या चार अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, निद्रा किंवा सुशुप्ती आणि तुरीय. जागृत अवस्था म्हणजे सध्या तुम्ही ज्या अवस्थेत आहात ती. ज्यात विचार करणे निर्णय घेणे, भावना व्यक्त करणे, एखाद्या गोष्टीला समजून घेणे इत्यादी इत्यादी कामे होतात. स्वप्नावस्था ही बऱयाच गोष्टींशी संलग्न आहे. शारीरिक अवस्था, भूतकाळातील आठवणी, भविष्याची चिंता या सगळय़ा गोष्टींचा परिणाम स्वप्नांवर होत असतो किंवा या गोष्टींमुळेसुद्धा स्वप्ने पडतात. अशी माणसे खूप कमी आहेत की ज्यांना स्वप्ने पडत नाहीत. काहींना पडलेली स्वप्ने अगदी स्पष्ट आठवतात, काहींना स्पष्ट आठवत नाहीत आणि काहींना आठवतच नाहीत. शारीरिक अवस्थेमुळे पडणारी स्वप्ने ही त्या अवस्थेतील भावभावनांचे दर्शन असते. पौगंडावस्थेत पडणारी स्वप्ने, तारुण्यात पडणारी स्वप्ने, आजारी असताना, म्हातारपणात पडणारी स्वप्ने साहजिकच वेगवेगळी असतात.

(सगळय़ांना श्रीदत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच गुरुचरित्राचे पारायण कसे करावे यावर लिहिण्यात येईल)

(क्रमशः)

 महाउपाय कित्येकांची आर्थिक स्थिती उत्तम असते आणि नंतर अचानक बिघडते. जिथे सोन्याची कौले होती तिथे आर्थिक तंगी सतावू लागते. अशावेळी सोमवारी विद्वान गुरुजींकडून श्रीसुक्ताची आवर्तने म्हणत  आवळय़ाच्या रसाने शंकराचा अभिषेक करावा.

 महाउपाय आपल्या घरात अनेक वस्तू असतात (कपडे, चप्पल, पेन.) प्रत्येक वस्तूचा स्वतःचा असा औरा असतो. औरा म्हणजे आभा मंडळ. ज्या वस्तूंचे आभा मंडळ दूषित असते त्याने वास्तूवर नकारात्मक परिणाम होतो. चांगल्या आभा मंडळाचा चांगला परिणाम होतो. साधारण एक इंच आकाराचा रुद्राक्ष दोरीला टांगून एखाद्या वस्तूवर धरला तर तो रुद्राक्ष आपोआप घडय़ाळय़ाच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतो. यावरून घरातील दूषित वस्तू दूर करता येतात.

मेष

सप्ताहाचा मध्य हा विशेष लाभकारी ठरण्याची शक्मयता आहे. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता संधी मिळतील. स्वभावामध्ये एक प्रकारचा हट्टीपणा येण्याची शक्मयता आहे. दुसऱयाने तुमच्यावर अधिकार गाजवलेला तुम्हाला चालणार नाही. संततीच्यादृष्टीने थोडी काळजी वाटू शकते. नोकरदार लोकांना अनुकूल काळ आहे. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीला अनुमोदन मिळेल.

उपाय ः काळय़ा गाईची सेवा करावी

वृषभ

बुधवारी होणारा लक्ष्मीयोग तुमच्या मनातील बऱयाच इच्छा पूर्ण करेल. स्वभावात एक प्रकारचे धाडस येईल. पूर्वी येत असलेले टेन्शन दूर होईल. या काळात तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यावे. अचानक धनलाभाचे योगही बनत आहेत. त्यामुळे अडकलेले पैसे वसूल करण्याचा प्रयत्न जरूर करावा. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार करत असताना जपावे लागेल. मानसन्मानात वृद्धी होईल. मित्रांची साथ मिळेल.

उपाय ः धार्मिक ठिकाणी हळदीच्या गाठी दान द्याव्यात.

मिथुन

जोडीदारामुळे बराचसा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. दुखणे अंगावर काढू नका. कागदपत्रे व्यवहारात मनासारखे यश मिळेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात अनपेक्षितरित्या कलाटणी मिळून इच्छापूर्ती होईल. संततीकडून सुवार्ता कळू शकते. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ होईल. प्रेमसंबंध वृद्धिंगत होतील. तीर्थयात्रा घडू शकते.

उपाय ः बुधवारी गणेशपूजन करावे.

कर्क

सगळय़ा प्रकारच्या लाभाची शक्मयता आहे. लाभस्थानातील लक्ष्मीयोग बऱयाचशा इच्छा पूर्ण करेल. मोठय़ा भावंडांकडून किंवा मित्रांकडून मदत मिळून समस्या दूर होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त होण्याची शक्मयता आहे. तब्येत सुधारण्याकरिता प्रयत्न करावे. प्रवासातून फायदा होईल. प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरदार वर्गाने सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या घटनेचा त्रास होऊ शकतो.

