Tarun Bharat

राशी भविष्य

आचार तसा विचार व्यक्तिमत्त्व ठरते परिधान वस्त्रावर   

नोकरीसाठी मुलाखतीला गेलेले काही तरुण किंवा तरुणी सर्व कामात हुशार असून देखील अनुत्तीर्ण होतात. विवाह जमवताना वधू-वरांनी वापरलेली वस्त्रे पाहुनच त्यांच्याविषयी चांगले किंवा वाईट मत होत असते. उंची किंवा महागडे कपडे वापरले तरच आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसते असे अजिबात नाही. साधेच कपडे व्यवस्थित वापरले तर त्याचाही चांगला प्रभाव पडू शकतो. त्यासाठीच सर्वांनीच कपडे वापरताना आपल्याला ते योग्य दिसेल की नाही, त्या कपडय़ामुळे लोकांचे आपल्याविषयी मत काय होईल, प्रति÷ा वाढेल की कुचेष्टा होईल, याचा विचार अवश्य केला पाहिजे. आपल्याला जे शोभेतील तेच कपडे वापरावेत. एखाद्याला   एखादा डेस शोभून दिसला म्हणून तो तुम्हालाही शोभेल असे नसते. आपल्या विषयी लोकांचे चांगले मत व्हायला हवे असेल तर कपडे स्वच्छ व लोकांना आकर्षून घेणारे असावेत. शिवाय काही अत्यंत महागाची वस्त्रे आयुष्यात फक्त एकदाच वापरली जातात, नंतर त्याकडे कोणी पाहातही नाही अथवा त्यांचा वापर पुढे कधी करतील असेही नाही. लग्न अथवा मंगलकार्यात अत्यंत महागडी लाखो रुपयांची वस्त्रे खरेदी केली जातात, पण अशी वस्त्रे वापरून सवय नसल्याने लग्ना शिवाय इतर कोणत्याही वेळी त्या वस्त्रांचा कधीही वापर केला जात नाही. शेवटी ती वस्त्रे तशीच पडून राहतात, व शेवटच्या अंतिमक्षणी ती वस्त्रे त्या क्षणाची     आठवण म्हणून वापरलेली दिसून येतात. त्यासाठीच बदलत्या कालमानानुसार लग्न अथवा इतर मंगलकार्याच्यावेळी वारंवार वापरता येणारी वस्त्रेच खरेदी करावी. काहीजण आपल्याला न शोभणारी वस्त्रे वापरतात. त्यामुळे काहीजणांना ते विचित्र वाटते. मंगलकार्यात साधी वस्त्रे वापरली म्हणून कधीही कुणाचे अवमूल्यन होत नाही. शिवाय ती वस्त्रे पुन्हा कधीही वापरता येतात.  आपली परिस्थिती काय आहे याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. विवाहाच्यावेळी कुंडली पाहताना अथवा वाटाघाटी करताना सर्व काही चांगले असूनही लग्न का फिसकटते, याचे हे देखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे आमच्या अभ्यासात दिसून आलेले आहे. कारण तुम्ही ज्या प्रकारचे कपडे वापरता, त्यानुसार तुमचे आचार-विचार व संस्कार कसे असतील याचा अंदाज लोक बांधत असतात व त्यानुसार तुमच्याशी कसे वागावे ते ठरवीत असतात.

मेष

 थंड पडलेल्या व्यवसायाची सुरुवात झाली, आर्थिक आवक वाढली तरी काही चुकीच्या धोरणामुळे अडचणीत याल. त्याच्यापासून फायदा न होता उलट काही समस्या निर्माण होत राहतील. पैशाच्या देण्या-घेण्यावरून निर्माण झालेले वाद-विवाद दूर होतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे झाल्यास कागदपत्रे नीट वाचून मगच सही करावी. शनि-गुरु-मंगळाचाचा मोठा फायदा होणार असल्याने नोकरी व्यवसायात महत्त्वाची स्थित्यंतरे घडतील. एखादे नवे काम मिळण्याची शक्मयता आहे.

