Tarun Bharat

राशीभविष्य

बुधवार दिनांक 22 ते 28 सप्टेंबर 2021

कृतिका नक्षत्रातील राहुचे भ्रमण अत्यंत महत्त्वाचे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत ज्या ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या वृषभ राशीतील कृतिका नक्षत्रात राहू असतानाच घडलेल्या आहेत. तुमची रास कोणतीही असो लग्नकुंडलीत जिथे वृषभ रास व कृतिका नक्षत्र पडले असेल त्या स्थानाशी संबंधित सर्व बाबीवर या राहुचा शुभाशुभ परिणाम दिसून येईल. मुळातच राहू हा पापग्रह असून तो रविच्या नक्षत्रात आहे. हा एक प्रकारचा अशुभ योग मानला जातो. त्यामुळे 5 ऑक्टोबर ते 9 फेब्रुवारी या कालखंडात सर्व राशीच्या लोकांनी जपून राहणे आवश्यक आहे. कुणाला कसे अनुभव येतील हे निश्चित सांगता येणे अशक्मय आहे. कारण प्रत्येकाचे पूर्वजन्माचे प्राक्तन. पाप-पुण्य, घराण्याचे बरेवाईट कृत्य यानुसार काहीजणांना शुभ तर काहीना अशुभ फळ मिळू शकते. पण सर्वसाधारणपणे कृतिका नक्षत्रातील राहू घातपात, अपघात, लढाया, युद्धे, जागतिक महापरिवर्तन, जीवनात महत्त्वाचे बदल, कलह, रक्तपात, नवीन कायदे निर्माण होणे, सामाजिक जीवनात महत्त्वाचे बदल, अफरातफर, दहशतवादी हल्ले, अपंगत्व, मनुष्यहानी, दंगली, राजकीय उलथापालथी, वातावरणात महत्त्वाचे बदल, स्फोट, रोगराई वाढणे, सांसर्गिक रोगाचा प्रसार, मोठी दुर्घटना तसेच मानव निर्मित दुर्व्यवहार, अपघात असे प्रकार या योगावर घडण्याची शक्मयता असते. त्यासाठी सावधानता हाच यावर रामबाण उपाय आहे. या योगावर काही चांगल्या घटनादेखील घडू शकतात. गरीबीतून एकदम श्रीमंती येणे, गल्लीतून बाहेर न पडलेली व्यक्ती विमानातून फिरणे, योग्यता नसताना चांगली नोकरी मिळणे, जातीबाहेरील व्यक्तीशी विवाह होणे, ध्यानीमनी नसता अचानक एखादा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळणे व तो यशस्वी होणे, अचानक मोठे धनलाभ, राजकारणात उच्च पद अशा चांगल्या बाबीदेखील दिसून येतील. पण राहु ग्रह ज्यावेळी आपल्या शत्रूपक्षात असतो त्यावेळी तो फारसे चांगले फळ देण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी या कालखंडात सर्व बाबतीत सावध राहा. घराण्यात जर शापित दोष असतील तर त्याचा सर्वाधिक परिणाम याच काळात जाणवेल. प्रत्येकाने आपापले अनुभव स्वतः तपासावेत ते योग्य ठरेल. राहू हा दृश्यमान ग्रह नाही. त्यामुळे त्याचे परिणामदेखील अदृश्य स्वरूपातच जाणवतील. जसे हवा आपण पाहू शकत नाही पण तिची झुळुक जाणवू शकते. त्यानुसार या राहूचे परिणाम सर्वच राशीना जाणवतील असे दिसते.

मेष

सर्व बाबतीत शुभ फल देणारी ग्रहस्थिती आहे, पण पोटाचे विकार जाणवतील शुक्राचे भ्रमण संतोषजनक आहे. आप्त, मित्रमैत्रिणी भेटतील. धनप्राप्तीचे योग. चांगले लोक गाठ पडून त्यांची मदत मिळेल पण पितृपक्षाच्या प्रभावाने काही शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या कारवायापासून सावध राहावे लागेल. नोकरी-व्यवसायात कोणाचेही मन दुखवू नका. काहीजण चांगुलपणाचा गैरफायदाही घेण्याची दाट शक्मयता आहे.

