Tarun Bharat

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाराष्ट्र केसरी पैलवान अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अनेक पैलवानांना आस्मान दाखवणारे आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते.

1992 साली आप्पालाल महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र 1991 साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन महाराष्ट्र केसरी गदा आहेत. अशा या मल्लाच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Related Stories

युवराजच्या मनात पुनरागमनाचा विचार!

Patil_p

नामुष्की टाळण्यासाठी गावस्करांचा मोठा निर्णय, 33 वर्षांनी…

datta jadhav

खूनाची धमकी देणाऱया खंडणीबहाद्दरास अटक

Patil_p

हा तर पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी : माजी खासदार महाडिक

Archana Banage

कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा शनिवारी पूर्ववत होणार

Archana Banage

शिगाव येथील रोमित चव्हाण जम्मू काश्मीर येथे शहीद

Archana Banage
error: Content is protected !!