Tarun Bharat

राशींचा देश-टॅरोचा संदेश अर्जुनवीर साई सोशल, ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघ क्वॉलिफायर फेरीत

बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित बेळगाव प्रीमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाने साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाचा 5 धावांनी तर दुसऱया सामन्यात अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने के. आर. शेट्टी संघाचा 55 धावांनी पराभव करून 4 गुण मिळवून क्वॉलिफायर फेरीत प्रवेश केला. साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स व सुवपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना 8 गुणांसह एलिमिनेटर फेरीत प्रवेश केला. चेतन पांगिरे (ऍक्सेस), अमय भातकांडे (अर्जुनवीर) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआयने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या. त्यात चेतन पांगिरेने 4 षटकार व 7 चौकारासह 55 चेंडूत 84, माजिद मकानदारने 1 षटकार 3 चौकारासह 30, अभिषेक देसाईने 2 चौकारासह 19 धावा केल्या. साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सतर्फे स्वप्निल ऐळवेने 21 धावात 2 तर डॉमनिक फर्नांडिस व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 20 षटकात 7 गडी बाद 164 धावाच केल्या. त्यात रोहित पोरवालने 5 चौकारासह 34, राजेंद्र दंगण्णवरने 2 षटकार 1 चौकारासह 33, डॉमनिक फर्नांडिसने 2 षटकारासह 23, कृष्ण बागडीने 17 धावा केल्या. ऍक्सेसतर्फे झिनत मुडबागीलने 28 धावात 4, सुशांत कोवाडकरने 24 धावात 2, तर ज्ञानेश होनगेकरने 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने 20 षटकात 4 गडी बाद 183 धावा केल्या. त्यात अमेय भातकांडेने 2 षटकार 7 चौकारासह 80, विजयकुमार पाटीलने 1 षटकार 2 चौकारासह 34, सुदीप सातेरीने 1 षटकार 2 चौकारासह 31, तर सुजय सातेरीने 1 षटकार 4 चौकारासह 24 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाचा डाव 16 षटकात सर्वबाद 128 धावात आटोपला. त्यात प्रशांत लायंदरने 1 षटकार 7 चौकारासह 63, विनोद देवाडीगाने 3 चौकारासह 14 धावा केल्या. अर्जुनवीर श्री साई सोशलतर्फे शुभम भादवणकरने 22 धावात 3, अनिलगौडा पाटीलने 25 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश पाटील, मधुकर पाटील, बाबासाहेब बाबशेट, प्रसन्ना सुंठणकर यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार चेतन पांगिरे, इम्पॅक्ट खेळाडू झिनत मुडबागील, उत्कृ÷ झेल हार्दिक ओझा तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे प्रमोद कदम, संगम पाटील, सुमंत वेलींग, सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार अमेय भातकांडे, इम्पॅक्ट खेळाडू शुभम भादवणकर, उत्कृ÷ झेल अनिलगौडा पाटील यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

 रविवारी पहिला क्वॉलिफायर सामना अर्जुनवीर श्री साई सोशल वि. ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय यांच्यात सकाळी 9 वा.

एलिमिनेटर सामना श्री साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना यांच्यात दुपारी 1 वा. होणार आहे.

Related Stories

रॉबिन उत्थप्पाचेही पुनरागमनाचे लक्ष्य

Patil_p

वर्ल्ड टूर फायनल्समधून पीव्ही सिंधूची माघार

Patil_p

द.आफ्रिकेचा इंग्लंडवर डावाने विजय

Patil_p

तिसरा सामना जिंकून भारताची मालिकेत आघाडी

Patil_p

स्कॉट नेव्हेली इस्ट बंगालशी करारबद्ध

Patil_p

पावसामुळे तिसऱया दिवशीचा खेळ वाया

Patil_p