वृषभ

रवी मंगळ बुधाचे भ्रमण काही बाबतीत शुभ तर मुलांच्या बाबतीत जरा अनिष्ट आहे. मुले, तरुण-तरुणी काय करतात, याकडे लक्ष ठेवावे लागेल. शुक्राचे भ्रमण चैनी प्रवृत्ती वाढवेल. ऐषारामी जीवन जगण्याची संधी मिळेल. मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल. वस्त्रप्रावरणे खरेदी करू शकाल. मटका, लॉटरी व सट्टा व्यवसायात मात्र जपून रहावे. घरदुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल त्यातच नवीन पै पाहुण्यांची वर्दळही वाढेल.

मिथुन

वास्तु संदर्भात काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. काहीजण एखादी नको ती वस्तू घेण्यास भाग पाडतील. घराची रंगरंगोटी वगैरे करण्यास अनुकूल काळ. शेअर मार्केटशी संबंध असेल तर लाभ होईल बारीक-सारीक गोष्टीतून महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होईल. लिखाणात उत्तम यश. कोणताही व्यवसाय करा. यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. काहीजणांना संतती लाभ पण पितृपक्षाकडे दुर्लक्ष करू नका, किरकोळ चुकादेखील उग्र स्वरूप धारण करू शकतील.

कर्क

सांप्रतचा काळ प्रवासास अनुकूल नाही. शक्मयतो प्रवास टाळावेत. पण आर्थिक बाबतीत उत्तम. जी कामे हाती घ्याल ती निश्चित पूर्ण होतील. पूर्वजांच्या कृपेमुळे  काही कारणाने नाकारलेली स्थळे पुन्हा परत येऊ शकतात. नोकरीत तणावाचे वातावरण राहिले तरी सबुरीने घ्या. कर्जफेड करण्यास अनुकूल परिस्थिती. वाहन मोबाईल व इतर महत्त्वाच्या वस्तू कोणाच्या हाती पडणार नाहीत याची काळजी घ्या. कोणत्याही बाबतीत अतिरेक होऊ देऊ नका.

सिंह

पितृपक्षाचा प्रभाव आहे. प्रति÷ा अथवा स्पर्धेसाठी निष्कारण खर्च करू नका. स्वतःहून संकटे ओढवून घेण्याचे टाळा. चंद्र गुरु शुभ योगामुळे आपल्याला कुटुंबाचे उत्तम सुख मिळेल. कल्याणकारक घटना घडतील. पुत्र संतती होण्याचे योग. घरदार, वाहन, वस्त्र, लाभ यादृष्टीने सप्ताह उत्तम जाईल, मुके प्राणी बाळगणार असाल तर    सध्या गडबड करू नका, अमावास्येनंतर योग्य काळ आहे. सरकारी अधिकाऱयांशी  वितंडवाद करीत बसू नका.

कन्या

अचानक घडणाऱया काही घटनांमुळे प्रवास घडतील. काही ना काही कारणासाठी सतत खर्च वाढत राहतील. पण त्या प्रमाणात पैसाही मिळेल. भाऊबंदकी असेल तर शक्यतो समझोत्याने जाणे चांगले. वस्त्रप्रावरणे व किमती वस्तू खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता. मालक मंडळींनी नवी जबाबदारी सोपविल्याने व अतिरिक्त कामामुळे महत्त्वाची कामे रखडतील.

तूळ

नातेवाईक, शेजारी अथवा मित्रमैत्रिणीकडे अडकलेली रक्कम परत मिळेल. पितृपक्ष असल्याने अन्नदानासारखे पुण्य कर्म हातून घडेल. सर्प, विंचू वा तत्सम विषारी, सरपटणाऱया प्राण्यांपासून जपावे लागेल. लिखाणाशी संबंध असेल तर लाभदायक योग. काही गुप्त गोष्टींचा स्फोट नातेवाईक व इतरांसमोर करू नका. नोकरीत झालेली बदली रद्द होण्याची शक्मयता. व्यापारात किरकोळ फेरबदल होतील. भाऊबंदकी असेल तर वादावादी वाढेल. अष्टमातील राहूचा अनिष्ट फेरा अचानक काही विघ्ने निर्माण करू शकेल.

