Tarun Bharat

राशीभविष्य पैशाचा अपमान म्हणजे दारिद्रय़ाला निमंत्रण

Advertisements

बुध. 20 ते 26 मे 2020

कोरोनाने जीवनात संकट काळात कसे जगावे हा शहाणपण शिकविलेला आहे, पण त्याचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. जोतिषशास्त्रानुसार लक्ष्मी म्हणजे पैसा अडका, भाग्योदय, भरभराट व समृद्धीची देवता व अलक्ष्मी किंवा अवदसा म्हणजे वाईट विचार दारिद्रय़ व अनिष्ट घटनांची देवता…  जगात  जितके म्हणून वाईट अथवा अनिष्ट आहे त्याच्यावर या अवदसेचा प्रभाव असतो. सध्याची कोरोनामुळे जगाची जी अवस्था झालेली आहे ती पहाता अवदसेचा प्रभाव वाढत चाललेला आहे की काय, असे वाटू लागते. कलियुगाच्या प्रभावामुळे आपण अत्यंत विचित्र अशा वळणावर आहोत. जेथे मंदिरे चर्चेस, मशिदी बंद आहेत पण दारुची दुकाने उघडी आहेत. लॉकडाऊनमुळे रिकाम्या हाताना काम नाही व काम नाही म्हणून हाती पैसा नाही, त्यामुळे नको त्या मार्गाला लागणे असे हे दुष्टचक्र सुरू आहे. त्यातच सरकारने समाजातील विशि÷ गटाला मोफत अन्नधान्य, वीज, कर्जमाफी, फुकटची घरे तसेच इतर सोयी सवलती देऊन लोकांना आळशी व ऐतखाऊ केलेले आहे. सर्व काही फुकट मिळते मग काम कशाला करा, अशी वृत्ती वाढत आहे. सरकार बदलले व सोयी सवलती अचानक बंद झाल्या तर हे लोक काय करणार आहेत. हे दारिद्रय़ाचे लक्षण आहे. इंग्लंड, अमेरिका, जपान व रशिया, स्पेन, इटली, कॅनडा, स्वीत्झर्लंड यासारखी प्रगत राष्ट्रे पहा, तेथील लोकांना सरकारी सवलतीची भीक नको आहे, आपला देश कसा प्रगतीपथावर जाईल व आपण राष्ट्रासाठी काय केले पाहिजे, असा विचार तेथील लोक विशेषत: तरुण वर्ग करीत असतो. चीन, जपान वगैरे राष्ट्रात प्रत्येकाच्या हाताला काम आहे, ते लोक राबराब राबतात. स्वकष्टाने पैसा कमावतात व ताठ मानेने जगतात. कष्टाची सवय असल्याने ते लोक भविष्यकाळाला घाबरत नाहीत, पण आपल्याकडील चुकीच्या धोरणामुळे तरुण पिढी वाया जात आहे. व्यसने वाढत आहेत. अशा सोयी सवलती देण्यापेक्षा प्रत्येकाला नोकरी देण्याचा तसेच आठ तास कसून काम करून घेण्याचा कायदा करण्याचा विचार करावा. त्यामुळे लोकांना कायमचे आर्थिक साधन मिळेल. काम करण्याची व राबून खाण्याची सवय होईल. आज देशभरात साध्या सुध्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. आम्हाला सर्व काही फुकट मिळते मग आम्ही का राबावे अशी यांची भाषा असते. हे चित्र कुठे तरी बदलले पाहिजे. तुमच्या कुंडलीतील ग्रहमान कितीही चांगले असो, दहावा शनि अथवा 11 वा गुरु किंवा तिसरा मंगळ अशी प्रभावी स्थिती असूनही तुम्ही जर काहीच काम केला नाहीत तर ग्रहयोग तरी काय करणार? पूर्वीच्या काळातील मोठमोठे राजे-महाराजे, सम्राट, मंडलिक व संस्थानिक पहा, त्या लोकांनी ऐषआराम करण्यातच जीवन घालविले. आज अशा लोकांच्या पुढील पिढय़ांची काय अवस्था आहे ते पहा, जगात देव नक्कीच आहे, पण आपण काहीच हालचाल केली नाही तर देव तरी काय करणार? अडचणीच्यावेळी लोक रडत येतात, गोड बोलून मदत मागतात, त्यांना हवी तशी मदतही केली जाते. पण कोरोनाच्या काळात यापैकी किती लोकांनी याची जाण ठेवली हे दिवा घेऊन शोधावे लागेल. यांच्या मदतीमुळे आपण आज प्रगतीपथावर आहोत. मोठमोठे उद्योग व्यवसाय उभे केले, त्यांच्या जिवावर आपण चार घास खात आहोत, या कोरोना संकट काळात मदतकर्त्यांनाही काही अडचणी आल्या असतील, आपण त्यांना मदत करावी, असे कुणालाही वाटल्याचे दिसून आले नाही. पण ही कृतघ्नवृत्तीच अखेरीस रसातळाला नेते व अचानक संकटे येऊन कमावलेले सर्व नष्ट होऊन जाते.

