Tarun Bharat

राशीभविष्य बुध. दि. 22 ते 28 एप्रिल 2020

Advertisements

कोरोना यावर काहीतरी थोडेसे

नोव्हेंबर 2019 ला चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर अचानक महामारीचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत गेला. आज भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढतच आहे. डॉक्टर, नर्स आणि त्यांचा स्टाफ रुग्णांच्या सेवेत चोवीस तास असतात, तर पोलीसही उन्हातान्हात 24 तास डय़ूटी करत आहेत. प्रत्येकाला वाटतं या रोगावर लवकर लस किंवा औषध सापडावं. ‘कोरोना’वर  संशोधनाचं कार्य तर सुरू आहेच, पण तोपर्यंत काय? तर बघूया घरगुती काही उपाय त्यावर करता येतात का, आपण प्रयत्न करू आणि देवदयेने या प्रयत्नाला यश मिळू दे, हीच प्रार्थना! कोरोना निर्मूलनासाठी काही साधे उपाय सुचविण्यासाठी अनेकांनी विनंती केलेली आहे. या जीवघेण्या विषाणूने जगाला त्राही भगवान करून सोडलेले आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही असे घरगुती उपाय केल्याने त्याचा बराच फायदा होईल.

1. एका मोठय़ा पातेल्यात तीन तांबे पाणी साधारण गरम करण्यास ठेवा, त्यात 10 ते 15 कापूर वडय़ा बारीक करून वितळेपर्यंत थांबा. नंतर त्यात 10 ते 15 थेंब निलगिरी तेल घाला. आता एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरा. आपल्या घराबाहेर, दरवाजावर  स्प्रे मारा, तुम्हाला बाहेर कोठे जायचे झाल्यास याचा स्प्रे कपडय़ावर मारा. चारचाकी गाडी असो अथवा दुचाकी, गाडीवर याचा स्पे मारा व बाहेर जा. शक्मयतो आपल्याकडे एक-दोन कापूरवडय़ा ठेवा. रात्रीच्या वेळी एका बाऊलमध्ये पाणी घालून त्यात 4 ते 5 कापूरवडय़ा बारीक करून घाला व ते बाऊल हॉलमध्ये अथवा झोपण्याच्या जागी ठेवा. त्यामुळे डास अजिबात फिरकणार नाहीत.

2. सकाळी उठल्याबरोबर दंतमुखमार्जन झाल्यावर सोसवेल तेवढेच एक ग्लास गरम पाणी घेणे. कारण आपण ज्या वेळी जेवण करतो त्यावेळी भाजी, उसळ, आमटीत तेल जास्त पडलेले असते व त्यामुळे घशामध्ये तेलकटपणाचा अंश राहिलेला असतो व गरम पाणी प्याल्याने त्याचा तेलकटपणा दूर होऊन घसा मोकळा होता.

3. आयुर्वेदिक दुकानातून वावडिंग चूर्ण आणा. कपभर चहात अथवा दूधात चिमूटभर वावडिंग चूर्ण टाकून घेतल्यास पोटातील कृमींचा नाश होतो.

मेष

उत्पात योगावर आलेली अमावस्या चांगली नाही. आरोग्याची काळजी घ्या. रविचे भ्रमण सर्व बाबतीत यश देणारे आहे. पण रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. उतावळेपणाने कोणतेही काम करू नका. अन्यथा नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल. योग्य धोरण व चातुर्य यांचा संगम साधल्यास अपेक्षित यश मिळेल.

वृषभ

आजची अमावास्या अशुभ योगात आहे. कोणताही निर्णय जपून घ्या. राशीस्वामी शुक्र अनुकूल असल्याने गायन, वादन, संगीत, चित्रपट क्षेत्र, नृत्यकला यात प्राविण्य मिळेल. दूषित बुधामुळे मित्र-मैत्रिणींच्यामुळे कागदोपत्री घोटाळय़ात अडकण्याची शक्मयता, शापीत योगाचा प्रभाव सुरू आहे. धार्मिक कार्याकडे लक्ष द्या.

मिथुन

अनेक बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. अत्यंत कठीण वाटणारी काही कामे यापुढे होऊ लागतील. शुक्राच्या कृपेने काही शुभ घटना घडतील. खर्चिक वृत्ती वाढेल. राशीस्वामी बुध दूषित असल्याने नोकरी व्यवसायात मन शांत ठेवा व स्थितप्रज्ञ राहून काम करा. अमावास्या कागदोपत्री घोटाळे दाखविते.