उपाय ः वाहत्या पाण्यात बत्तासे सोडावे.

सिंह

तब्येतीची काळजी करण्याचे कारण नाही. फक्त टेन्शन घेणे टाळावे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल. कामानिमित्त केलेल्या प्रवासात चांगले यश प्राप्त होईल. गुंतवणूक करत असताना सावध राहणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्मयता असेल. वैवाहिक जोडीदार मनासारखे वागेल. भागीदारीतून फायदा होईल.

उपाय ः  पूर्वीच्या पानावर श्रीराम लिहून मारुतीला अर्पण करावे

कन्या

आरोग्याच्या समस्या दूर होतील पण निष्काळजीपणा करू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन घेण्याचा विचार कराल. नोकरदार वर्गाला इन्क्रिमेंट किंवा प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. लाभ मिळवण्याकरता जास्त कष्ट करावे लागतील. मित्रांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. विदेश प्रयाणाकरता प्रयत्न करत असाल तर अनुकूल काळ आहे.

उपाय ः हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी

तूळ

मनात विविध नकारात्मक विचार आले किंवा नैराश्याचा सूर लागला तर त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. पुढे अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत याची खात्री बाळगा. सरकारी कामे होतील. प्रवासाचे अनेक योग आहेत. रोजच्या जीवनात बदल म्हणूनसुद्धा प्रवास करू शकता. प्रॉपर्टीची कामे वेळाने का होईना पण पूर्ण होतील. तब्येतीला जपावे लागेल. नियमित आरोग्याची तपासणी करून घ्यावी.

उपाय ः  हिरव्या वस्तूचे दान द्यावे

वृश्चिक

 स्वभाव करारी बनेल पण त्यात हट्टीपणा येऊ देऊ नका. कामे पूर्ण करण्याचा उत्साह वाढेल. आर्थिक स्रोत बळकट होईल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. व्यवसायिकांना अनुकूल काळ आहे. आळस झटकून कामाला लागावे. अचानक फायदा होण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. अपघातापासून सावध रहा.

उपाय ः मंदिरात दूध दान द्यावे

धनु

येणाऱया काळात तब्येतीला सांभाळावे लागेल. लहान मोठे आजार त्रास देऊ शकतात. पैशाची आवक चांगली असेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील. प्रवासात नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. प्रॉपर्टीच्या कामात दुसऱयाच्या मदतीने सफलता प्राप्त होईल. प्रेमींनी गैरसमज टाळले तरच नाते सुव्यवस्थित राहील. नोकरदार वर्गाला जास्त कष्ट करावे लागतील.

उपाय ः मूठभर तांदूळ पाण्यात सोडावे

मकर

प्रत्येक काम रेंगाळून पूर्ण होत आहे असे वाटत असेल तर कामाचा वेग वाढला तरच समाधान प्राप्त होईल. धार्मिक कारणाकरता प्रवास होऊ शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रॉपर्टीच्या कामात सावध राहिलेले बरे. या काळात मन करमणुकीच्या साधनांकडे जास्त असेल. प्रेमसंबंध सुधारतील. संततीविषयी चांगली घटना घडेल. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा जाच संभवतो. अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे.

उपाय ः केशराचा टिळा लावावा

 कुंभ

 नवचैतन्य आणि आत्मविश्वास यांनी परिपूर्ण असा काळ आहे. याचा फायदा उचलायचा प्रयत्न करा. तब्येतीची विशेष तक्रार असणार नाही. धनागम सहजतेने होईल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. प्रवासात सावध राहावे. एखादी व्यक्ती फसवू शकते. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रांची नीट चाचणी करावी. वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. भाग्याची साथ आहे.

उपाय ः शनिवारी पिंपळाला दूध घातलेले पाणी घालावे.

मीन

धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. सहज पूर्ण होणारी कामे घडल्याने थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. वादावादीमुळे घरचे वातावरण बिघडू नये याची काळजी घ्या. प्रवास शक्मयतो टाळा. नोकरदार वर्गाला अनेक संधी प्राप्त होतील ज्यामुळे आर्थिक बाजू सुधारेल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. शक्मयतो जोडीदाराचा सल्ला घ्या. छोटय़ा-मोठय़ा अपघातापासून सावध रहावे. लांबून चांगली बातमी कळेल.

उपाय ः गुरुवारी दत्त दर्शन घ्यावे.

Related Stories

राशिभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 31 जुलै 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.7 एप्रिल 2022

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p