Tarun Bharat

राष्ट्रकुल हॉकीमध्ये भारताची सलामी

29 जुलैपासून सुरू होणार हॉकी लढती, 8 ऑगस्टला अंतिम लढती

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम

येथे होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हॉकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून भारताच्या पुरुष संघाचा सलामीचा सामना 31 जुलै रोजी घानाविरुद्ध तर महिलांची पहिली लढत घानाविरुद्धच 29 जुलै रोजी होणार आहे.

भारताच्या पुरुष संघाने या स्पर्धेत दोनदा रौप्यपदक मिळविले असून यावेळी त्यांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. याच गटात यजमान इंग्लंड, कॅनडा, वेल्स व घाना यांचाही समावेश आहे. अ गटात सहावेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व स्कॉटलंड यांचा समावेश आहे. भारतीय महिलांना अ गटात स्थान देण्यात आले असून इंग्लंड, कॅनडा, वेल्स व घानाही याच गटात आहेत.

घानाविरुद्ध पहिला सामना झाल्यानंतर इंग्लंड (1 ऑगस्ट), कॅनडा (3 ऑगस्ट), वेल्स (4 ऑगस्ट) यांच्याविरुद्ध पुरुष संघाचे सामने होतील. महिलांचे पुढील सामने वेल्स (30 जुलै), इंग्लंड (2 ऑगस्ट), कॅनडा (3 ऑगस्ट) यांच्याविरुद्ध होतील. प्रत्येक गटात पहिले दोन क्रमांक मिळविणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 6 ऑगस्ट रोजी पुरुष विभागातील उपांत्य सामने व 8 ऑगस्ट रोजी अंतिम लढत होईल. महिलांचे उपांत्य व अंतिम सामना अनुक्रमे 5 व 7 रोजी खेळविले जातील.

या स्पर्धेसाठी भारताने आपले अ संघ पाठविण्याचे ठरविले आहे. राष्ट्रकुल व हांगझोयू येथे होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्यात फार कमी अंतर असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ही 2024 मध्ये होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रतेची स्पर्धा असणार आहे. या दोन स्पर्धांमध्ये केवळ 32 दिवसांचे अंतर असल्याने आशियाई स्पर्धेसाठी प्रथम पसंतीचे खेळाडू ताजेतवाने रहावेत यासाठी राष्ट्रीय फेडरेशनने दोन्ही अ संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.  2018 गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण व रौप्य विजेते ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांचे पुरुष व महिला संघ आमनेसामने असतील.

बुधवारी जाहीर केलेल्या हॉकीच्या वेळापत्रकानुसार पुरुष व महिलांचे हॉकी सामने 29 जुलैपासून सुरू होतील. महिलांच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंड व केनिया, दक्षिण आफ्रिका व स्कॉटलंड यांच्यात सामने होतील तर पुरुषांमध्ये इंग्लंड व घाना, न्यूझीलंड व स्कॉटलंड यांचे सामनेही याच सत्रात होतील. स्पर्धेत एकूण 54 सामने होणार असून त्यापैकी 40 साखळी, सहा वर्गवारीचे, चार उपांत्य व चार पदकाचे सामने होतील. सर्व सामने युनिव्हर्सिटी केंद्रावर होणार आहेत.

Related Stories

तिरंदाजीतील अपयशी मालिका कायम, दास स्पर्धेबाहेर

Patil_p

बजरंग पुनिया, विनेश फोगटवर ‘स्पॉटलाईट’

Patil_p

यू-19 महिला टी-20 विश्वचषकात भारत अजिंक्य

Patil_p

पाकचा इंग्लंडवर 31 धावांनी विजय

Patil_p

पुणेरी पलटनकडून यूपी योद्धा पराभूत

Patil_p

टी-20 विश्वचषकात रबाडा चौथा हॅट्ट्रिकवीर

Patil_p