Tarun Bharat

राशी भविष्य

क्र.         विशेष    तारीख  

1        शुभ दिवस        2,5,8 (दु 12 प),9,10,11 (दु 4 नं), 12, 14, 15 (दु 1 नं),18 (दु 3.30 प), 20, 24, 26 (दु 3 प), 28 (दु 2 प), 29 (दु 12 नं)     

2          अशुभ दिवस        1,3,4,6,7,13,16,17,19,21,22,23,25,27,30,31  

3          अनिष्ट दिवस       3,7,13,23        

4          सण/ उत्सव/ विशेष तिथी  3 स्मार्त एकदशी, गीता जयंती, 4- भागवत एकादशी, 7- दत्त जयंती, 11- संकष्टी, 19- सकला एकादशी, 30-दुर्गाष्टमी      

5          अमावस्या           22/12/2022 सायं 7.14 ते 23/12/2022 दु 3.47 प  

6          पौर्णिमा 7 स 8.02 ते 8 स 9.39 प 

7          साखरपुडय़ाचे मुहुर्त          2,  8 दु 12.30 प, 9 दु 3 प, 14, 18 – दु 3.30 प, 29

8          बारसे (नाव ठेवण्या चे) मुहुर्त          2, 9-दु 3 प, 18 – दु 3 प, 26 – दु 3 प, 28 – दु 12.30 प        

10        जावळाचे मुहुर्त    4, 12, 18-दु- 12.40 प, 19         

11        भूमिपुजनाचे/ पायाभरणी चे मुहुर्त   2, 8 – दु 12.30 प, 15 – दु 1 नं, 28- दु 2 प, 29 – दु 12 नं     

12        पाया खणणे मुहुर्त 5-  स 7.30 नं, 14, 15 – दु 1 प     

13        गृहप्रवेशाचे मुहुर्त (व्यवहारीक मुहुर्त)            2,4,8, 16, 18- दु 4 प, 19, 28 – दु 1.30 प

14        ग्रह पालट           रवी 16/12/2022- धनु, बुध 28/12/2022 04.53 वाजता मकर, 30/12/22 22.47 वाजता धनु, शुक्र 29/12/2022 दु 4.02 मकर          

15        व्यापार सुरु करण्याचे मुहुर्त            2, 8 – दु 12 प, 9 – दु 3 प, 18- दु 3.30 प, 29 दु 12 ते सायं 7           

16        वाहन खरेदी चे मुहुर्त        2, 8 – दु 12.30 प, 9 – दु 3 प., 18 – दु 3.30 प,. 28 -दु 12.30 प, 29- दु 12 ते 7 प      

17        दागिने खरेदी चे मुहुर्त       11/12/2022 ते 12/12/2022 रा 11.36 प  

18        इतर धर्मातील सण           25- नाताळ       

19        शेती च्या कामां साठी उपयुक्त दिवस           4, 5, 12, 18, 21, 26     

20        पंचक     मंगळवार 27/12/2022 स 03.35 ते रविवार 01/01/2023 स 11.47 प

डिसेंबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती

विशेष सूचना- वरील मुहूर्त आणि इतर माहिती ही वेगवेगळय़ा पंचांगांच्या आधारे आणि स्वानुभवाने दिलेले आहे. लौकिक मुहूर्त म्हणून याकडे बघावे. विवाह आणि उपनयन याचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण पत्रिकांचा सखोल अभ्यास करून हे मुहूर्त काढावेत असे माझे मत आहे.

मेष

 परदेश प्रयाणाकरता प्रयत्न करत असणाऱयांना अत्यंत अनुकूल काळ आहे. याचबरोबर जमिनीच्या व्यवहारात आणि गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहावे म्हणून एखाद्या सदस्याची मनधरणी करावी लागेल. नोकरदार वर्गाला केलेल्या कामाबद्दल प्रशंसा प्राप्त होईल. पण वैवाहिक जीवनामध्ये छोटय़ा-मोठय़ा कुरबुरी होऊ शकतात. मान सन्मानात वाढ होईल.

उपाय पाच लवंगा जवळ ठेवाव्या

 वृषभ

प्रवासातून धनलाभाची शक्मयता आहे. लहान भावंडांचे सहकार्य प्राप्त होईल. शेजारी मदतीला येतील. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. तब्येतीची तक्रार राहील. प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीशी वाद संभवतो. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला गटबाजीपासून नुकसान संभवते. वैवाहिक जोडीदार मनासारखे न वागल्यामुळे नाराज होण्याची शक्मयता आहे.

उपाय मंगळवारी मारुतीला बुंदीच्या लाडवाचा नैवद्य दाखवावा

मिथुन

पैसे, प्रवास, आणि प्रॉपर्टी यांच्या बाबतीत जर योग्य निर्णय घेतले तर निश्चितच फायदा होईल. या काळात पैसे साठवण्याकडे कल असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. मागे घडलेल्या एखाद्या भांडणाला पूर्णविराम लागेल. प्रवासात अनोळखी कडून फायदा होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शेअर बाजारापासून मात्र दूर राहा. नोकरदार वर्गाने बॉसची मर्जी सांभाळणे गरजेचे असेल. गाडी जपून चालवा.