वृषभ

  कुणाला काहीतरी आर्थिक अडचण जाणवेल व तुमच्याकडे मदतीचा हात मागतील, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. भावनेच्या भरात कुणालाही अमुक देईन तमुक देईन असे वचन देऊ नका. पावसाळा आहे, वाहन चालविताना गाडी पूर्णपणे व्यवस्थित चेक करूनच चालवावी. व्यसनापासून शक्मयतो दूर राहावे. जागा अथवा स्थलांतराच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्या व्यक्तीचे मंगलकार्य ठरू शकेल. अडकलेले पैसे येऊ लागल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील.

मिथुन

 सध्या राहू-शनिचा काळ सुरू झालेला असून सर्व बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. अष्टमातील शनि म्हणजे अचानक काही नवीन संकटे येऊ शकतात. सत्वपरीक्षा देखील पाहतील, पण त्यातून उलट चांगलेच होईल. नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. मुळातच तुम्ही बुद्धिमान असल्याने संकटे आली तरी त्यातून कसे बाहेर पडाल ते कळणार देखील नाही. आर्थिक बाबतीत पुढील दोन महिन्याचा कालखंड अतिशय उत्तम आहे. पण धरसोड वृत्ती, भावनाशीलपणा चंचलपणा, कटुता व गैरसमज यापासून दूर राहणे आवश्यक आहे. आगामी काही काळात नवीन कामे घेण्यापेक्षा असलेली जुनी कामेच संपविण्याचा प्रयत्न करा.

कर्क

  काही वेळा दुसऱयाच्या चुकीमुळे नुकसान सोसावे लागते, किंवा नको ते पेचप्रसंग निर्माण होतात, अशावेळी मन शांत ठेवून निर्णय घ्यावेत. नातेवाईक, मित्र, शेजारी व वडीलधाऱयांशी मतभेद होऊ देऊ नका. शारीरिक व मानसिक आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरेल. नोकरी-व्यवसायातील वातावरण चांगले राहील. आर्थिक बाबतीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत. कर्ज वगैरे असेल तर ते फिटेल. व्यवसायासाठी प्रयत्न चालू असतील तर त्यात सफल व्हाल. कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर जरा सावधगिरी बाळगावी लागेल.

सिंह

  भगीरथ प्रयत्न, प्रामाणिकपणा व योग्यवेळी घेतलेले निर्णय, योग्य धोरणे या सर्वांचा समन्वय साधून कामे चालू असतील तर दैवीशक्तीही आपल्याला मदत करते याचा अनुभव या आठवडय़ात येईल. किचकट व अवघड वाटणारी काही न होणारी कामे सहज होऊन जातील. शुक्र-मंगळाचा योग आरोग्याच्या बाबतीत चांगला नाही. जरा काळजी घ्या. आध्यात्मिक बाबतीत चांगले यश मिळवाल. गुप्त शत्रूंच्या कारवाया जपून हाताळा.

कन्या

  शुक्र-मंगळाच्या सहकार्यामुळे वैवाहिक बाबतीत जीवनाला महत्त्वाचे शुभ वळण लागेल. पूर्वीची काही कामे असतील तर ती पूर्ण करून घ्या. नोकरी-व्यवसाय आर्थिक व्यवहार व इतर महत्त्वाची कामे तसेच मुलाबाळांच्या बाबतीत उत्तम योग. शेजारी व नातेवाईक यांच्याशी देण्या-घेण्यावरून तेढ निर्माण होईल. प्रवासात अडचणी व शारीरिक त्रास संभवतात. आर्थिक बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. कोर्टप्रकरणे असतील तर साक्षी-पुराव्याच्या बाबतीत सावध रहावे लागेल. नोकरीत ऐन पावसाळय़ात स्थलांतराचे योग दिसतात.

तूळ

 आपला स्वभाव चांगला असल्याने सर्व जग चांगले असेल असे आपण समजतो, पण नेमके लोक त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे या आठवडय़ात प्रत्येक शब्द जपून बोलणे आवश्यक आहे. पूर्वीच्या कष्टामुळे नोकरी-व्यवसायात महत्त्वाची व शुभ व फायदेशीर स्थित्यंतरे घडतील. विवाहासाठी सध्या ग्रहमान अनुकूल आहे. वाटाघाटी करण्यास हरकत नाही. चांगल्या नोकरीचे योग आले असतील तर स्वीकारू शकता. तुमच्याकडे जर एखादी कला असेल तर त्यातून आर्थिक फायदा होऊ शकतो, पण कुणाची तरी मदत घ्यावी लागेल.