कर्क

लाभस्थ शुक्रामुळे मित्रमैत्रिणींचे उत्तम सहकार्य मिळेल. अचानक कोठून तरी पैसा मिळण्याचे योग. दशमस्थ रविमुळे नोकरीत उच्च अधिकार आणि व्यवसाय असेल तर उर्जितावस्था येईल. अमावास्या अशुभ योगात असल्याने वरि÷ांशी वादविवाद नको.

सिंह

राशीस्वामी रवि बलवान आहे. नावलौकिक होण्याचे योग. पडद्याआडून राजकारण करण्याची संधी मिळेल. दशमस्थ शुक्रामुळे मोठय़ा लोकांचे सहकार्य मिळेल. अप्रत्यक्ष राजवैभव देणारा हा योग आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. उत्पात योगावरील अमावस्या अपघातदर्शक आहे, जपा.

कन्या

भाग्यस्थ बलवान शुक्रामुळे विद्याव्यासंग व धार्मिकता वाढेल. कोणत्याही शुभ कार्यात उत्तम यश. पंचमस्थ गुरु, शनिमुळे कोणत्याही व्यवसायात प्राविण्य मिळेल. संततीच्या बाबतीत मात्र चिंता निर्माण होईल. उत्पात्त योगावरील अमावस्या उष्णता, पित्तविकार व सांसर्गिक विकार यापासून काळजी घेण्यास सुचवीत आहे.

तूळ

राशीस्वामी शुक्र अष्टमात हा श्रीमंत योग आहे. धनलाभ व वारसा हक्काने काहीतरी लाभ होऊ शकतात. उत्त्पात योगावरील अमावस्या भागीदारी व्यवसायात गोंधळ निर्माण करील. तसेच प्रवासात विचित्र घटना घडू शकतील. कोर्टप्रकरणे असतील तर अतिशय सावध रहावे लागेल.

वृश्चिक

सप्तमस्थ शुक्रामुळे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. प्रवास आणि भागीदारी तसेच न्यायालयीन प्रकरणे असतील तर त्यात यश मिळेल. रविचे भ्रमण सर्व बाबतीत यश देईल. अमावस्या अशुभ योगात आहे. त्यामुळे अति विचाराने त्रास होईल. उष्णता विकारांपासून जपा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु

पंचमस्थ रविमुळे शिक्षण व नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतील. कुलदेवतेची उपासना करा. उत्पात योगावरील अमावास्या घराण्यातील पूर्वाजित दोषांचा प्रभाव दर्शविते. सरकारी किंवा महत्त्वाच्या पदाच्या नोकरीसाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. जागेसंदर्भातील प्रश्न या महिन्यात मिटवा.

मकर

वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. जमिनीचे व्यवहार पूर्ण करून घ्या. पंचमस्थ शुक्रामुळे चैनीवृत्ती वाढेल. विवाहासाठी प्रयत्न चालू असतील तर अपेक्षेपेक्षा चांगले स्थळ मिळेल. उत्पात योगावरील अमावस्या घराण्यातील पूर्वजांचे प्रकोप निर्माण करील.

कुंभ

सुखस्थानातील शुक्रामुळे भाग्योदयाची सुरुवात होईल. स्थावराच्या बाबतीतील काही घडामोडी लाभदायक ठरतील. तृतीयस्थ अमावास्या, नातेवाईकांच्या बाबतीत विचित्र समस्या निर्माण करण्याची शक्मयता आहे. शनि, गुरुचे भ्रमण प्रत्येक गोष्टीत विलंब व अडचणी निर्माण करील. त्यासाठी गुरुचरित्र वाचन ठेवा.

मीन

धनस्थानातील बलवान  रविमुळे स्थावर इस्टेट व वडिलोपार्जित मालमत्ता यांच्या बाबतीतील समस्या मिटतील. नेत्रविकार, अतिउष्णता यापासून जपा. तृतीयस्थ शुक्रामुळे कोणत्याही कला क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळेल. शनि-मंगळाच्या प्रभावाने मित्रमंडळीशी खटके उडू शकतात. अमावस्या योग धनस्थानी होत आहे.

आनंद एस. मत्तीकोप कुलकर्णी      1812-1 ब, केळकर बाग, बेळगाव

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.17 मार्च 2022

Patil_p

आजचे भविष्य 16-07-2021

Amit Kulkarni

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 2 एप्रिल 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 16 मे 2020

Patil_p
error: Content is protected !!