Tarun Bharat

राशीभविष्य

Advertisements

रवि. 12 ते 18 जुलै 2020

मेष

या सप्ताहात सूर्य, कर्क राशीत प्रवेश करीत आहे. चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. मागील येणे वसूल करा. रविवारी प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा प्रश्न सोडवा. चर्चा यशस्वी होईल. लोकसंग्रह वाढेल. कलाक्षेत्रात मन रमेल, प्रगती होईल.

वृषभ

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. कायदा मोडू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला छोटी समस्या येईल. वसुली करा. नोकरीत काम वाढले तरी तुमचा वरचष्मा राहील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकांच्या मदतीला जाल. परिचय वाढेल. घरात शुभ समाचार मिळेल. कायद्यासंबंधी कामे होतील. कला, साहित्यात मन रमेल.

मिथुन

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. वसुली करताना नम्रता ठेवा. नोकरीत तुमच्यावर वरि÷ खूष होतील. नोकरीचा प्रयत्न आताच करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळचे लोक कटकारस्थाने करतील. यावर नजर ठेवा. कायद्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मान-प्रति÷ा मिळेल.

कर्क

या सप्ताहात 16 जुलै रोजी तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करता येईल. अरेरावी करू नका. नोकर वर्गाची समस्या कमी होण्याची शक्मयता दिसेल. नोकरीत, कामात दुर्लक्ष करू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीवर मात करता येईल. कठोर बोलणे टाळा. संसारात संमिश्र घटना घडतील.

सिंह

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वसुली करता येईल. नोकरीतील कामे वेळेवर पूर्ण करा. दुर्लक्ष करू नका. राजकीय सामाजिक कार्यात सर्वांच्या मतानुसार निर्णय घ्या. चर्चा करा. स्वत:ची अरेरावी करू नका. घरातील कामे होतील. मुलांची प्रगती सुखावह होईल. कला, साहित्यात प्रगती करता येईल.

कन्या

 या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, चंद, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर ताबा ठेवा. वसुलीचा प्रश्न सोडवा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात कायद्याच्या कक्षेत राहून कामे करा. योजना पूर्ण करता येईल. नवीन मैत्री होईल. घरातील समस्या कमी होतील. कला, साहित्यात प्रसिद्धी मिळेल.

तुळ

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात गोड बोलून तुमचे स्थान पक्के करा. कोणताही वाद वाढवू नका. समस्या समजून घ्या. त्यावर उपाय शोधता येईल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात त्वरेने कार्य करा. योजना पूर्ण करा. तरच पुढे जाता येईल. फसव्या व्यक्तीपासून सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात तणाव होईल. फसगत टाळा. संयमाने चर्चा करा. नोकरीतील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात सुधारणा करण्याची तयारी ठेवा. तुमचा प्रभाव कमी होण्याची शक्मयता आहे. घरातील कामे करता येतील. कलाक्षेत्रात ओळखी होतील.

धनु

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. काम मिळेल. रागाची सीमा पार करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. नोकरीत तणाव होईल. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुम्हाला सल्ला देणारा अनुभवी माणूस दूर जाण्याची शक्मयता आहे. शेतकरी चिंतेत पडेल.

मकर

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात अडचणी येतील. चर्चेतून तणाव निर्माण होऊ शकतो. कायदा सर्व बाबतीत पाळा. नोकरीतील समस्या कमी करता येईल. सौम्य शब्दात तुमचे विचार व्यक्त करा. राजकीय, सामाजिक कार्यात संयमाने भूमिका निभावून न्या. तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. अनुभवी व्यक्तीची कदर करा. घरातील समस्या कमी होईल.

कुंभ

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, चंद्र,गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात नम्रतेने वागा, नवे कंत्राट मिळवता येईल. नोकरीत, कामात चूक करू नका. दुसऱयांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे येतील. तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. आरोप होईल. स्वत:च्या घरातील कामे वाढतील. कायद्याचे पालन करून व्यवहार करा.

मीन

या सप्ताहात कर्क राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मोठय़ा लोकांच्या ओळखीतून कामे मिळवता येतील. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करा. जनसेवा करा. लोकांच्या कार्यात मदत करा. प्रति÷ा मिळेल. कला, साहित्यात प्रगती होईल. घरातील वातावरण सुखावह राहील.

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 7 मे 2022

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 2 सप्टेंबर 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 ऑक्टोबर 2020

Patil_p
error: Content is protected !!