वृश्चिक

  इतरांसाठी राबताना स्वतःकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. असलेली नोकरी सोडून पळत्या मागे लागू नका. गुरुचे पाठबळ नसल्याने आर्थिक व्यवहार जपून करावी लागतील. फालतू अनपेक्षित खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जी काही नवीन कामे मिळतील. त्यात करार, शर्ती व जबाबदारी असेल. प्रवास, नातीगोती जोडणे, लिखाण, साहित्य या बाबतीत चांगले अनुभव येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. शनिच्या कृपेमुळे एखादे संकट टळेल.

धनु

 नोकरीतील सहकारी अथवा हाताखालच्या कर्मचाऱयांचा त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे प्रत्येक कामात अडथळे जाणवतील. पण गुरुच्या पाठिंब्यामुळे त्या सर्वांवर मात कराल. कामाचे योग्य नियोजन केल्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल. काही गैरसमज असतील तर ते कमी होतील. व्यवसायिक व नोकरीविषयक तसेच वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी कमी होतील. विवाहासाठी अनुकूल काळ. प्रेम प्रकरणात असाल तर यश मिळेल. लॉकडाऊनमुळे बंद पडलेले अथवा दिवाळखोरीत गेलेले व्यवसाय मिळाल्यास ते घेऊन सुरू करा. एकदम वर याल.

मकर

  ‘जे पेरणार तेच उगवणार’ हा निसर्गाचा नियम विसरू नका. नोकरी-व्यवसायात कोणाचेही मन दुखवू नका. काहीजण राग धरण्याची शक्मयता आहे. राशीस्वामी बलवान असल्याने जे काही मोठे व महत्त्वाचे निर्णय घ्याल ते योग्य व निर्णायक असतील. मुलाबाळांच्या बाबतीत शुभघटना. नोकरी-व्यवसायात नवे फेरबदल घडतील. काही अकस्मात उद्भवलेल्या प्रसंगामुळे महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवलेला पैसा दुसऱया कामासाठी खर्च होईल. कामधंदा नसलेल्या तरुणांना इतर क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्मयता. घराचे प्रश्न मिटतील. आतापर्यंत काही कारणाने खोळंबलेली यापुढे होऊ लागतील.

कुंभ

 एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघावे आणि अचानक नोकरीचा कॉल यावा, तसेच त्याचवेळी पाहुणेमंडळी समोर यावी असे विचित्र ग्रहमान आहे. पण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरवून त्यानुसार निर्णय घ्या, म्हणजे गोंधळ होणार नाही. कामाला निघताना कुटुंबीयांव्यतिरिक्त कुणालाही काहीही सांगू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक. शुक्र-मंगळ व शनि अनिष्ट असल्याने प्राप्त परिस्थितीवर विशेष लक्ष द्या. फोनवर बोलताना जपून बोला. एखादी चूक देखील मोठे स्थित्यंतर घडवू शकते.

मीन

 लाभातील शनि म्हणजे भाग्योदयाची सुरुवात व विमान प्रवासाची संधी देणारा सुवर्णयोग. जीवनाला स्थैर्य देणाऱया काही संधी येतील. नोकरी-व्यवसाय इत्यादीवर त्याचा प्रभाव असेल. जीवनातील अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास अनुकूल काळ. तुमच्याकडे जर काही चांगल्या कल्पना अथवा कला असतील तर त्याचा वापर करून भरपूर पैसा कमवू शकता. आर्थिकदृष्टय़ा उत्तम काळ. अनेकांचे उत्तम सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात मालक वर्गाची मर्जी राहील. ग्रहमान चांगले असले तरी शुक्र-मंगळ याचा योग चांगला नाही. त्यामुळे कोणतीही व्यसने अथवा इतर अनैतिक बाबीकडे चुकूनही वळू नका.

Related Stories

हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचीही घेऊ पूर्ण काळजी

Patil_p

स्थिती सावरण्यास आता सहा दिवसांची संधी

Patil_p

साखळीत वादळी वाऱयासह दमदार पाऊस.

Omkar B

मुकाबला आपत्तीशी!

Patil_p

सांगली मिरज रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण

Abhijeet Khandekar

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदे होणार रद्द…

Archana Banage