Tarun Bharat

राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन रशियात कायद्यापेक्षा वरचढ

Advertisements

स्वतःच केली संबंधित विधेयकावर स्वाक्षरी

वृत्तसंस्था / मॉस्को

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे कायद्यापेक्षा वरचढ ठरले आहेत. स्वतः पुतीन यांनीच रशियाच्या माजी राष्ट्रपतींच्या विरोधात उर्वरित आयुष्यात खटला न चालविण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. पुतीन यांच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक आता कायद्यात रुपांतरित झाले आहे. विधेयकात रशियाचे माजी राष्ट्रपती तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर पूर्ण हयातीत कुठल्याही गुन्हय़ासाठी खटला न चालविण्याची तरतूद आहे.

रशियाच्या या कायद्यात माजी राष्ट्रपतींना पोलीस किंवा तपासकर्त्यांकडून होणारी चौकशी, शोधमोहीम किंवा अटकेपासूनही संरक्षण देण्यात आले आहे.ा घटनादुरुस्तीनुसार 68 वर्षीय पुतीन 2036 पर्यंत देशाचे राष्ट्रपती म्हणून कायम राहणार आहेत. माजी राष्ट्रपतींना हयातभर सिनेटमध्ये स्थान मिळणार आहे. सद्यकाळात रशियाचे केवळ एक माजी राष्ट्रपती दमित्री मेदवेदेव जिवंत आहेत, त्यांनाही पुतीन यांच्यासोबत नव्या कायद्याचा लाभ मिळणार आहे. मेदवेदेव हे पुतीन यांचेच सहकारी आहेत. नव्या कायद्याच्या अंतर्गत माजी राष्ट्रपतींसह त्यांच्या कुटुंबीयांनाही पोलीस चौकशीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच या लोकांची मालमत्ताही जप्त करता येणार नाही.

Related Stories

‘जी-7′ संघटनेत दक्षिण कोरियाला सहभागी करण्यास जपानचा विरोध

datta jadhav

ओ रक्तगट असलेल्यांना सर्वात कमी धोका

Patil_p

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Abhijeet Shinde

विनामास्क सेल्फी; चिलीच्या राष्ट्राध्यक्षांना 2.5 लाखांचा दंड

datta jadhav

दोन भारतीय मच्छीमार नौकेवरील १६ खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात, ७ जण पालघरमधील

Abhijeet Shinde

तालिबानचा ‘हा’ नेता करणार अफगाणिस्तान सरकारचं नेतृत्व

Abhijeet Shinde
error: Content is protected !!