मेष

दशमात शनि वक्री आहे. हा अत्यंत महत्त्वाचा योग असतो. अग्नि व विजेची उपकरणे जपून हाताळा. व्यवसायात ताणतणावाचे वातावरण. इतरांना विश्वासाने दिलेली कागदपत्रे अडकून पडण्याची शक्मयता. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत. आपले वाहन या काळात कुणालाही चुकूनही देऊ नका. त्याच्या चुकीने काही गोंधळ झाल्यास निस्तरणे अवघड होईल.

वृषभ

नोकरीत अचानक उच्चपद मिळेल. शेती, बागायती असेल तर लाभदायक क्षेत्रात उत्तम यश, दूर प्रवासाचे योग, अचानक मोठे खर्च निघतील. कोणतेही व्यवहार जपून करावेत. डोळय़ांची काळजी घ्यावी. रहात्या जागेत बदल होईल. चेकवर सही करताना काळजी घ्यावी. कुठेही अडकणार नाही, यासाठी जपावे. अति विचारापासून दूर रहावे, आपले कोण, परके कोण हे ओळखून वागा.

मिथुन

अष्टमात शनि वक्री आहे. हा चांगला योग नसतो. सर्व तऱहेने सावधानता बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कितीही कठीण प्रसंग आले तरी ते चेहऱयावर दाखवू नका.  कमाई व खर्च यांचा ताळमेळ बरोबर राहील याकडे लक्ष द्यावे. जागेचे काही व्यवहार असतील तर ते करून घ्या. विमा, मृत्युपत्र वगैरे असेल तर त्याचा फायदा होईल.

कर्क

सप्तमात शनि वक्री आहे. वैवाहिक जीवनात चमत्कारिक घटना, अचानक लग्न ठरणे, अथवा रद्द होणे असे प्रकार घडू शकतात. चुकीचे संदेश, नको ते मेसेजेस यापासून दूर रहा व विश्वासही ठेवू नका. फसवणूक, दगाफटका असे प्रकार घडतील. मोठमोठय़ा कंपन्यांचे शेअर्सचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोर्टमॅटरची प्रकरणे असतील तर मुदत घ्या.

सिंह

सहावा शनि वक्री असला तरी तो धनलाभ घडविण्याची शक्मयता आहे. धार्मिक कार्याच्या दृष्टीने 22 ची अमावास्या शुभफलदायक आहे. माता, पिता व नोकरी क् क्यवसायातील अडचणी कमी होती. गुरु, शनि युती योगामुळे महत्त्वाच्या मुद्यावर निर्णायक निर्णय घ्याल. आयुष्याला चांगले वळण मिळू शकेल.

