Tarun Bharat

राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक ; माती कपाळावर लावत जन्मभूमीला केलं वंदन

Advertisements

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच आपल्या मूळ गावी भेट दिली. त्यांनी उत्तरप्रदेशातल्या कानपूर देहात जिल्ह्यातल्या परौंख या आपल्या गावी जाताच तिथली माती आपल्या कपाळी लावून जन्मभूमीला नमन केलं. त्यावेळी राष्ट्रपतींचं एक भावूक रुप पहायला मिळालं.

राष्ट्रपती हेलिकॉप्टरमधून आपली जन्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोहोचले. त्यावेळी हेलिपॅडवर उतरताच त्यांनी तिथली माती कपाळावर लावली आणि जन्मभूमीला वंदन केलं. त्यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांचा हा फोटो राष्ट्रपती भवनाकडून ट्वीट करण्यात आला आहे.

मी जिथे कुठे जाईन तिथे माझ्यासोबत माझ्या गावच्या मातीचा सुगंध आणि गावकऱ्यांच्या आठवणी कायम असतील. माझ्यासाठी परौंख फक्त एक गाव नाही तर माझी मातृभूमी आहे. तिच्याकडून मला कायम पुढे जात राहण्याची आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या गावाविषयी भावना व्यक्त करताना म्हणाले. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपला लहानपणीचा मित्र कृष्ण कुमार हे आजारी असल्याची माहिती मिळताच मित्राची भेट घेतली. आपण राष्ट्रपती नाही तर एका मित्राच्या नात्यानं कृष्ण कुमार यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितले.

Related Stories

शिमला : बिना मास्कचे आढळल्यास 1 हजार रुपये दंड; उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Rohan_P

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरूवात

datta jadhav

मतांसाठी आमदारांना ‘टाटा सफारी’ची ऑफर

datta jadhav

मंत्रीमंडळ विस्तार…आषाढीनंतर

Abhijeet Khandekar

अरविंद केजरीवाल यांची आमदारांसोबतची बैठक रद्द

Abhijeet Shinde

धोका वाढला : उत्तराखंडात कोरोना रुग्णांनी पार केला 35 हजारांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!