Tarun Bharat

…तर राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल – संजय राऊत

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

मुंबईतील मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युतर दिलं आहे. भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. अशी मागणी आता संजय राऊत यांनी केली आहे.

क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे दिलेले नाव हटवण्याची मागणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. असे न झाल्यास भाजप राज्यभर आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे. यावर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलतानाचा गौरव केला होता. टिपू सुलतान हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला तयार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, टिपू सुलतानच्या नावावर भाजप राजकारण करत असून, टिपू सुलतानचे काय करायचे हे, राज्य सरकार आणि महापालिका बघून घेईल. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. हे लक्षात ठेवा. श्रीरंग पट्टणम, हैदरअली यांच्याविषयी आम्हालाही माहिती आहे. कोणी काय अत्याचार केलेत, हेदेखील आम्ही जाणतो. पण भाजप सगळा जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपण ते पाहतच आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Related Stories

मोठी कारवाई : आसाममध्ये तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Sumit Tambekar

जॅकलीनची परदेशात जाण्यासाठी कोर्टात धाव

Abhijeet Khandekar

धक्कादायक! नोव्हेंबरमध्ये 300 शेतकऱयांची आत्महत्या

prashant_c

एकनाथ खडसेंच्या जावयाचा ईडी कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

Abhijeet Shinde

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

Rohan_P

‘बुल्ली बाई’ प्रकरणी तिघांना अटक; तपासाची चक्रे गतीमान

Sumit Tambekar
error: Content is protected !!