कन्या

पंचमात शनि वक्री आहे. जीवनात अडथळे फार येतात. मनावर संयम ठेवूनच कामे करावी लागतील. प्रयत्न करूनही जर यश मिळाले नाही तर काय चुकले याचा अंदाज घ्या. गुप्त बाबींसाठी मित्रमंडळीकडून सहकार्य मिळेल. 22 ची अमावास्या अनेक बाबतीत शुभफलदायक असल्याने नवीन काही तरी करू शकाल.

तूळ

वक्री शनि असल्याने वास्तूविषयक व्यवहार सावधानतेने करा. गरज नसेल तर वास्तुची दुरूस्ती वगैरे पुढे ढकलणे योग्य. व्यापार, व्यवसायात लाभ होतील. मंत्र तंत्र वगैरे शिकण्याची संधी मिळेल. मंगल कार्यातील अडचणी दूर होतील. नोकरी  क्यवसायासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय तुर्तास घेऊ नका. समस्या निर्माण होतील.

वृश्चिक

पराक्रमात वक्री शनि आहे. हा योग काही बाबतीत चांगला आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश. गायन, विवाहसंस्था यात उत्तम यश मिळेल. नावलौकिक होण्याचा योग. काही बाबतीत भावनावश होऊन नैतिकता बिघडविणारे ग्रहमान. देवाधर्माकडे विशेष लक्ष दिल्यास मन ताब्यात राहील. भावंडांच्या बाबतीत काळजी घ्या. वादावादी मतभेद, गैरसमज  यांना थारा देऊ नका. संसारसौख्यात अडचणी येतील. सांभाळावे. नोकरी व्यवसायात काही तरी शुभ घटना.

धनु

धनस्थानी वक्री शनि असल्याने सांपत्तिक घोटाळे, बँका बुडणे, दिवाळे वाजणे, नेत्रदोष, खाण्यापिण्यातून बांधकामाचा ताण वाढेल. न पेलवणाऱया जबाबदाऱया पडतील. सरकारी कामात घोटाळे. अवैध मार्गाकडे मन वळण्याची शक्मयता. विषारी व हिंस्त्र प्राणी, श्वापदे कुत्री यापासून त्रास होईल. सासरच्या व्यक्तीकडून मानहानी. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत अडथळे येतील.

मकर

तुमच्या राशीतच शनि वक्री झालेला आहे. शुभ प्रभाव राहील. याच काळात मंगलकार्य, नोकरी, क्यवसाय, भाग्योदय व परदेश प्रवासाच्या बाबतीत अडलेली कामे करून घ्यावीत, पण आरोग्य व भाग्योदयात अडथळे येऊ शकतील. आपले म्हणणारेही पाठ फिरविण्याची शक्मयता. 22 च्या अमावास्येदरम्यान महत्त्वाच्या घटना.

कुंभ

शनि, वक्री अवस्थेत 12 व्या स्थानी आहे. जगावेगळे काही तरी करून दाखवाल. कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. व्यापार व शेतीवाडी यात फायदा होईल. प्रेमप्रकरणात असाल तर सावधगिरी बाळगा. फसवणूक होण्याची शक्मयता. कुणाच्या बोलण्याला भूलू नका. सर्व तऱहेच्या अपघात व दुर्घटनेपासून जपावे. बोलण्यात वागण्यात जरा मार्दव ठेवा.

मीन

लाभात शनि वक्री अवस्थेत आहे. मित्रमंडळींपासून सावध रहावे. फसवणूक अथवा काहीतरी लचांड मागे लावतील. पण सुवर्णालंकार व वस्त्रप्रावरणाचा लाभ होईल. मंगलकार्याच्या दृष्टीने चांगले योग. 22 ची अमावास्या अपघात व गैरसमज पसरविणारी आहे. त्यामुळे काळजी घ्यावी. या आठवडय़ात कलाटणी देणाऱया महत्त्वाच्या घटना घडतील.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 18 जुलै 2020

Patil_p

राशींचा देश -टॅरो चा संदेश

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 नोव्हेंबर 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 1 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. २३ सप्टेंबर २०२१

Patil_p
error: Content is protected !!