Tarun Bharat

राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी उमेदवार दिल्यामुळे भाजपाचे उटातर्फे अभिनंदन

कुडचडे येथे 5 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव : राजीव कला मंदिर येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदीवासी दिवस

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

देश स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी साजरी करताना देशाच्या सर्वोच्च (राष्ट्रपती) पदाच्या  निवडीसाठी आदीवासी समाजातील महिला नेत्या दैपती मुर्मु यांचा एनडीएतर्फे राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा)तर्फे पंतप्रधान नरेंद्र मादी व भाजपा पदाधिकाऱयाचे अभिनंदन करीत  आल्याची माहिती फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी देण्यात आली.

  यावेळी उटाचे पदाधिकारी दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, नानू बांडोळकर, विदेश  गावडे, भालचंद उसगांवकर उपस्थित होते. देशभरात असलेल्या सुमारे 15 कोटी आदिवासी जनतेचे प्रतिनिधीत्व करताना सर्वोच्चपदी राहून देशसेवा करण्याची संधी एखाद्या आदिवासी समाजातील महिलेला मिळणार आहे, त्यासाठी सर्व पक्षानी बिनविरोध पाठिंब दर्शवून निवड करावी असे आवाहन उटा संघटनेतर्फे करण्यात आले आहे. भाजपाकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मु यांना उमेदवारी देण्यात आल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह व भाजपासह इतर एनडीएच्या पदाधिकाऱयाचे अभिनंदन केले आहे. द्रौपदी मुर्मु या मूळ ओरीसा येथील असून पेशाने शिक्षीका असलेल्या मुर्मु यांनी भाजपाच्या एसटी मोर्चा अध्यक्ष ते दोन वेळा ओरीसा विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्या झारखंडच्या माजी राज्यपालही होत्या. आदीवासी समाजबांधवापैकी एखादी व्यक्ती सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर आरूढ झाल्यास समाजासाठी अभिमानास्पद बाब असून आदिवासी समाजासाठी एकप्रकारची स्वप्नपुर्तीच ठरेल असे प्रकाश वेळीप म्हणाले.

   आदीवासी समाजातर्फे 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आदीवासी दिवस

   उटा संघटनेतर्फे फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. ‘जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळय़ाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे  उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर 11 तालुक्यात उटा संघटनेतर्फे जागृती कार्यक्रम ‘गाव संपर्क मोहीमे’तून आखण्यात आलेले आहे. या माध्यमातून समाजबांधवासाठी उटाचे कार्य खेडोपाडय़ात पोचविण्याचे ध्येय ठेवण्यात आल्याचे सांगितले.

कुडचडे येथे 5 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा  

त्याशिवाय 5 जुलै रोजी धारबांदोडा, सांगे व केपे तालूक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा कुडचडे येथील रविद्र भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती वेळीप यांनी दिली. डॉ. प्रमोद सावंत मंत्रीमंडळात समाजातील मंत्री असलेले गोविंद गावडे यांच्याकडे आदीवासी कल्याण खात्याची जबाबदारी द्यावी अशीही मागणी यावेळी एकमताने करण्यात आली.

Related Stories

कुटबण जेटीवरील व्यवहार ठप्प

Amit Kulkarni

गोव्याच्या समृद्धीसाठी भाजपाला हॅट्ट्रिकची संधी द्या : जे. पी.नड्डा

Amit Kulkarni

अत्यावश्यक सेवांसाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni

गोव्यात कोळसा ‘हब’ होऊ दिला जाणार नाही

Patil_p

निराधारांना आधार देणारी जीवनआनंद

Patil_p

मडगाव, पर्वरी केंद्रांतील रुग्णवाढ चिंताजनक

Amit Kulkarni
error: Content is protected !!