Tarun Bharat

राष्ट्रकुल टी-20 स्पर्धेसाठी भारतासह सहा महिला संघ पात्र

वृत्तसंस्था/ दुबई

2022 साली होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे दुसऱयांदा पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत महिलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह अन्य सहा संघ पात्र ठरले आहेत.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत होणाऱया महिलांच्या टी-20 या क्रीडा प्रकारात एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि विंडीजमधील एका संघाचा समावेश राहील. 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या सांघिक मानांकनातील क्रमवारीनुसार वरील संघांनी आपल्या पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत महिलांच्या टी-20 साठी शेवटच्या संघासाठी पात्रता क्रिकेट स्पर्धा 31 जानेवारी 2022 साली घेतली जाणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत अनेक देशांचे स्पर्धक विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत असतात. पण आतापर्यंत झालेल्या 22 राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच तर क्रिकेट या क्रीडा प्रकाराचा दुसऱयांदा समावेश झाला आहे. 1998 साली झालेल्या कौलालंपूर येथील राष्ट्रकुल स्पर्धेत पुरूषांची वनडे क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली होती आणि दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. 2022 साली राष्ट्रकुल स्पर्धा ब्रिटनमध्ये होत असून महिलांची क्रिकेट स्पर्धा एजबॅस्टन स्टेडियमवर घेतली जाणार असून या क्रीडा प्रकारातील सामन्यांच्या तिकीट विक्रीला वर्षअखेरीस प्रारंभ केला जाणार आहे. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने समाधान व्यक्त केले आहे. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत महिलांच्या क्रिकेटला शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा आयसीसीने व्यक्त केली आहे.

Related Stories

एफसी गोवाचा ओडिशा एफसीवर विजय

Patil_p

फुटबॉल मैदानात धावायचंय,सरावात बदल करा

Archana Banage

केकेआर-राजस्थान यांच्यात आज महत्त्वाची लढत

Patil_p

डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्स पहिले विजेते

Patil_p

टोकियो ऑलिंपिकसाठी स्थानिक 10 हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

भारतीय युवा फुटबॉल संघाचा पराभव

Patil_p