वृश्चिक

पितृपक्षाचा प्रभाव आहे. परिस्थिती पाहून खर्च करा, शनीची कृपा आहे तोपर्यंत कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करून घ्या. नवीन नोकरी असेल तर त्यात कोणतेही प्रश्न उपस्थित न करता कामावर रुजू व्हा. तारण वगैरे न घेता जर कुणाला कर्ज वगैरे दिले असेल तर ते वसूल होईल. तसेच एखादे महत्त्वाचे  काम होण्याजोगी घटना घडेल. किमती वस्तूंच्याबाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. मंगळ महत्त्वाकांक्षा वाढविल. क्रीडा क्षेत्रात असाल तर त्यात चांगले यश मिळेल पण त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. कारखानदारी, विजेचे साहित्य  मशिनरी व तत्सम क्षेत्राशी संबंध असेल तर दुर्घटनेपासून सांभाळा.

 धनु

पितृपक्षाच्या प्रभावाने काही अनिष्ट शक्तींचा प्रभाव वाढतो, त्यासाठी महिलावर्गाने नोकरीत जपून राहणे आवश्यक आहे. मैत्रिणी आणि संतती याबाबतीत चमत्कारिक घटना. एखाद्याने पूर्वी ठेवण्यास दिलेल्या वस्तूमुळे आर्थिक फायदा होईल. मोठे व महत्त्वाचे व्यवहार पूर्ण  होतील. तीक्ष्ण व धारदार वस्तू जपून हाताळा. उधार उसनवार यापासून दूर राहिलात तर पुढे पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

मकर

 शुक्रामुळे कामाचा ताण कमी होईल पण पुन्हा नवीन जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांनी खेळ वगैरे अवांतर बाबीकडे लक्ष न देता अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. शनि प्रभावी आहे त्यामुळे जे काम कराल त्याचा दूरगामी परिणाम होईल. नोकरीतील वातावरण पोषक असले तरी इतर बाबतीत अनुकूल नाही. वादावादी, गैरसमज इत्यादी बाबतीत जरा काळजी घ्यावी लागेल. पूर्वी जर कोणाशी वैरत्व असेल तर मिटविण्याचा प्रयत्न करा.

कुंभ   

पितृपक्षाचा प्रभाव आहे. वाहन चालवत असाल तर नशापाणी करू नका अपघाताची शक्मयता आहे. अडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे प्रयत्न करा कारण पुढे तुम्हाला वेळ मिळणार नाही. आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल. साडेसातीचा त्रास  सुरू असल्याने दूरचे प्रवास जपून करा. नातेवाईक शेजारी व आपले मित्र यांच्याशी वितंडवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रति÷ा अथवा मोठेपणासाठी कोणताही देखावा करू नका, पुढे त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.

मीन

बोलण्यात कठोर शब्दांचा वापर करू नका गैरसमज निर्माण होईल. चंचलतेमुळे  महत्त्वाच्या कामाच्या बाबतीत काहीतरी गडबड होऊ शकते. निर्णय चुकीचे ठरू शकतात. गुरु आर्थिक नाटय़मय घटना घडविल. मोठी रक्कम दुसऱयाच  कारणासाठी खर्च होईल. व्यवसायाच्याबाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. काहीजणांना मोठय़ा ऑर्डरी मिळतील. राजकारणात असाल तर महत्त्वाचे पद मिळेल. विशेष प्रयत्न न करता नोकरीत प्रमोशन मिळेल.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 28 मे 2022

Patil_p

राशींचा देश -टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 2 एप्रिल 2022

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार 07-01-2021

Omkar B

राशी भविष्य

Patil_p
error: Content is protected !!