Tarun Bharat

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय हॉकी संघांचा सहभाग अनिश्चित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील वषी होणाऱया बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांचा सहभाग अनिश्चित राहील. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यावर भारतीय हॉकी संघांचे लक्ष राहणार असल्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे संघ सहभागी होतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाचे सरसंचालक संदीप प्रधान तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्यात औपचारिक चर्चा झाली. बात्रा हे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे प्रमुख असून ते हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा भारतीय हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेला अधिक प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर केवळ 35 दिवसांच्या अंतराने आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे. बर्मिंगहॅममधील ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार असून आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे.

Related Stories

संदेश झिंगन, सुरेश यांना एआयएफएफ पुरस्कार

Patil_p

पीएसजीच्या विजयामध्ये नेमारचे दोन गोल

Patil_p

पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा बांगलादेशमध्ये

Patil_p

यामागुचीला धक्का देत वांग अजिंक्य

Patil_p

विंडीजचे क्रिकेटपटू ब्लॅक लाईव्ज मॅटर लोगो वापरणार

Patil_p

भारतीय मुष्टीयुद्ध संघासमोर व्हिसाची अडचण

Patil_p