Tarun Bharat

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Advertisements

दिनांक 26-06-2022 ते 2-6-2022 पर्यंत

 मेष

या आठवडय़ामध्ये तुम्हाला वाट पहावी लागेल, एखादी घटना घडण्याची किंवा एखाद्या व्यक्तीची. जवळच्या व्यक्तीने दिलेला शब्द न पाळल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. आर्थिकबाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. पैसे वसूल करण्याकरता साम-दाम-दंड-भेद नीती वापरावी लागेल. कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतात. प्रेमात यश आहे.

जखमी जनावराच्या उपचाराचा खर्च उचलावा

वृषभ

व्यक्ती तितक्मया प्रकृती हे लक्षात ठेवावे लागेल. पूर्वी केलेली काही चांगली कर्मे  फळाला येतील. पैशाची आवक सर्वसामान्य असेल. नातेसंबंधात दृढता निर्माण होईल. घरात समारंभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कष्टाचे चीज होईल. आर्थिक देवाणघेवाण करत असताना सावध असावे. एखादा उपहार मिळू शकतो.

लाल फूल जवळ ठेवावे

मिथुन

 या आठवडय़ात काही नवीन घडामोडी घडतील ज्याचा परिणाम दूरवर होऊ शकतो. तुम्हाला संतुलित राहणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये दुरावा येईल अशी कोणतीही गोष्ट टाळावी. कामाच्या ठिकाणी कृतींचा पुढील परिणाम अगोदर लक्षात ठेवून नियोजन करावे. पैशांची आवक उत्तम असेल. वैवाहिक जीवनात समाधानी असाल.

 शंखामधील पाणी घरात शिंपडावे.

कर्क

या आठवडय़ात तुमच्या भावनांवर आवर घालण्याची गरज आहे. भावनिक उदेक होऊ शकतो व त्याचे पर्यवसान नात्यांमध्ये कटुता येणे किंवा स्वतःच्या तब्येतीवर परिणाम होणे यात होऊ शकते. शक्मयतो सगळय़ा घटनांना सहजतेने स्वीकारा. जिथे मदतीची गरज आहे तिथे मदत मागा. आर्थिक स्थैर्याकरता प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तीकडून त्रास संभवतो.

अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी.

सिंह

कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतील. अंतर्गत राजकारणाने तुम्ही त्रस्त व्हाल. व्यावसायिकांना काळाची पावले ओळखून काम करण्याची गरज आहे. जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. प्रेमींनी एकमेकांना स्पेस देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात छोटय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

चांदीचा तुकडा जवळ ठेवावा

कन्या

 येणारा आठवडा हा परतफेड करायचा आठवडा आहे. यामध्ये आर्थिक परतफेड किंवा परिवारातील एखाद्या सदस्याने केलेल्या प्रेमाची परतफेड करावी लागेल. एखादी व्यक्ती तुमच्याकडून मदत मागेल आणि तुम्ही ती आनंदाने कराल. अनाठायी खर्च केल्याने आर्थिक नियोजन बिघडू शकते. प्रेमसंबंधांमध्ये एखादी अप्रिय घटना घडेल.

तळलेल्या पदार्थांचे दान द्यावे

तूळ

स्वप्नपूर्तीचा आठवडा आहे पण मोहजालात न फसलेले बरे. काही ठिकाणी अपेक्षाभंग संभवतो. बरेच दिवस टाळलेला एखादा प्रवास करावा लागू शकतो. कामे विलंबाने पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या योजनांचे कौतुक होईल. नातेसंबंधात ताण तणाव येऊ शकतो. या आठवडय़ात एक प्रकारचे औदासिन्य जाणवेल. कामाच्या ठिकाणी परतफेडीची अपेक्षा न करता एखाद्याला मदत करा, फायदा होईल.

