वार्ताहर / राशिवडे
राशिवडे गावामध्ये समुह संसर्गाचा स्फोट झाला असुन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकोणीसवर पोहोचली आहे.या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील असलेल्या व्यक्तिंना तपासणीसाठी राधानगरी कोविड सेंटरकडे पाठविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
कालपर्यंत गावातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहावर होती. परंतु समुह संसर्गामुळे आज ही १९ वर पोहोचली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा समावेश असुन यामध्ये दोन व पाच वर्षाच्या दोन बालकांचाही समावेश आहे. खबरदारी म्हणुन बाधितांच्या संपर्कातील लोकांची माहीती घेतली जात असुन त्यांच्या तपासणीसाठी राधानगरी कोविड सेंटरवर पाठविले जात आहे. आतापर्यंत सापडलेले रुग्ण तीन परिवारातील आहेत. राशिवडे आरोग्य केंद्रामध्ये मोहडे येथील काम करणाऱ्या एका शिपायालाही कोरोनाची लागल झाली आहे. संबधित शिपाई कोविड सेंटरवर दोन दिवस नियुक्तींसाठी गेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे.खबरदारी म्हणून गावातील दुध संकलन ही दोन दिवस बंद करण्यात आले आहे.


previous post