Tarun Bharat

राशी भविष्य

मेष

ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कागदोपत्री घोळ होण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्या लहान सहान तक्रारी त्रास देतील. पैशांची आवक समाधानकारक असेल. मित्रांवर विश्वास ठेवू नका. घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामाकरता बाहेरगावी जावे लागू शकते. दुसऱ्याला मदत करत असताना आपल्याला काही कमी पडणार नाही याची काळजी घ्या. पाण्याच्या ठिकाणी सहलीला जाणे टाळा. गरजूला पिवळी मिठाई वाटावी

वृषभ

जे पेराल तेच उगवेल याचा अनुभव देणारा आठवडा असेल. पूर्वी दुसऱ्याला केलेली मदत या आठवड्यात पुण्याच्या रूपाने प्रकट होईल. हाती घेतलेल्या कामांना यश मिळेल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्याबद्दल आदर आणि विश्वास वाटेल. वैवाहिक जीवनात थोडे कटू अनुभव येण्याची शक्मयता आहे. उधारी घेणे आणि देणे टाळा.

सफेद रंगाचा हातऊमाल जवळ ठेवा

 मिथुन

आठवड्यात बरेचशे आनंदाचे प्रसंग येतील. मध्यंतरी काही टेन्शन आले असेल तर त्यावर उपाय सापडल्याने मन हलके होईल. कुटुंबात एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे तरच चांगल्या यशाची अपेक्षा करता येईल. केलेला एखादा प्लॅन रद्द झाल्याने निराश होण्याची शक्मयता आहे.

गरजूला दुधाचे दान द्या

 कर्क

तुम्हाला समजलेली बातमी आणि वास्तविकता यामध्ये फरक असू शकतो याचे भान ठेवून निर्णय घ्या आणि लोकांशी वागा. काही लोक चुकीच्या किंवा खोट्या गोष्टी सांगून तुमचा आर्थिक किंवा इतर पद्धतीने फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. ऑफिसमध्ये विनाकारण कामे वाढल्याने ताण येण्याची शक्मयता आहे. संतती विषयी काळजी वाटू शकते.

 गुलाबजल जवळ ठेवावे

 सिंह

स्नायूंचे विकार किंवा दुखणे त्रास देऊ शकते. विशेषत: मानेपासून पाठीकडे जाणाऱ्या स्नायूंमध्ये ताण येऊन बैचेन व्हाल. या आठवड्यात प्राण्यांपासून शक्मयतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि ओळखीमुळे या अडचणींवर मात कराल.

धार्मिक स्थळी अन्नदान करावे

 कन्या

आनंददायी घटनांनंतर जर मतभेदाला सामोरे जावे लागले किंवा एखाद्या व्यक्तीशी मनमुटाव झाला तर ज्याप्रमाणे खिन्नता वाटते तसा अनुभव येण्याची शक्मयता आहे. घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. काही विशिष्ट कारणांकरता खर्च जास्त होण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना कन्फ्यूज व्हाल.

वासराच्या पायाखालील माती जवळ ठेवा

तूळ

घरच्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी असलेले प्रेशर यामुळे ताण येऊन त्याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. ज्यांना टेन्शन जास्त घेण्याची सवय आहे त्यांनी या आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. व्यावसायिकांना चांगल्या संधी प्राप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. संततीकडून अपेक्षा वाढतील.

गोशाळेला मदत करावी

वृश्चिक

मित्रांच्या सहवासामुळे मन प्रसन्न असेल. खर्चाचे प्रमाण जरी वाढले असले तरी तो खर्च योग्य असल्याने पश्चाताप होणार नाही. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. या आठवड्यात खानपानावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे भर द्या.

अन्नदान करा

धनु

या आठवड्यामध्ये लोकांकडून तुमच्या अपेक्षा वाढतील. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून अधिक चांगल्या प्रकारे कामाची अपेक्षा करतील. घरात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. पूर्वी अपूर्ण राहिलेली इच्छा या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्मयता आहे. तब्येतीला सांभाळा. धनप्राप्तीचा वेगळा मार्ग सापडेल. काळ्या वस्तूचे दान द्या

 मकर

विद्यार्थी वर्गाने जराही निराश न होता किंवा टेन्शन न घेता अभ्यास करण्याची गरज आहे. व्यावसायकांनी व्यवसाय वाढण्याकरता नवीन लोकांना भेटणे गरजेचे असेल. तब्येत सुधारण्याकरता प्रयत्न करा, यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन चांगले असेल.

चंद्रकांत मणी जवळ ठेवावा

 कुंभ

आजूबाजूच्या लोकांकडून जास्त अपेक्षा करू नका, निराशा पदरी पडू शकते. पूर्वी ज्या कामांमध्ये अपयश आले होते अशा कामांमध्ये यश मिळेल, प्रयत्न सोडू नका. बरेच दिवस भेट झाली नाही अशी एखादी व्यक्ती भेटल्यामुळे आनंद प्राप्त होईल. व्यापार करणाऱ्यांना बाहेरगावी जावे लागू शकते. नोकरीत तणाव असेल.

सुगंधी फुलाचे झाड घरी लावा

मीन

प्रयत्नांची कास सोडली नाही तर यश तुमचेच आहे याची खात्री बाळगावी. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्याने टेन्शन येऊ शकते. मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्याबरोबर एखाद्या ट्रिपला जाण्याचा प्लॅन कराल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांच्या बोलण्यामुळे त्रास होऊ शकतो. कागदपत्रांना सांभाळण्याची गरज आहे.

घरातील इलेक्ट्रिक मीटरला लाल दोरा बांधा.

लग्न झाल्यानंतर नववधूने सात हळदीच्या गाठी, पितळेचा एक तुकडा आणि थोडा गुळ आपल्या सासरच्या घराकडे फेकला तर नववधू सासरी खूप सुखी नांदते,  कोणतेही संकट येत नाही, चांगली बरकत येते

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि.4 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 जून 2022

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 22 ऑगस्ट 2022

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 5 डिसेंबर 2020

Patil_p

राशी भविष्य

Patil_p