धार्मिक स्थळी धूपदान करा

वृश्चिक

 या आठवडय़ामध्ये कित्येक प्रसंग असे येतील की जिथे माघार घ्यावीशी वाटेल. बऱयाच वेळेला तडजोडीने मार्ग निघतो हे तुम्हाला जाणवेल. कामाच्या ठिकाणी नम्रपणे आणि गोड बोलले तर कामे होतील. आयत्यावेळी नातेवाईकांच्या मदतीकरता जावे लागू शकते. इच्छा नसताना खर्च करावा लागेल. पैशांची आवक सर्वसाधारण असेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

पक्ष्यांना बाजरीचे दाणे घाला

धनु

या आठवडय़ात आळसाचे प्रमाण वाढणार आहे. कामे पूर्ण करण्यास टाळाटाळ होईल पण आळस झटकून कामाला लागलेले बरे. अपरिचित व्यक्तीच्या बोलण्यामध्ये येऊन नुकसान होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांकडून गोड बोलून कामे करून घ्या. एखादी घटना अशी घडेल की ज्याबद्दल तुम्ही गंभीरतेने विचार कराल. कुटुंबातील एखादी व्यक्ती परगावी जाऊ शकते.

चंदनाचा सुगंध वापरावा

मकर

जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम आहे हे लक्षात घ्या. या आठवडय़ात अशा अनेक संधी मिळतील जिथे तुम्ही चांगली किंवा वाईट दोन्हीही कर्मे करू शकता पण तुमचे ध्यान सत्कर्माकडे असावे. ऑफिसमध्ये एखादा प्रॉब्लेम सतावू शकतो. त्याकरता इतरांची मदत घ्यावी लागेल. नवीन नोकरी किंवा व्यवसायाचा प्रयत्न करत असाल तर सुसंधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचा सहयोग लाभेल.

काळा हातरुमाल जवळ ठेवावा.

कुंभ

या आठवडय़ात तुम्हाला बरीच रंग बदलणारी माणसे भेटतील. अगदी जवळची माणसेसुद्धा वेळ आली की आपला खरा रंग दाखवतात हे कळेल. म्हणूनच अति विश्वास टाळावा. मनातल्या योजना कोणाकडेही सांगू नयेत. एखादी चूक महागात पडू शकते. पैशांचा योग्य विनियोग होणार नाही त्यामुळे पुढे जाऊन अडचण येऊ शकते. एखादी ज्ये÷ व्यक्ती कौटुंबिक अडचणींवर सल्ला देईल.

गाईला हिरवा चारा घालावा

 मीन

 आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असेल. नातेवाईकांची मदत होईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात अति गुंतल्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ शकते. जुना एखादा छंद जोपासा. थोडी विश्रांतीसुद्धा घ्यावीशी वाटेल. प्रेमींनी नात्याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनातील चढ-उतारामुळे काहीसे त्रस्त होऊ शकता. तुळशीखालील मातीचा टिळा लावावा

टॅरो उपाय ः  पैसे सहजतेने येण्यासाठी शुक्रवारी शुक्राच्या होऱयात एका कोऱया कागदावर आपली इच्छा लिहून त्यावर जायफळाची पूड पसरावी आणि तो कागद अशा रीतीने दुमडावा की प्रत्येक वेळी त्याची बाजू आपल्याकडे यावी. हा कागद पाकिटात किंवा तिजोरीत ठेवू शकता.

Related Stories

कोरोनासंबंधी सावध करणारं घडय़ाळ

Patil_p

बहिरेश्वर येथे वादळी पावसाचा तडाखा शेतीचे मोठे नुकसान.

Abhijeet Shinde

बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश, अमृता फडणवीस यांचं ट्विट कोणाला झोंबणार?

Rahul Gadkar

कर्नाटक: कोरोनाचा धोका टळलेला नाही

Abhijeet Shinde

लॉकडाऊनमध्ये जनऔषध केंद्रांतून 52 कोटींची विक्री

Patil_p

कर्नाटक: राज्यातील कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!