उपाय गणपतीला लाल फूल अर्पण करावे

कर्क

जमिनीच्या व्यवहाराबद्दल जर विचार करत असाल तर सध्या पुढे ढकलायला हरकत नाही. आरोग्य ठीकठाक असेल. धनप्राप्ती उत्तम असेल. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. तुमच्या कामाकरता कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. भावंडांकडे अपेक्षित लक्ष द्या. प्रेम संबंधात दुरावा संभवतो. नोकरदार वर्गाला सर्वसाधारण काळ आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. विवाहोत्सुक लोकांचे विवाह ठरतील.

उपाय उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक घालावा.

 सिंह

मागच्या काळात जी तब्येतीची दुखणे उद्भवली होती ती आता कमी होतील. दागिने खरेदी करण्याचे योग होत आहेत. एखाद्या समारंभात भाग घ्याल. प्रवासात नुकसान संभवते. कागदोपत्री व्यवहार करत असताना सावध रहा. आईविषयी काळजी वाढण्याची शक्मयता आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ संभवतो. लव लाइफ छान असेल. नोकरीत पगारवाढीचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे मनाला लागू शकते.

उपाय शनिवारी पिंपळाचे पान जवळ ठेवावे

 कन्या

 विचारांना कृतीत आणण्याची वेळ आली आहे. आत्मविश्वासपूर्वक कामे कराल. आरोग्याची साथ मिळेल. आपल्या बोलण्याने कुणाचे मन दुखावले जाऊ नये याची काळजी घ्या. पैसे अडकतील अशा कुठल्याही स्कीममध्ये फसू नका. प्रवास टाळावा, अडचणी येऊ शकतात. पूर्वी केलेल्या छोटय़ा-मोठय़ा गुंतवणुकीतून  फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गावर एखादा आळ येण्याची शक्मता आहे.

उपाय कुमारी पूजन करावे

 तूळ

प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. एखादे घर, प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार असेल तर संधी सोडू नका. वाहन खरेदीचा दृष्टीनेदेखील चांगली वेळ आहे. नोकरदार वर्गाला उच्च अधिकाऱयांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कंबरदुखी किंवा अंगदुखीसारखे आजार त्रास देऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये थोडे त्रासदायक वातावरण असू शकते.

उपाय लक्ष्मीला कुंकूमार्चन करावे

 वृश्चिक

प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल काळ आहे. हा प्रवास कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणाने येऊ शकतो. कामानिमित्त केलेल्या प्रवासात फायद्याची शक्मयता जास्त आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होतील. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल. प्रेमीकडून एखादा उपहार मिळू शकतो. आर्थिक व्यवहार करत असताना सावध राहण्याची गरज आहे. प्रॉपर्टीसंबंधी एखादे काम अडल्यामुळे मानसिक त्रास होईल.

उपाय हनुमान चालीसाचे 11 पाठ करा

 धनु

आर्थिक बाबतीमध्ये भाग्यवान रास असेल. दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार कराल. कुटुंबात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. त्यानिमित्ताने नातेवाईकांची भेट होईल. प्रवास करत असताना तब्येत बिघडू शकते. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहारात यश मिळेल. जे÷ व्यक्तीकडून मोलाचा सल्ला मिळेल. प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने अखंड सावध राहावे. सोबत काम करणारी माणसे  कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील.

उपाय नंदादीप लावा

 मकर

आरोग्याची साथ मिळेल. या काळात आत्मविश्वासात वाढ होईल. कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्टय़ा थोडा त्रासदायक काळ आहे. प्रवास करणार असाल तर सोबत कोणाला तरी घेण्यास विसरू नका. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या पुढे ढकललेले बरे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे महागात पडू शकते. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होतील. नोकरदार वर्गाला आपले काम वेळेवर पूर्ण करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

 उपाय दीप दान करावे

कुंभ

आरोग्याची काळजी घ्या. तब्येतीचा त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यात यश मिळेल. प्रवासात एखादी वस्तू गहाळ होऊ शकते. धोकादायक गुंतवणूक करण्यापासून दूर रहा. प्रेमसंबंधात समोरच्या व्यक्तीचे वागणे खटकू शकते. नोकरदार वर्गाला पगारवाढ किंवा बढतीचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. उपाय छाया दान करा

मीन

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काही आव्हानांना सहजपणे सामोरे जाल. पैशांच्या दृष्टीने थोडा त्रासदायक काळ आहे. पण सध्या केलेल्या कष्टाचे फळ पुढे चांगले मिळेल. एखाद्या सहलीला किंवा प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर तो बेत सध्या पुढे ढकललेला बरा. प्रेमसंबंधात मधुरता येईल. गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळणार नाही. नोकरदार वर्गाने इतरांची मदत न घेता आपले काम करावे.

उपाय वाहत्या पाण्यात गंध सोडावे

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य शनिवार दि. 25 जुलै 2020

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 31 जुलै 2021

Patil_p

अक्षर यात्रा ः राशींचा देश-टॅरो चा संदेश

Patil_p